Mumbai Local Speed  Saam Digital
मुंबई/पुणे

Mumbai Local Megablock: प्रवाशांनो कृपया लक्ष असू द्या! रविवारी मध्य आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक, जाणून घ्या वेळापत्रक

Mumbai Local News: मध्य रेल्वेच्या माटुंगा -मुलुंड अप आणि डाउन जलद मार्गावर, तर हार्बर मार्गावरील कुर्ला - वाशी अप आणि डाउन मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. तर पश्चिम रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक नसणार आहे.

Priya More

मुंबई लोकलने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्वाची बातमी आहे. मध्य रेल्वे मार्गावर रविवार १९ मे २०२४ रोजी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. उपनगरी रेल्वे मार्गावरील रुळांची दुरुस्ती तसेच सिग्नल यंत्रणेत काही तांत्रिक कामासाठी मध्य रेल्वेवर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेच्या माटुंगा -मुलुंड अप आणि डाउन जलद मार्गावर, तर हार्बर मार्गावरील कुर्ला - वाशी अप आणि डाउन मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. तर पश्चिम रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक नसणार आहे.

मध्य रेल्वे मार्गावर असा राहिल मेगाब्लॉक -

मध्य रेल्वे मार्गावर सकाळी ११ .१० ते दुपारी ४.१० वाजेपर्यंत माटुंगा- मुलुंड अप आणि डाउन जलद मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. या ब्लॉकदरम्यान सीएसएमटीवरून सुटणाऱ्या जलद मार्गावरील लोकलसेवा माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान डाउन धिम्या मार्गावर वळवण्यात येतील.

ठाण्याच्या पुढे या जलद लोकल डाउन जलद मार्गावर वळवण्यात येतील. ठाणे येथून सुटणाऱ्या अप जलद मार्गावरील लोकलसेवा मुलुंड आणि माटुंगा स्थानकांदरम्यान अप धिम्या मार्गावर वळवण्यात येतील. पुढे त्या त्यांच्या संबंधित नियोजित थांब्यांवर थांबतील. त्यानंतर अप जलद मार्गावर पुन्हा वळवण्यात येतील. या लोकलसेवा गंतव्यस्थानी नियोजित वेळेच्या १५ मिनिटे उशीराने पोहोचतील.

हार्बर रेल्वे मार्गावर असा राहिल मेगाब्लॉक -

हार्बर रेल्वे मार्गावर कुर्ला ते वाशी अप आणि डाउन हार्बर मार्गावर सकाळी ११.१० ते दुपारी ४.१० वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. या ब्लॉक कालावधीत वाशी, बेलापूर आणि पनवेल येथून सीएसएमटीकडे जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील लोकलसेवा रद्द राहतील.

तर सीएसएमटी येथून वाशी, पनवेल आणि बेलापूरकडे जाणाऱ्या डाऊन हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील. ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते वाशी आणि वाशी ते पनवेलदरम्यान विशेष लोकल चालविण्यात येतील. तसेच हार्बर मार्गावरील प्रवाशांना ब्लॉक कालावधीतल ठाणे, वाशी आणि नेरुळ स्थानकांदरम्यान प्रवास करण्याची परवानगी आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viral Video: रुग्णवाहिकेला रस्ता न देणे महागात पडले, पोलिसांनी शिकवल धडा, लाखोंचा दंड, लायसन्सही रद्द, Video बघाच

Post Office Scheme: पोस्ट ऑफिसची जबरदस्त योजना! दर महिन्याला मिळणार ९००० रुपये; कसं? जाणून घ्या

Success Story: IIT मुंबईमधून शिक्षण, लाखोंची नोकरी नाकारली, अवघ्या २२ व्या वर्षी UPSC क्रॅक ;IAS सिमी करण यांची सक्सेस स्टोरी

Shukra Gochar 2024: नोव्हेंबर अखेरीस शुक्राचं नक्षत्र गोचर वाढवणार डोकेदुखी; आर्थिक हानी होण्याचा धोका

Air Pollution : राजधानीची हवा अत्यंत विषारी! शाळा बंद, वाहनांना बंदी, दिल्लीमध्ये अनेक निर्बंध

SCROLL FOR NEXT