Mumbai monorail faced yet another breakdown Saam Tv News
मुंबई/पुणे

अतिभारामुळे मोनोरेल पुन्हा झुकली; आचार्य अत्रे स्थानकाजवळ थांबली, ५० प्रवाशांना उतरवलं | VIDEO

Mumbai monorail faced yet another breakdown: १९ ऑगस्टनंतर पुन्हा मोनोरेल रखडण्याची घटना घडली. आचार्य अत्रेनगर येथे १५ मिनिटे मोनोरेल थांबली होती. ५० प्रवाशांना सुरक्षितरीत्या खाली उतरवण्यात आलं.

Bhagyashree Kamble

  • १९ ऑगस्टनंतर पुन्हा मोनोरेल रखडण्याची घटना घडली.

  • आचार्य अत्रेनगर येथे १५ मिनिटे मोनोरेल थांबली होती.

  • ५० प्रवाशांना सुरक्षितरीत्या खाली उतरवण्यात आलं.

  • एमएमआरडीएने अतिभारामुळे घटना घडल्याचे स्पष्ट करत अहवाल मागवला आहे.

१९ ऑगस्ट रोजी झालेल्या मोनोरेल दुर्घटनेनंतर पुन्हा एकदा मोनोरेल प्रवाशांच्या अतिभारामुळे रखडल्याचे समोर आले आहे. २१ ऑगस्ट रोजी सकाळी आचार्य अत्रेनगर स्थानकाजवळील अँटॉप हिल्स परिसरात मोनोरेल जवळपास १५ मिनिटे थांबली होती. १०९ टन वजन घेऊन धावणारी मोनोरेल पुन्हा रखडली. यावेळी सुमारे ५० प्रवाशांना सुखरूप खाली उतरवण्यात आलं. त्यानंतर मोनोरेल पुन्हा सुरू करण्यात आली.

मंगळवार नंतर पुन्हा गुरूवारी प्रवाशांच्या अतिभारामुळे मोनोरेल रखडली. क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी बसल्यामुळे मेनोरेल रखडली असल्याची माहिती आहे. मंगळवारी अतिभारामुळे मोनोरेल एका बाजूनं झुकली होती. त्यानंतर गुरूवारीही असाच काहीसा प्रकार पाहायला मिळाला. आचार्य रेल्वे स्थानकाजवळ मोनोरेल जवळपास १५ ते २० मिनिटे रखडली होती. त्यानंतर ५० प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आलं.

मोनोरेल घटनेचा अहवाल द्या

१९ ऑगस्ट रोजी चेंबूर ते जेकब सर्कल या मार्गिकेवर धावणाऱ्या २ मोनोरेल गाड्या सायंकाळच्या सुमारास बंद पडल्या होत्या. यातील एका मोनोरेलमध्ये अडकलेल्या प्रवाशांना दरवाजा तोडून क्रेनच्या सहाय्याने बाहेर काढण्यात आले. मोनोरेलमधील प्रवासी भयभीत झाले होते. या धक्कादायक घटनेची गंभीर दखल घेत मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने महा मुंबई मेट्रो संचालन महामंडळाला तीन दिवसांच्या आत घटनेचा सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.

बुधवारी सुरक्षा विभाग प्रमुखांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली. या बैठकीत या घटनेवर सविस्तर चर्चा करण्यात आली. प्राथमिक चौकशीत मोनोरेलमधील प्रवाशांची संख्या आणि अधिक वजनामुळे या दोन्ही घटना घडल्याचे स्पष्ट झाल्याची माहिती सह महानगर आयुक्त अस्तिक कुमार पांडे यांनी दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: भाजप १०० जागा लढेल तर आम्ही ५० पण...; जागावाटपावर शिवसेना नेत्याचं मोठं वक्तव्य

Pandharpur Accident: भुजबळ वस्तीजवळ कार आणि दुचाकीचा भीषण अपघात; दोन्ही वाहनांचा चक्काचूर

Phone: चुकूनही फोन १०० टक्के चार्ज करु नका, अन्यथा...

Maharashtra Live News Update: हातात कोयता घेऊन तरुणाचा दहशत माजवण्याचा प्रयत्न; व्हिडिओ व्हायरल

DRI मुंबईची भव्य कारवाई; २३ कोटींचा ई-कचरा जप्त, मास्टरमाईंड अटक

SCROLL FOR NEXT