Prajwal Revanna: प्रज्वल रेवन्नाविरोधात ब्लू कॉर्नर नोटीस जारी, जाणून घ्या काय आहे या नोटीसचा अर्थ

Blue Corner Notice: अनेक महिलांचा लैंगिक छळ केल्याचा आरोप असलेल्या प्रज्वल रेवन्ना यांच्या विरोधात ब्लू कॉर्नर नोटीस जारी करण्यात आली आहे. कर्नाटकचे गृहमंत्री डॉ. जी परमेश्वरा यांनी रविवारी ही माहिती दिली.
प्रज्वल रेवन्नाविरोधात ब्लू कॉर्नर नोटीस जारी, जाणून घ्या काय आहे या नोटीसचा अर्थ
Prajwal RevannaSaam Tv
Published On

Prajwal Revanna News:

अनेक महिलांचा लैंगिक छळ केल्याचा आरोप असलेल्या प्रज्वल रेवन्ना यांच्या विरोधात ब्लू कॉर्नर नोटीस जारी करण्यात आली आहे. कर्नाटकचे गृहमंत्री डॉ. जी परमेश्वरा यांनी रविवारी ही माहिती दिली. हसन लोकसभा मतदारसंघातील एनडीएच्या उमेदवाराला भारतात परत आणण्यासाठी इंटरपोलची मदत घेतली जात असल्याचे त्यांनी सांगितले.

जी परमेश्वरा यांनी सांगितले की, सेक्स स्कँडलच्या चौकशीसाठी स्थापन करण्यात आलेले विशेष तपास पथक (एसआयटी) प्रज्वल यांना परत कसे आणायचे याचा निर्णय घेईल. ते म्हणाले, ब्लू कॉर्नर नोटीस आधीच जारी करण्यात आली आहे. इंटरपोल सर्व देशांना माहिती देईल आणि त्यांचा शोध घेईल.

प्रज्वल रेवन्नाविरोधात ब्लू कॉर्नर नोटीस जारी, जाणून घ्या काय आहे या नोटीसचा अर्थ
HD Revanna: मोठी बातमी! बलात्कार प्रकरणातील आरोपी एचडी रेवन्ना यांना एसआयटीने घेतलं ताब्यात

जी परमेश्वरा यांनी या प्रकरणाच्या तपासासाठी स्थापन केलेल्या एसआयटीच्या कार्याचे कौतुक केले. ते म्हणाले की, टीम आपले काम करत असून तक्रारींवर कायद्यानुसार कारवाई केली आहे. अपहरण प्रकरणात अटकेत असलेले प्रज्वल यांचे वडील एचडी रेवन्ना यांचा संदर्भ देत त्यांनी सांगितले की, एसआयटीने आरोपीला अटक केली आहे.

दरम्यान, प्रज्वल वडील आणि जेडी (एस) आमदार एचडी रेवन्ना यांच्यावर विनयभंग आणि अपहरणाचा आरोप आहे. त्यांना शनिवारी पोलीस आणि ताब्यात घेतलं आहे.

प्रज्वल रेवन्नाविरोधात ब्लू कॉर्नर नोटीस जारी, जाणून घ्या काय आहे या नोटीसचा अर्थ
Maharashtra Politics: भाषणादरम्यान रोहित पवार ढसाढसा रडले, अजित पवारांनी भरसभेत केली नक्कल; VIDEO

ब्लू कॉर्नर नोटीस काय आहे?

ब्लू कॉर्नर नोटीस कोणत्याही गुन्ह्याच्या संबंधात आंतरराष्ट्रीय पोलीस संस्थेकडून सहकार्य मिळविण्यासाठी जारी केली जाते. एखाद्या व्यक्तीची ओळख, स्थान किंवा गतिविधी याबद्दल सदस्य राज्यांकडून अतिरिक्त माहिती मिळविण्यासाठी ब्लू कॉर्नर नोटीस जारी केली जाते. ब्लू नोटीस सीबीआयच्या वेबसाइटवर बी सीरीज नोटीस म्हणून दर्शविली आहे. या बी कॅटगरी नोटीसला तपास सूचना असेही म्हणतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com