Classrooms Locked in Malad School Saam
मुंबई/पुणे

विद्यार्थ्यांना गॅलरीत बसून शिक्षण घेण्याची वेळ, मुंबईतील हायस्कूलमधील धक्कादायक प्रकार; कारण काय?

Classrooms Locked in Malad School: मालाड आप्पा पाडा परिसरात असलेल्या स्वामी विवेकानंद हायस्कूल या शाळेमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना शाळेतील गॅलरीमध्ये बसून शिकण्याची वेळ आली आहे.

Bhagyashree Kamble

संजय गडदे, साम टिव्ही

मुंबईच्या मालाड पूर्वेतील आप्पा पाडा परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. स्वामी विवेकानंद हायस्कूलमधील विद्यार्थ्यांना गेल्या चार दिवसांपासून वर्गखोल्यांऐवजी शाळेच्या गॅलरीत बसून शिक्षण घ्यावे लागत आहे. मोकळ्या जागेत बसून शिक्षण घ्यावे लागत असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षण आणि आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शाळेचे दोन ट्रस्टी यांच्यात काही दिवसांपासून वाद सुरू होते. ही परिस्थिती आणखी चिघळत गेली. याच वादामुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याची माहिती समोर आली आहे. सध्या दोन्ही ट्रस्टींमधील वादाचा चौकशीचा मुद्दा चॅरिटी कमिशनकडे प्रलंबित आहे. या वादामध्ये एका ट्रस्टीने शाळेतील अनेक क्लासरूमला टाळे लावले.

ट्रस्टीने अनेक क्लासरूमला टाळे लावल्यामुळे मोठ्या संख्येनं विद्यार्थ्यांची गैरसोय झाली. विद्यार्थ्यांना गॅलरीमध्ये किंवा मोकळ्या जागेत शिकावे लागत आहे. या प्रकारामुळे पालक, विद्यार्थी आणि शिक्षकांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण आहे. थंडीचा काळ आणि परीक्षांचा हंगाम जवळ आलेला असताना विद्यार्थ्यांना अशा असुरक्षित जागी शिकावं लागत आहे.

यामुळे विद्यार्थ्यांचं नुकसान होत आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नुकसान होऊ नये त्यामुळे शाळेत शिकवणारे शिक्षक आणि प्रिन्सिपलकडून प्रशासनाला विनंती करण्यात आली आहे. लवकरात लवकर यातून तोडगा काढावा, अशी मागणी होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime: बायकोचं बहिणीच्या नवऱ्यासोबत अनैतिक संबंध, नवरा सासुरवाडीत गेला असता गोळ्या झाडून हत्या

Vasai: वसईत भाजप-बविआ कार्यकर्ते भिडले, पोलिसांकडून लाठीचार्ज; VIDEO समोर

चंद्रपुरात काँग्रेस बाजी मारणार? विजय वड्डेटीवारांची खेळी यशस्वी ठरली

Municipal Elections Voting Live updates: उल्हासनगर महानगरपालिका निवडणूक; पॅनल क्रमांक 18 मधील मत पेट्या घेऊन जाताना गोंधळ

Saam TV exit poll: परभणीत सर्वात ठाकरेसेना ठरणार मोठा पक्ष; सत्ता कोणाच्या हाती येणार?

SCROLL FOR NEXT