Mumbai Local Mega Block Saam TV
मुंबई/पुणे

Mumbai Local: तिन्ही मार्गावरील मेगाब्लॉक रद्द, प्रवाशांचे हाल लक्षात घेता रेल्वे प्रशासनाचा निर्णय

Mumbai Train Disruptions: रेल्वेच्या तिन्ही मार्गावर घेण्यात आलेला आजचा मेगाब्लॉक रद्द करण्यात आला आहे. रेल्वे प्रवाशांचे होणारे हाल लक्षात घेता रेल्वे प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता तिन्ही मार्गावरील लोकलसेवा हळूहळू पूर्वपदावर येत आहे.

Priya More

मुंबईमध्ये लोकलचा खोळंबा झाला आहे. रेल्वेच्या तिन्ही मार्गावरील लोकलसेवा विस्कळीत झाली आहे. त्यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहे. मध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकचा कालावधी संपला नाही. हार्बर रेल्वे मार्गावरील कोणार्क पूलाचे काम सुरू असल्याचे ब्लॉक संपला नाही. तर पश्चिम रेल्वे मार्गावर देखील लोकलचा खोळंबा झाला आहे. त्यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहे. प्रत्येक रेल्वे स्थानकावर प्रवाशांची मोठी गर्दी झाली आहे. या सर्वबाबी लक्षात घेता आता रेल्वे प्रशासनाने तिन्ही मार्गावरील ब्लॉक रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

रेल्वे प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, '१० वाजून ९ मिनिटांनी मध्य, हार्बर आणि पश्चिम या तिन्ही रेल्वे मार्गांवरील ब्लॉक रद्द करण्यात आले आहेत. ब्लॉक रद्द केल्यामुळे तिन्ही रेल्वे मार्गावरील लोकलसेवा सुरळीत होतील. गर्डर सुरक्षित आहे. ट्रेन ३० किमी प्रतितास वेगाने धावतील.' रेल्वे प्रशासनाने मेगाब्लॉक रद्द केल्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. आता लोकलसेवा हळूहळू सुरळित होईल. २६ जानेवारी आणि रविवार असल्यामुळे काही कार्यक्रमांसाठी मुंबईकर घराबाहेर पडले पण लोकलच्या खोळंब्यामुळे त्यांचे हाल झाले.

मध्य रेल्वे -

मुंबईमध्ये मध्य रेल्वे मार्गावर कर्नाक पुलावर गर्डर बसवण्याचे काम सुरू आहे. यासाठी दोन दिवसाचा रात्रकालीन ब्लॉक घेण्यात आला होता. पण हे काम पूर्ण झाले नाही. कर्नाक पूलावर गर्डर बसवताना एका कर्मचाऱ्याला दुखापत झाली. तसंच गर्डरची अलाइमेंट देखईल चुकली होती. त्यामुळे मुंबई महानगर पालिकेकडून ब्लॉक संपल्याची घोषणा करण्यात आली नव्हती. त्यामुळे मध्य रेल्वेवरील लोकल भायखळा, दादर आणि कुर्लापर्यंतच सुरू होत्या. ठाण्यावरून सीएसएमटीकडे जाणाऱ्या लोकल रद्द करण्यात आल्या होत्या.

हार्बर रेल्वे -

हार्बर रेल्वे मार्गावर कोणार्क पुलाचे काम सुरु होते. या कामामुळे हार्बर रेल्वे देखील विस्कळीत झाली होती. प्रवाशांना कोणतीही पूर्व कल्पना देण्यात आली नाही. त्यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. हार्बर मार्गावर फक्त वडाळ्यापर्यंत लोकल सुरू होती. त्यामुळे मुंबईकरांनी पुढचा प्रवास रेल्वे रुळावरून चालत केला. त्यामुळे प्रवासी प्रचंड नाराज होते.

पश्चिम रेल्वे -

पश्चिम रेल्वे मार्गावर देखील मेगाब्लॉक होता. पश्चिम रेल्वे मार्गावरील लोकलसेवाही उशीराने सुरू होत्या. पश्चिम रेल्वेच्या लोकल १५ ते २० मिनिटं उशिराने धावत होत्या.चर्चगेटला जाणाऱ्या लोकल नसल्याने अंधेरी रेल्वे स्थानकावर प्रवाशांची मोठी गर्दी झाली होती. चर्चगटला जाणाऱ्या लोकल फक्त अंधेरी रेल्वे स्थानकापर्यंतच चालवल्या जात होत्या. त्यामुळे सर्वच रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची प्रचंड गर्दी झालेली पाहायला मिळाली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Janhvi Kapoor: वेडिंग सीझनसाठी परफेक्ट आहे जान्हवीचा 'हा' लूक तुम्हीही करु शकता रिक्रिएट

१८० किमी वेगाने धावणारी वंदे भारत स्लीपर ट्रेन; लोको पायलटच्या केबिनमधून सुवर्ण क्षण कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ पाहून थक्क व्हाल

Rupali Bhosle Serial: अभिनेत्री रूपाली भोसलेची पहिली मराठी मालिका कोणती होती?

Lasun Shev Recipe: नाश्त्यासाठी बनवा कुरकुरीत अन् झणझणीत लसूण शेव, सोपी रेसिपी वाचा

Maharashtra Live News Update: मरीन लाईन्स परिसरातील इमारतीला आग

SCROLL FOR NEXT