Manmad-Pune railway : कोल्ड ड्रिंक्स घेऊन जाणारा ट्रक रेल्वे ट्रॅकवर कोसळला; मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

Manmad-Pune Railway News : कोल्ड ड्रिंक्स घेऊन जाणारा ट्रक रेल्वे ट्रॅकवर कोसळला. त्यानंतर मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली. या अपघातानंतर पोलीस आणि रेल्वे अधिकारी घटनास्थळी पोहोचले आहेत.
Manmad-Pune railway : कोल्ड ड्रिंक्स घेऊन जाणारा ट्रक रेल्वे ट्रॅकवर कोसळला; मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत
Published On

अजय सोनवणे, साम टीव्ही

नाशिक : मध्य रेल्वेच्या मनमाड-पुणे रेल्वे ट्रॅकवर मोठी दुर्घटना घडली आहे. मध्य रेल्वेच्या मनमाड-पुणे रेल्वे ट्रॅकवर पुलावरून ट्रक खाली कोसळल्याची घटना घडली आहे. अंकाई रेल्वे पुलावरून कोल्ड ड्रिंक्सचा ट्रक कोसळल्याची घटना घडली आहे. या दुर्घटनेनंतर रेल्वे वाहतूक खोळंबली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मध्य रेल्वेवरील मनमाड-पुणे रेल्वे ट्रॅकवर कोल्ड ड्रिंक्सचा ट्रक कोसळल्याची घटना घडली. अंकाई पुलावरून कोल्ड ड्रिंक्सचा ट्रक रेल्वेच्या ट्रॅकवर कोसळल्याची घटना घडली आहे. या अपघातानंतर मनमाड-पुण्याची रेल्वे वाहतूक खोळंबली आहे. या अपघाताची माहिती मिळताच पोलीस आणि रेल्वे अधिकारी घटनास्थळी पोहोचले आहेत.म

Manmad-Pune railway : कोल्ड ड्रिंक्स घेऊन जाणारा ट्रक रेल्वे ट्रॅकवर कोसळला; मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत
Manmad Bajar Samiti : दोन दिवसाच्या बंदनंतर मनमाड बाजार समिती सुरू; शेतकऱ्यांना दिलासा

मनमाडकडून पुण्याकडे जाणाऱ्या रेल्वे ट्रॅकवर हा कोल्ड ड्रिंक्स घेऊन जाणारा ट्रक कोसळला. या अपघातानंतर रेल्वेची वाहतूक सुरळीत करण्यासाठी क्रेन आणली आहे. रेल्वे ट्रॅकवर झालेल्या अपघातानंतर ट्रकमधील साहित्य काढण्याचे काम सुरू आहे. रेल्वे ट्रॅकवर कोसळलेला हा ट्रक बाहेर काढण्यास दोन ते तीन तास लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. रेल्वे ट्रॅकवरून या ट्रकमधील साहित्य बाजूला करण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे.

Manmad-Pune railway : कोल्ड ड्रिंक्स घेऊन जाणारा ट्रक रेल्वे ट्रॅकवर कोसळला; मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत
Pushpak Express Railway Accident जळगाव जिल्ह्यातील पाचोऱ्याजवळील रेल्वे अपघाताची घटना दुर्दैवी; उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून दु:ख व्यक्त

रेल्वे ट्रॅकवर झालेल्या या अपघातामुळे अंकाई रेल्वे पुलावर वाहतूक कोंडी झाली आहे. अंकाई पुलाखाली झालेल्या अपघातात मात्र कोणीही जखमी झालेलं नाही. अपघात होताच ट्रक चालकाने झाडांचा आधार घेत जीव वाचवला. अपघाताची माहिती मिळताच रेल्वे प्रशासनाचे अधिकारी आणि मनमाड पोलीस घटनास्थळी पोहोचले. या अपघातामुळे रेल्वेची पुण्याकडे जाणारी वाहतूक मात्र विस्कळीत झाली आहे.

दरम्यान, या अपघातानंतरही पुणे-मनमाड रेल्वे ट्रॅक सुरक्षित आहे. प्रवासी गाडी मनमाडकडे गेली आहे. तर पुणे-मनमाड रेल्वेची अप लाईन विस्कळीत झाली आहे.

Manmad-Pune railway : कोल्ड ड्रिंक्स घेऊन जाणारा ट्रक रेल्वे ट्रॅकवर कोसळला; मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत
Manmad News: मनमाडमध्ये सापडला रत्नाकर गुट्टे यांचा नातू, इतक्या दिवस कुठे होता?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com