मोठी बातमी! मुंबईकरांचं घर घेण्याचं स्वप्न पूर्ण होणार; सरकारकडून महालॉटरी, हक्काचं घर लवकरच मिळणार

Jumbo Housing Lottery in Navi Mumbai: नवी मुंबईत लवकरच सिडकोची जम्बो घरांची लॉटरी जाहीर होणार आहे. सरकार घरांच्या किंमती कमी करण्याचा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. २५ लाखांपर्यंतची स्वस्त आणि दर्जेदार घरे उपलब्ध होणार आहेत.
CIDCO Jumbo Housing Lottery
CIDCO Jumbo Housing LotterySaam Tv News
Published On
Summary
  • नवी मुंबईत लवकरच सिडकोची जम्बो घरांची लॉटरी जाहीर होणार आहे.

  • सरकार घरांच्या किंमती कमी करण्याचा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे.

  • २५ लाखांपर्यंतची स्वस्त आणि दर्जेदार घरे उपलब्ध होणार आहेत.

  • हजारो कुटुंबांचे घराचे स्वप्न साकार होणार आहे.

मुंबई आणि उपनगरांत स्वतःचं घर घेणं हे हजारो लोकांचं स्वप्न असतं. मात्र वाढत्या घरांच्या किंमतींमुळे सामान्यांना हे स्वप्न पूर्ण करणं कठीण ठरतं. अशावेळी म्हाडा आणि सिडकोच्या माध्यमातून सरकार स्वस्त घरं उपलब्ध करून देत असतं. आता पुन्हा एकदा हजारो कुटुंबांना नवी मुंबईत घर मिळण्याची संधी उपलब्ध होणार आहे. सरकार सिडकोच्या घरांबाबत मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, नवी मुंबईत लवकरत सिडकोकडून घरांची जम्बो लॉटरी जाहीर होणार आहे. सरकारने घरांच्या किंमतींबाबत लवकर निर्णय घेतल्यास सिडको जम्बो घरांची लॉटरी काढू शकते, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. सिडकोच्या घरांच्या किमती बदलांच्या निर्णयाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली लवकरच बैठक आयोजित केली जाणार आहे. या बैठकीत सिडकोच्या घरांच्या किंमती कमी होण्याची शक्यता आहे.

CIDCO Jumbo Housing Lottery
बीडमध्ये घरगुती वाद टोकाला; भररस्त्यावर तरूणाच्या डोक्यात कोयता हाणला, मेंदूचा चेंदामेंदा झाला

बैठक झाल्यानंतर यात निर्णय झाल्यास लवकरच सिडको प्रशासनाकडूनह महालॉटरी जाहीर करण्यात येणार असल्याची शक्यता आहे.

लॉटरीसंदर्भात सिडकोच्या अधिकाऱ्यांनी माहिती दिली आहे. 'सरकारने घरांच्या किमतीबाबत लवकरच तोडगा काढल्यास लॉटरी काढण्याची पूर्ण तयारी आहे. सिडकोत २५ लाखांपर्यंतची घरे उपलब्ध आहेत. बाजारमुल्यांच्या तुलनेत सिडकोच्या घरांची किंमत कमी असतील', असं अधिकारी म्हणाले.

CIDCO Jumbo Housing Lottery
पालघरमध्ये शिंदे गटाला जबरदस्त झटका, बडे नेते भाजपच्या वाटेवर; प्रमुख पदाधिकारीही कमळ हाती घेणार

सिडकोच्या अधिकाऱ्यांनी हेही स्पष्ट केलं की, खासगी बिल्डरच्या घरांच्या तुलनेत सिडकोची घरे दर्जेदार आणि अधिक चांगली आहेत. त्यामुळे या जम्बो लॉटरीची आतुरता हजारो कुटुंबांना लागली आहे. एकदा ही लॉटरी जाहीर झाली की अनेकांचं घराचं स्वप्न साकार होणार आहे.

CIDCO Jumbo Housing Lottery
'नोरा फतेहीसारखी फिगर बनव' ३ तास जिम अन् उपाशी ठेवलं; पतीकडून पत्नीचा अतोनात छळ

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com