Trendy Bags: ऑफिस, पार्टी किंवा फेस्टिव्हलसाठी 'या' बॅग्स प्रत्येक मुलींच्या कपाटात असल्या पाहिजेत

Shruti Vilas Kadam

टोट बॅग (Tote Bag)

टोट बॅग्स या मोठ्या आकाराच्या आणि स्टायलिश असल्याने ऑफिस, कॉलेज किंवा शॉपिंगसाठी परफेक्ट मानल्या जातात. कॅज्युअल ते फॉर्मल लुकसाठी या बॅग्स ट्रेंडमध्ये आहेत.

Trendy Bags

स्लिंग बॅग (Sling Bag)

हलकी, सोयीस्कर आणि स्टायलिश असल्याने स्लिंग बॅग्स तरुणांमध्ये खूप लोकप्रिय आहेत. दैनंदिन वापरासोबतच ट्रॅव्हलसाठीही या बॅग्स उत्तम ठरतात.

Trendy Bags

बकेट बॅग (Bucket Bag)

बकेट शेप डिझाइनमुळे या बॅग्स वेगळा आणि फॅशनेबल लुक देतात. पार्टी, आउटिंग किंवा कॅज्युअल वेअरसोबत या बॅग्स खास उठून दिसतात.

Trendy Bags

क्रॉसबॉडी बॅग (Crossbody Bag)

हात मोकळे ठेवून वापरता येतात म्हणून क्रॉसबॉडी बॅग्स सध्या खूप ट्रेंडमध्ये आहेत. स्टाईल आणि कम्फर्ट दोन्ही मिळतात.

Trendy Bags

मिनी बॅग (Mini Bag)

लहान आकाराच्या पण आकर्षक डिझाइनच्या मिनी बॅग्स फॅशन स्टेटमेंट बनल्या आहेत. कमी वस्तू ठेवण्यासाठी आणि ट्रेंडी लुकसाठी या बॅग्स वापरल्या जातात.

Trendy Bags

बॅकपॅक (Backpack)

पूर्वी फक्त कॉलेजपुरती मर्यादित असलेली बॅकपॅक आता फॅशन अ‍ॅक्सेसरी बनली आहे. ऑफिस, ट्रॅव्हल आणि कॅज्युअल वापरासाठी स्टायलिश बॅकपॅक्स लोकप्रिय होत आहेत.

Trendy Bags

क्लच बॅग (Clutch Bag)

पार्टी, लग्न किंवा खास कार्यक्रमांसाठी क्लच बॅग्स नेहमीच ट्रेंडमध्ये असतात. ग्लॅमरस लुकसाठी या बॅग्स उत्तम पर्याय ठरतात.

Trendy Bags

Bodycon Dresses Type: न्यू ईयरला 'हे' ट्रेंडी बॉडीकॉन ड्रेस नक्की ट्राय करा, दिसाल ग्लॅमरस आणि अट्रॅक्टिव्ह

Bodycon Dresses Type
येथे क्लिक करा