Palghar Shivsena News : पालघर जिल्ह्यातून एक मोठी राजकीय अपडेट समोर येत आहे. पालघरमध्ये (Palghar) भाजपने पुन्हा एकदा शिवसेनेला (Shivsena) मोठा धक्का दिला आहे. पालघर जिल्ह्यातील शिवसेनेच्या दोन माजी आमदारांनी भाजपात प्रवेश केलाय. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडलाय. (Shivsena Crisis Latest News)
अमित घोडा आणि विलास तरे अशी भाजपात (BJP) प्रवेश करणाऱ्या दोन माजी आमदारांची नाव आहेत. विलास तरे हे बहुजन विकास आघाडी कडून बोईसर विधानसभेवर 2009 आणि 2014 अशा दोन वेळेस निवडून आले होते . मात्र त्यानंतर 2019 च्या निवडणुकीपूर्वी त्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला होता .
बोईसर विधानसभा जागेवर शिवसेनेमधून निवडणूक लढवताना तरे यांना पराभव स्वीकारावा लागला . तर माजी आमदार अमित घोडा हे दिवंगत आमदार कृष्णा घोडा यांचे पुत्र असून 2016 साली झालेल्या पोटनिवडणुकीत शिवसेनेकडून पालघर विधानसभेवर आमदार म्हणून निवडून आले होते. (Palghar News Today)
मात्र 2019 च्या निवडणुकीत त्यांना शिवसेनेकडून उमेदवारी नाकारण्यात आली . या दोन्ही आमदारांनी बुधवारी (21 सप्टेंबर) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपात जाहीर प्रवेश केला आहे. दोन माजी आमदारांनी अचानक भाजपात प्रवेश केल्याने पालघरमध्ये शिवसेनेला खिंडार पडलं आहे.
एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर शिवसेनेला धक्क्यावर धक्के बसत आहेत. आमदार, खासदार, नगरसेवक तसेच पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटाची वाट धरलीय. मात्र, पालघरमधील या दोन नेत्यांनी शिंदे गटात प्रवेश न करता थेट भाजपात प्रवेश केल्याने हा शिंदे गटालाही मोठा धक्का असल्याचं बोललं जातयं.
Edited By - Satish Daud
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.