Jalgaon Railway Accident: पुष्पक एक्स्प्रेसमधून प्रवाशांच्या उड्या, नेमका कसा घडला रेल्वे अपघात? जाणून घ्या घटनाक्रम

Pushpak Express Train Accident: जळगाव येथील परधाडे रेल्वे स्थानकाजवळ भीषण अपघात झालाय. पुष्पक एक्स्प्रेसमध्ये आग लागल्याच्या अफवेने प्रवाशांनी ट्रेनमधून उड्या मारल्या.
Pushpak Express Train
Pushpak Express Train AccidentSaam Tv
Published On

जळगाव येथील परधाडे रेल्वे स्थानकाजवळ रेल्वेचा भीषण अपघात झालाय. या रेल्वे अपघातात अनेक प्रवाशांचा मृत्यू झालाय. जळगाव जिल्ह्यातील पुष्पक रेल्वेमधील प्रवाशांमध्ये ट्रेनमध्ये आग लागल्याची अफवा पसरली होती. त्यानंतर काही प्रवाशांनी रेल्वेची साखळी ओढत रेल्वेतून उड्या मारल्या. त्यानंतर दुसऱ्या बाजुने येणाऱ्या एका दुसऱ्या एक्स्प्रेसने प्रवाशांना उडवलं. यात अनेकांचा मृत्यू झालाय. आतापर्यंत आठ जणांचा मृत्यू झाल्याची पुष्टी झाली असून ३० हून अधिक लोक जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान हा अपघात नेमका कसा झाला याची माहिती घेऊ.

नांद्रा माहेजीदरम्यान वडगाव गावाजवळ जळगावकडून पाचोर्‍याकडे येणाऱ्या भरधाव पुष्पक एक्सप्रेसच्या प्रवासी बोगीला आग लागल्याचे कळताच बोगीतील प्रवाशांनी उड्या मारल्या. त्याचवेळी पाचोराकडून जळगावकडे जाणाऱ्या पवन एक्सप्रेसने उड्या मारणाऱ्या प्रवाशांना चिरडलं. यात २० ते ३० जण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. दोन्ही गाड्या सुमारे दीड तासापासून घटनास्थळी थांबून आहेत.

Pushpak Express Train
Jalgaon Train Accident: जळगावात मोठा रेल्वे अपघात; एक्स्प्रेसमध्ये आगीच्या भीतीनं प्रवाशांनी मारल्या उड्या, समोरून येणाऱ्या ट्रेननं उडवलं!

दरम्यान पुष्पक एक्सप्रेसमधून उड्या मारल्यानंतर जखमी असलेल्या नागरिकांना कर्नाटक एक्सप्रेसमधून जळगाव रेल्वे स्थानकावर आणण्यात येत आहे. जखमी प्रवाशांना घेऊन जाण्यासाठी जळगाव रेल्वे स्थानकाबाहेर रुग्णवाहिक तैनात करण्यात आल्या असून या ठिकाणी डॉक्टरही तैनात करण्यात आले आहे.

Pushpak Express Train
Coldplay Concert साठी मध्य रेल्वे सोडणार विशेष गाड्या; मुंबई आणि अहमदाबाद दरम्यान धावणार ४ एसी स्पेशल ट्रेन, जाणून घ्या वेळ आणि थांबा

जळगावच्या परधाडे गावाजवळ हा अपघात घडला. पुष्पक एक्स्प्रेस ही लखनऊकडून मुंबईकडे येत होती. एक्स्प्रेस परधाडे गावाजवळ आली असताना लोकोपायलटनं अचानक ब्रेक दाबले. त्यामुळं ठिणग्या उडाल्या, त्यामुळे पुष्पक एक्स्प्रेसमधील काही डब्यांमधून धूर निघू लागला. त्यातच एक्स्प्रेसला आग लागल्याची अफवा प्रवाशांमध्ये पसरली. आग लागल्याच्या भीतीनं पुष्पक एक्स्प्रेसमधून ३५ ते ४० प्रवाशांनी रेल्वे ट्रॅकवर उड्या मारल्या. त्याचवेळी विरुद्ध दिशेच्या रुळांवरून बेंगळुरू एक्स्प्रेस आली त्या एक्स्प्रेसनं रेल्वे ट्रॅकवर उतरलेल्या काही प्रवाशांना उडवलं. यात अनेकांचा मृत्यू झालाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com