
जळगावमध्ये पुष्पक एक्स्प्रेसचा भीषण अपघात झाला. या अपघातात १२ प्रवाशांचा मृत्यू झालाय. या भीषण अपघातानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दु:ख व्यक्त केलंय. जळगाव जिल्ह्यात पाचोरा येथे परधाडे रेल्वे स्टेशननजीक रेल्वे अपघातात प्रवाशांचा मृत्यू झाल्याची घटना अत्यंत दुर्दैवी आणि वेदनादायी असल्याचं सांगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्याबद्दल दु:ख व्यक्त केले आहे.
अपघाताची घटना कळताच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तातडीने जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधून अपघाताची माहिती घेतली. तसेच जखमी प्रवाशांना तातडीची मदत व मोफत वैद्यकीय उपचारांची व्यवस्था करण्याचे निर्देश दिलेत. मंत्री गिरीश महाजन स्वत: घटनास्थळी पोहचले जिल्हाधिकारी, पोलीस अधिक्षकांसह जिल्हा यंत्रणा युद्धपातळीवर बचाव आणि मदतकार्य करीत आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोस येथून जिल्हा प्रशासनाच्या संपर्कात आहेत. त्यांनी अपघाताची माहिती घेऊन प्रशासनाला मदत कार्यासंदर्भात आवश्यक निर्देश दिलेत. जिल्हा प्रशासन आणि रेल्वे यंत्रणा समन्वयातून बचाव आणि मदतकार्य करीत आहे. मदतकार्य रात्रीही सुरू राहणार आहे. त्यासाठी ग्लासकटर, फ्लडलाईट्सह आवश्यक यंत्रणा अपघातस्थळी पोहचली आहे.
मृतांच्या वारसांना राज्य शासनाकडून पाच लाख रुपयांची मदत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केली आहे, अशी माहितीही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. पुष्पक एक्स्प्रेसमधील प्रवाशांमध्ये ट्रेनमध्ये आग लागल्याची अफवा पसरली होती. त्यानंतर काही प्रवाशांनी रेल्वेची साखळी ओढत रेल्वेतून उड्या मारल्या. त्यानंतर दुसऱ्या बाजुने येणाऱ्या एका दुसऱ्या एक्स्प्रेसने प्रवाशांना उडवलं. या अपघातात १२ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे.
यात ८ पुरुष, ३ महिला, १ बालकाचा दुर्दैवी मृत्यू झालाय. जळगावच्या परधाडेजवळ झालेल्या अपघातातील मृतांची नावे समोर आली आहेत. या अपघातात मृत पावलेले बहुतांश व्यक्ती नेपाळ आणि उत्तर प्रदेशमधील आहेत.
कमला नवीन भंडारी (४३) कुलाबा
लच्छीराम पासी (४०) नेपाळ
हिनू नंदराम विश्वकर्मा (११) नेपाळ
बाबु खान (२७) उत्तर प्रदेश
इम्तियाज अली (३५) उत्तर प्रदेश
नसरुद्दीन बहुद्दीन सिद्दिकी (१९) उत्तर प्रदेश
जवकला भटे जयकडी (८०) नेपाळ
अन्य दोघांची ओळख पटली नाही, अशी मृतांची नावे आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.