Railway Mega Block
Railway Mega BlockYandex

Mumbai Local Mega Block: प्रवाशांचे मेगा हाल! मध्य, हार्बर, पश्चिम रेल्वेचा खोळंबा, नागरिकांची गैरसोय, स्थानकांवर गर्दीच गर्दी

Railway Mega Block: मुंबईत मेगाब्लॉकमुळे लोकल रेल्वेसेवा विस्कळीत झाली आहे. मध्य व हार्बर मार्गावरील वाहतूक ठप्प असून, पश्चिम रेल्वे उशिराने धावत आहे. कर्नाक पुलावर गर्डर बसवण्याचे काम अद्याप पूर्ण न झाल्याने अडचणी वाढल्या आहेत.
Published on

मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला जाणाऱ्या रेल्वे सेवांमध्ये मोठा विलंब होत आहे. ठाण्यावरून येणाऱ्या गाड्या कुर्ला स्थानकात थांबवून रिकाम्या केल्या जात आहेत, तसेच पनवेलवरून येणाऱ्या गाड्यांचेही संचालन कुर्ल्यापर्यंतच मर्यादित आहे. मुंबई महानगरपालिकेच्या कर्नाक गार्डन प्रकल्पासाठी चालू असलेला मेगा ब्लॉक अद्यापही सुरू असून, तो सकाळी ५.३० वाजेपर्यंत घेण्यात येणार होता. मात्र गर्डर बसवण्याचं काम पूर्ण न झाल्याने तिनही रेल्वे मार्गावर वाहतूक विस्कळीत असून रेल्वेसेवा उशिराने सुरू आहेत. परिणामी, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे जाणाऱ्या प्रवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे, आणि त्यांचा प्रवास अडथळ्यांचा ठरला आहे.

माहीम आणि वांद्रे दरम्यान पुलाच्या दुरुस्तीच्या कामासाठी पश्चिम रेल्वेने अप आणि डाऊन मार्गावर मेगा ब्लॉक घेतला आहे. यामुळे अंधेरी स्थानकावर प्रवाशांची मोठी गर्दी झाली आहे. प्रजासत्ताक दिन असल्याने अनेक प्रवासी कार्यालये आणि शाळांमधील झेंडावंदन कार्यक्रमांसाठी बाहेर पडले होते. रेल्वे प्रवासाची निवड करणाऱ्या प्रवाशांना मेगाब्लॉकमुळे अडचणींचा सामना करावा लागत आहे, कारण अनेक लोकल गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. परिणामी, प्रवाशांची मोठी गैरसोय झाली असून, त्यांना इतर पर्यायांचा शोध घ्यावा लागत आहे. मेगाब्लॉकमुळे अंधेरी स्थानकावर गर्दीचा ताण आणखी वाढल्याचे दिसत आहे.

Railway Mega Block
Western Railway: पश्चिम रेल्वेवर रात्रकालीन ब्लॉक, प्रवाशांचे मेगा हाल! दादर, अंधेरीसह प्रत्येक स्टेशनवर गर्दी

ब्लॉकमुळे मध्य, पश्चिम आणि हार्बर अशा तिन्ही मार्गावर लोकल सेवेवर मोठा परिणाम झाला आहे. हार्बर मार्गावर कोणार्क ब्रिजचे काम सुरू असल्याने पहाटेपासून रेल्वे सेवेत अडथळे निर्माण झाले. सकाळी ५.०६ वाजता निघणारी रेल्वे ६.०० वाजता जीटीबी स्थानकात पोहोचली, मात्र जीटीबी ते वडाळा दरम्यान वारंवार सिग्नल मिळाल्याने ती ५० मिनिटे उशिराने, म्हणजे ६.५६ वाजता वडाळा स्थानकात पोहोचली. रेल्वे प्रशासनाने सीएसएमटीकडे जाणाऱ्या सर्व गाड्या वडाळ्यापर्यंतच चालविण्याचे निर्देश दिले आहेत. यामुळे प्रवाशांना विलंबाचा सामना करावा लागत असून, प्रवासाची मोठी गैरसोय होत आहे.

Railway Mega Block
Central Railway Mega Block: प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! मध्य रेल्वेवर ५ दिवस मेगा ब्लॉक

पश्चिम रेल्वे मार्गावर मेगाब्लॉकमुळे लोकल सेवा उशिराने सुरू आहे. चर्चगेटकडे जाणाऱ्या गाड्या सध्या अंधेरी स्थानकापर्यंतच मर्यादित आहेत, त्यामुळे अंधेरी स्थानकावर मोठ्या प्रमाणावर प्रवाशांची गर्दी झाली आहे. सकाळपासूनच चर्चगेटकडे जाणाऱ्या गाड्यांचे संचालन ठप्प असून, गर्डर बसवण्याचे काम अद्याप पूर्ण न झाल्याने तिन्ही मार्गांवर गाड्या उशिराने धावत आहेत. यामुळे प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. अंधेरी स्थानकावर झालेल्या गर्दीमुळे प्रवाशांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली असून, त्यांना वेळेत गंतव्यावर पोहोचण्यासाठी पर्यायांचा शोध घ्यावा लागत आहे.

Railway Mega Block
Repulic Day 2025 Wishes: प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी आपल्या प्रियजनांना द्या 'या' खास शुभेच्छा

कर्नाक पुलाच्या गर्डर लॉन्चिंग साठी घेण्यात आलेल्या ब्लॉकचा कालावधी वाढला. सकाळी ५.३० पर्यंत असलेला ब्लॉक अजूनही संपला नाही, त्यामुळे मध्य रेल्वेवर अजूनही वाहतूक पूर्णपणे सुरू नाही. बीएमसीकडून ब्लॉक संपल्याची घोषणा नाही त्यामुळे मध्य रेल्वे लोकल आणि एक्सप्रेस चालवू शकत नाही. गर्डर बसवताना एका कर्मचाऱ्याला दुखापत झाली आहे. तसेच गर्डरचे अलाइनमेंट देखील चुकले असल्याने ब्लॉक अजूनही पूर्ण नाही. त्यामुळे लोकल केवळ भायखळा, दादर, कुर्ला स्थानकापर्यंत सुरू, तर हार्बर मार्गावर वडाळा रोड पर्यंत लोकल सुरू आहेत. अनेक एक्सप्रेस गाड्या देखील नवीन वेळेनुसार सोडण्यात येणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com