Sakshi Sunil Jadhav
नवीन वर्षाचं सेलिब्रेशन घरीच करणार असाल, तर पाहुण्यांसाठी झटपट आणि चविष्ट स्नॅक्स म्हणून व्हेज कटलेट हा उत्तम पर्याय ठरेल. कमी वेळात तयार होणारी आणि सर्वांना आवडणारी ही रेसिपी जाणून घ्या.
उकडलेले बटाटे, बीट, गाजर, मटर, स्वीट कॉर्न, बीन्स, कांदा, हिरवी मिरची, आलं, ब्रेड क्रम्ब्स, मैदा, मसाले आणि तेल.
सर्वप्रथम कढई गरम करून त्यात हिरवी मिरची, आले आणि बारीक चिरलेला कांदा परतून घ्या.
पुढे बारीक चिरलेले बीन्स, किसलेलं गाजर आणि बीट घालून थोडावेळ शिजवा. आता उकडलेले मटार आणि स्वीट कॉर्न घालून मिश्रण चांगलं एकजीव करून घ्या.
आता उकडलेले बटाटे मॅश करून मिश्रणात घाला, जेणेकरून कटलेटला परफेक्ट बाइंडिंग मिळेल.
पुढे त्यात चवीनुसार मीठ, लाल तिखट, गरम मसाला आणि चाट मसाला घालून नीट परतून घ्या.
शेवटी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून मिश्रण थंड होऊ द्या. मैद्याचं पातळ पीठ तयार करून कटलेटचे गोळे बनवा, मैद्याच्या पिठात बुडवून ब्रेड क्रम्ब्समध्ये मिक्स करा.
गरम तेलात कटलेट सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्या आणि चटणी किंवा सॉसबरोबर गरमागरम सर्व्ह करा.