'नोरा फतेहीसारखी फिगर बनव' ३ तास जिम अन् उपाशी ठेवलं; पतीकडून पत्नीचा अतोनात छळ

Bride Tortured by Husband: विवाहित महिलेनं पतीविरोधात धक्कादायक आरोप केले. पती तिला नोरा फतेहीसारखी दिसण्यासाठी जबरदस्ती करायचा. महिलेकडून पतीविरोधात गुन्हा दाखल.
Ghaziabad Woman Files Case against Husband
Ghaziabad Woman Files Case against HusbandSaam TV News
Published On
Summary
  • गाझियाबादमध्ये विवाहित महिलेनं पतीविरोधात धक्कादायक आरोप केले.

  • पती तिला नोरा फतेहीसारखी दिसण्यासाठी जबरदस्ती करायचा.

  • सासरच्या मंडळींनी हुंड्यासाठी व मानसिक छळ केल्याचा आरोप.

  • पोलिसांकडून प्रकरणी पुढील तपास सुरू आहे.

गाझियाबादमधून एक विचित्र प्रकरण आलंय. एका विवाहित महिलेनं तिच्या पतीवर बॉलिवूड अभिनेत्री नोरा फतेहीसारखे दिसण्यासाठी दबाव आणण्याचा आणि तिला अनेक तास जिममध्ये जाण्यास भाग पाडण्याचा आरोप केला आहे. पतीच्या छळाला कंटाळून विवाहित महिलेनं पोलीस ठाणे गाठत तक्रार दाखल केली. तसेच सासरच्या मंडळींवरही छळ केल्याचा आरोप केला आहे. सध्या पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, एप्रिल महिन्यात पीडित महिलेची मेरठ येथील तरूणाशी विवाह झाला होता. लग्नादरम्यान, तरूणीच्या कुटुंबाने पाण्यासारखा पैसा खर्च केला होता. लग्न मोठ्या थाटामाटात पार पडले होते. तरूणीच्या कुटुंबाने महागड्या वस्तूंसह रोख रक्कमही दिली होती. मात्र, लग्नानंतर तिच्या सासरच्या मंडळींनी हुंड्यासाठी छळ करण्यास सुरूवात केली. तसेच तिला मानसिक त्रास दिला.

Ghaziabad Woman Files Case against Husband
लेकीचा लग्नास नकार, वडिलांनी झोपेतच मुलीला संपवलं; नंतर स्वत: नस कापली; हिंगोलीत खळबळ

विवाहित महिलेचा आरोप आहे की, तिचा नवरा इतर अभिनेत्रींसह महिलांचे आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडिओ पाहायचे. विवाहित महिलेनं पोलिसांना सांगितले की, तिचा नवरा तिला टोमणे मारायचा. लग्न झाल्यानंतर त्याचे आयुष्य उद्ध्वस्त झाले आहे. त्याला नोरा फतेहीसारखी सुंदर पत्नी हवी होती. नोरा फतेहीसारखी दिसण्यासाठी नवरा बायकोला जबरदस्ती जिममध्ये घालवायचा. तसेच व्यायाम करण्यासाठी दबाव टाकायचा, यासह उपाशी ठेवायचा.

Ghaziabad Woman Files Case against Husband
सांगली, सातारा, कोल्हापूर; काळेकुट्ट ढगांची वाटचाल पश्चिम महाराष्ट्राकडे, कुठे कशी परिस्थिती?

सासरच्या मंडळींनीही पीडितेला छळलं. याच छळाला कंटाळून महिलेनं माहेर गाठलं. जुलैमध्ये परतल्यानंतर सासरच्यांनी तिला घरात प्रवेश दिला नाही. यानंतर पीडित महिलेनं पोलीस ठाणे गाठत सासरच्या मंडळींविरोधात तक्रार दाखल केली. सध्या पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.

Ghaziabad Woman Files Case against Husband
सोन्याच्या भावाला चकाकी! १० तोळं सोनं ४,३०० रूपयांनी स्वस्त; पाहा आजचे लेटेस्ट दर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com