BMC advises citizens not to eat street food as a man died due to Shawarma Saam TV
मुंबई/पुणे

Shawarma News: शोरमा खाऊन तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर BMCनं जारी केल्या गाइडलाइन्स; सर्वांनीच लक्षात ठेवाव्यात अशा ५ महत्वाच्या गोष्टी

BMC Guidelines For Street Food: आपल्यापैंकी सगळ्यांना रस्त्यावरील खाद्यपदार्थ खाण्यास खूप आवडतात. मात्र काही दिवसांपूर्वी मुंबई शहरातील मानखुर्द येथे एका १९ वर्षीय मुलाचा रस्त्यावरील शोरमा(shawarma) खाल्ल्याने मृत्यू झाला होता.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

आपल्यापैंकी सगळ्यांना रस्त्यावरील खाद्यपदार्थ खाण्यास खूप आवडतात. मात्र काही दिवसांपूर्वी मुंबई शहरातील मानखुर्द येथे एका १९ वर्षीय मुलाचा रस्त्यावरील शोरमा(shawarma) खाल्ल्याने मृत्यू झाला होता. या मुलाच्या मृत्यूनंतर मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून प्रत्येक नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की, त्यांनी रस्त्यांवर तयार केलेले खाद्यपदार्थ खाणे टाळावे, तसेच शिळे अन्न देखील खाणे टाळावे.

मुंबईमध्ये रस्त्यावरील उघडे शोरमा खाल्ल्यामुळे एका तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर मुंबई महानगरपालिकेला जाग आली आहे. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेकडून नागरिकांना उन्हाळ्यात रस्त्यावरील अन्न न खाण्यास सल्ला दिला आहे. अन्नविषबाधा घटनेच्या पार्श्वभूमीवर बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आवाहन करण्यात आले आहे.

काय केले आवाहन

रस्त्यांवर, उघड्यांवर तयार केलेले खाद्यपदार्थ खाणे टाळावे, तसेच शिळे अन्न देखील खाणे टाळावे, कारण उन्हाळ्यातील वाढत्या तापमानामुळे खाद्यपदार्थ(Food) लवकर खराब होतात. उघड्यावरील व निकृष्ट दर्जाचे पदार्थ खाल्ल्याने अन्न विषबाधेच्या घटना घडतात, ही बाब लक्षात घेता सर्व नागरिकांनी कृपया योग्य ती काळजी घ्यावी, मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे, असे विनम्र आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून करण्यात येत आहे.मुंबईतील नागरिकांच्या उत्तम आरोग्याच्या दृष्टीने विविध धोरणे, योजना आणि अभियान बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून नियमितपणे राबविण्यात येतात.

मुंबईतील जवळपास १ कोटी ३० लाख लोकसंख्येला बृहन्मुंबई महानगरपालिका विविध नागरी सेवा-सुविधा पुरवत असते. मुंबईसारख्या धावपळीच्या महानगरात काहीवेळा रस्त्यावरील खाद्यपदार्थ स्वस्त किंवा सहजपणे उपलब्ध असल्यामुळे त्याचे सेवन केले जाते. असे असले तरी सार्वजनिक ठिकाणांवर उपलब्ध असणाऱ्या खाद्यपदार्थांबाबत काळजी घेणे आवश्यक आहे.निकृष्ट दर्जाच्या अन्नपदार्थांच्या सेवनामुळे अन्न विषबाधा सारख्या आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात. नुकतेच महानगरपालिका क्षेत्रातील पी उत्तर आणि एम पूर्व विभागामध्ये उघड्यावरील खाद्यपदार्थातून अन्न विषबाधा (फूड पॉयझनिंग) झाल्याच्या घटना घडल्या आहेत.

बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की, (BMC Advice Over Street Food) -

  • १. बाहेरील व रस्त्यावरील अनधिकृत विक्रेत्यांकडून पेय आणि खाद्यपदार्थ खाण्याचे टाळावे.

  • २. लहान मुले रस्त्यावरील खाद्यपदार्थांचे सेवन करणार नाहीत, याबाबतीत पालकांनी दक्षता घ्यावी.

  • ३. लहान मुले रस्त्यावरील खाद्यपदार्थांचे सेवन करणार नाहीत, याबाबतीत पालकांनी दक्षता घ्यावी.

  • ४. गर्भवती महिलांनी प्रामुख्याने दुसऱ्या तिमाहीमध्ये वैयक्तिक स्वच्छता व पौष्टिक आहाराकडे विशेष लक्ष द्यावे.

  • ५. प्रसाधनानंतर व स्वयंपाकापूर्वी हात नियमितपणे स्वच्छ धुवावे आणि वैयक्तिक स्वछता पाळावी.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ind Vs Eng Lord Test : जे सचिन-विराटला जमलं नाही, ते केएल राहुलनं करुन दाखवलं, पठ्ठ्यानं लॉर्ड्सचं मैदान गाजवलं

जगात मुस्लीम लोकसंख्येचा विस्फोट,भारत होणार लोकसंख्येत मोठा मुस्लीम देश? देशात हिंदू लोकसंख्या किती?

मुंडेंच्या तिसऱ्या लेकीची राजकारणात एन्ट्री, यशश्री मुंडे राजकारणाच्या मैदानात,यशश्री लढवणार वैद्यनाथ बँकेची निवडणुक

Maharashtra Politics: राऊतां विरोधात शिरसाटांनी ठोकला शड्डू,'बदनामीसाठी मॉर्फ व्हिडीओ', शिरसाटांचा दावा,'पैशांच्या बॅगेचे आणखी व्हिड़िओ बाहेर काढू

Maharashtra Politics: शिलेदारांनी वाढवल्या शिंदेंच्या अडचणी?आपल्याच नेत्यांमुळे शिंदे चक्रव्युहात? खोतकर, शिरसाटांसह गायकवाडही अडचणीत

SCROLL FOR NEXT