Sakshi Sunil Jadhav
जिओच्या पोर्टफोलिओमध्ये स्वस्त ते महाग असे सगळे रिचार्ज प्लॅन आहेत. यात व्हॅल्यू प्लॅन, डेटा प्लॅन आणि कॉलिंग प्लॅनचा समावेश आहे.
आज आपण जिओच्या अशाच एका प्लॅनबद्दल सांगणार आहोत, जो कमी किमतीत तब्बल 11 महिने SIM अॅक्टिव्ह ठेवतो.
जिओचा ₹1748 चा हा प्लॅन व्हॅल्यू प्लॅन आहे. हा प्लॅन जिओ अॅप किंवा अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध आहे.
या प्लॅनमध्ये ग्राहकांना एकूण 336 दिवसांची व्हॅलिडिटी मिळते, म्हणजे जवळपास 11 महिने SIM चालू राहते.
तुम्हाला या रिचार्जमध्ये सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंगचा मिळेल.
पूर्ण वैधता कालावधीसाठी ग्राहकांना 3600 SMS मोफत दिले जातात. महत्त्वाची बाब म्हणजे या प्लॅनमध्ये डेटा दिला जात नाही. डेटा वापरायचा असेल तर वेगळा डेटा रिचार्ज करावा लागेल.
तुम्हाला या प्लॅनसोबत JioTV आणि JioAICloud यांसारख्या सुविधा मिळणार आहेत.
ज्यांना फक्त SIM अॅक्टिव्ह ठेवायची आहे किंवा फक्त कॉलिंगसाठी प्लॅन हवा आहे, त्यांच्यासाठी हा प्लॅन उत्तम पर्याय ठरू शकतो.