Manmad News: मनमाडमध्ये सापडला रत्नाकर गुट्टे यांचा नातू, इतक्या दिवस कुठे होता?

MLA Ratnakar Gutte Grandson Sanket Gutte: आमदार रत्नाकर गुट्टे यांचा नातू पुण्यातून बेपत्ता झाला होता तो मनमाड येथे सापडला. संकेत गुट्टेने त्याच्यासोबत नेमकं काय घडलं याची धक्कादाक माहिती पोलिसांना दिली.
Nashik News: मनमाडमध्ये सापडला रत्नाकर गुट्टे यांचा नातू, इतक्या दिवस कुठे होता?
MLA Ratnakar Gutte Grandson Sanket GutteSaam Tv
Published On

अजय सोनवणे, मनमाड

गंगाखेडचे आमदार रत्नाकर गुट्टे यांचा बेपत्ता असलेला नातू अखेर सापडला. पाचव्या दिवशी सुमित गुट्टे मनमाडमध्ये सापडला. १ जानेवारीला सुमित पु्ण्यातून बेपत्ता झाला होता. पोलिस त्याचा शोध घेत होते. अखेर आज तो मनमाडमध्ये सापडला. मनमाड पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं असून त्याला घेण्यासाठी आई आणि पत्नी मनमाडमध्ये आले आहेत.

पुण्याच्या आळंदी येथे राहणारा संकेत गुट्टे हा नोकरीच्या कामानिमित्त पुण्यात आला होता. काम आटोपल्यानंतर संध्याकाळच्या सुमारास घरी जाण्यासाठी तो रिक्षात बसला असता सोबत रिक्षात बसलेल्या तरुणीने त्याला काही तरी टोचले. त्यानंतर तो बेशुद्ध झाला आणि तो आज सकाळी थेट मनमाड बस स्थानकात पोहचला.

Nashik News: मनमाडमध्ये सापडला रत्नाकर गुट्टे यांचा नातू, इतक्या दिवस कुठे होता?
Manmad News : माथेफिरूने जाळल्या ६ मोटारसायकली; मनमाड शहरातील घटना सीसीटीव्हीत कैद

जेव्हा संकेत गुट्टेला शुद्ध आली तेव्हा तो पुणे रेल्वे स्थानक कुठे आहे हे विचारू लागला. मात्र हे मनमाड स्थानक असल्याचे त्याला नागरिकांनी सांगितले. तेव्हा संकेत रिक्षात बसून थेट मनमाड पोलिस ठाण्यात गेला. त्याने पोलिसांना घडलेला सर्व प्रकार सांगितला तेव्हा पोलिसही चक्रावले. पोलिसांनी सांगवी पोलिस आणि त्याच्या कुटुंबीयांशी संपर्क केल्यावर सांगवी पोलिस आणि संकेतची आई आणि पत्नी त्याला घ्यायला मनमाड येथे पोहचले. मनमाड पोलिसांनी संकेतला त्याच्या कुटुंबीयांच्या आणि सांगवी पोलिसांच्या हाती सोपवले.

Nashik News: मनमाडमध्ये सापडला रत्नाकर गुट्टे यांचा नातू, इतक्या दिवस कुठे होता?
Manmad-Indore Railway: मनमाड-इंदौर रेल्वेमार्ग कसा असेल? कुठून जाणार, कधीपर्यंत सेवेत आणि फायदा काय?

सुमित गुट्टे हा पिंपरी-चिंचवडनजीकच्या पिंपळे निलख येथे त्यांच्या निवासस्थानातून बाहेर पडल्यानंतर बेपत्ता झाला. सुमित हा ३१ डिसेंबरला सकाळी हॉस्पिटलमध्ये जाऊन येतो म्हणून घराबाहेर पडला पण तो घरी परत न आल्यामुळे त्यामुळे कुटुंबीय चिंतेत आले आहेत. याप्रकरणी सुमित हा मिसिंग असल्याची तक्रार सांगवी पोलिस ठाण्यात दाखल केली होती. अखेर संकेत सापडला असल्यामुळे कुटुंबीयांनी सुटकेचा निश्वास सोडला.

Nashik News: मनमाडमध्ये सापडला रत्नाकर गुट्टे यांचा नातू, इतक्या दिवस कुठे होता?
Manmad-Indore Railway: केंद्राचं महाराष्ट्राला मोठं गिफ्ट; मनमाड-इंदौर रेल्वे धावणार, शेतकऱ्यांचं होणार भलं

पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले असता सुमीत घराबाहेर पडल्यानंतर पुणे रेल्वे स्थानकावर गेला. त्याठिकाणच्या एटीएममधून त्याने पैसे कढाले आणि पुढील प्रवासासाठी तो निघून गेला असल्याचे सीसीटीव्ही फुटेजमधून उघड झाले. गुरूवारी दुपारी तो पुणे रेल्वे स्थानक परिसरामध्ये फिरत असल्याचे सीसीटीव्हीत दिसला. पण त्यानंतर तो कुठे गेला हेच समजले नाही. आता पोलिस या सीसीटीव्हीच्या आधारेच तपास करत आहेत.

Nashik News: मनमाडमध्ये सापडला रत्नाकर गुट्टे यांचा नातू, इतक्या दिवस कुठे होता?
Manmad Rain : पावसाअभावी मका पिक पडू लागली पिवळी; मनमाड परिसरातील चित्र

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com