Mumbai Local Mega Block Saam TV
मुंबई/पुणे

Mumbai Local Mega Block: रविवारी मध्य आणि ट्रान्स हार्बर रेल्वे मार्गावर ५ तासांचा मेगाब्लॉक, वेळापत्रक पाहूनच घराबाहेर पडा

Mumbai Local Train Mega Block: मध्य आणि ट्रान्स हार्बर रेल्वे मार्गावर येत्या रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होण्याची शक्यता आहे. अशामध्ये प्रवाशांनी वेळापत्रक पाहूनच घराबाहेर पडावे.

Priya More

मध्य आणि ट्रान्स हार्बर रेल्वे मार्गावर येत्या २० एप्रिल २०२५ म्हणजे रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. उपनगरीय विभागांवर विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई आणि विद्याविहार दरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावर सकाळी १०.५५ वाजल्यापासून ते दुपारी ३.५५ वाजेपर्यंत म्हणजे ५ तासांचा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी १०.४८ वाजल्यापासून ते दुपारी ३.४५ वाजेपर्यंत सुटणाऱ्या डाऊन धीम्या मार्गावरील लोकलसेवा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई आणि विद्याविहार स्थानकादरम्यान डाऊन जलद मार्गावर वळवल्या जातील. भायखळा, परळ, दादर, माटुंगा, शीव आणि कुर्ला रेल्वे स्थानकांवर लोकल थांबतील आणि विद्याविहार स्थानकावर डाऊन धीम्या मार्गावर पुन्हा वळवल्या जातील. ब्लॉक दरम्यान मशीद, सँडहर्स्ट रोड, चिंचपोकळी आणि करी रोड या स्थानकांवर लोकल थांबणार नाहीत.

घाटकोपर येथून सकाळी १०.१९ वाजल्यापासन ते दुपारी ३.५२ वाजेपर्यंत सुटणाऱ्या अप धीम्या मार्गावरील लोकल विद्याविहार आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई रेल्वेस्थानकादरम्यान अप जलद मार्गावर वळवल्या जातील. कुर्ला, शीव, माटुंगा, दादर, परळ आणि भायखळा रेल्वे स्थानकांवर लोकल थांबतील. ब्लॉक दरम्यान करी रोड, चिंचपोकळी, सँडहर्स्ट रोड आणि मशीद या रेल्वे स्थानकांवर मेगाब्लॉक दरम्यान लोकल थांबणार नाहीत.

डाऊन धिम्या मार्गावर मेगाब्लॉक सुरू होण्यापूर्वी सीएसएमटी रेल्वे स्थानकावरून शेवटची लोकल सकाळी १०.०७ वाजता सुटेल. ब्लॉक संपल्यानंतर पहिली लोकल सीएसएमटी रेल्वे स्थानकावरून दुपारी ३.५७ वाजता सुटेल. तर अप धीम्या मार्गावर मेगाब्लॉक पूर्वची शेटवची लोकल कल्याण रेल्वे स्थानकावरून सकाळी ९.१३ वाजता सुटेल. तर ब्लॉक संपल्यानंतरची पहिली लोकल कल्याण रेल्वे स्थानकावरून दुपारी ३.१० वाजता सुटेल.

तर, ठाणे आणि वाशी/नेरुळ दरम्यान अप आणि डाऊन ट्रान्स हार्बर मार्गावर सकाळी ११.१० वाजल्यापासून ते संध्याकाळी ४.१० वाजेपर्यंत तब्बल ५ तासांचा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. ठाण्याहून वाशी/नेरुळ/पनवेल येथे जाणाऱ्या डाऊन हार्बर मार्गावरील लोकलसेवा सकाळी १०.३५ वाजल्यापासून ते संध्याकाळी ४.०७ वाजेपर्यंत रद्द राहतील. पनवेल/नेरुळ/वाशी ते ठाणे अप हार्बर मार्गावरील लोकलसेवा १०.२५ वाजता वाशी ते नेरुळ २.०९ वाजता रद्द करण्यात येतील. प्रवाशांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासनाला सहकार्य करावे अशी विनंती मध्ये रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

5G Smartphones: कमी किमतीत स्वस्तात स्वस्त मोबाईल, १० हजार रुपयांखालील सर्वोत्तम ५जी स्मार्टफोन्स

Chronic Kidney Symptoms: क्रॉनिक किडनी डिजीजची सुरुवात कशी होते? महिलांनी अजिबात दुर्लक्षित करु नका

Maharashtra Live News Update: सतिश उर्फ खोक्याला जामीन मंजूर

Nandurbar : नंदुरबार जिल्ह्यातील तापी नदीच्या पाणी पातळीत वाढ; १५ गावांना सतर्कतेचा इशारा | VIDEO

Couple Romance News: धावत्या दुचाकीवर अश्लील चाळे, पुढे बसून बॉयफ्रेंडला मिठी मारली अन्...; कपलचा रोमान्स करतानाचा VIDEO चर्चेत

SCROLL FOR NEXT