Proposed Mumbai–Nashik AC Local Train expected to significantly reduce travel time and improve regional connectivity. Saam Tv
मुंबई/पुणे

मुंबईकरांसाठी खूशखबर! मध्य रेल्वेवर धावणार १२ नव्या AC लोकल; वेळापत्रक पाहिलेत का?

Mumbai Local Train News : २९ जूनपासून मध्य रेल्वेच्या मेन लाईनवर १२ नवीन एसी लोकल सेवा सुरू होत आहेत. या सेवांमुळे एकूण एसी लोकल फेऱ्यांची संख्या १२० वर पोहोचणार आहे.

Namdeo Kumbhar

मुंबईकरांचा लोकल प्रवास आता अधिक थंडगार आणि सुसाट होणार आहे. कारण मध्य रेल्वेने ऐन पावसाळ्यात आणि उकाड्यात प्रवाशांना मोठा दिलासा दिला आहे. सोमवारपासून (२९ जून २०२६) मध्य रेल्वेच्या मेन लाईनवर आणखी १२ नव्या वातानुकूलित (AC) लोकल सेवा सुरू होत आहेत. विशेष म्हणजे, प्रवाशांच्या वाढत्या मागणीचा विचार करून गर्दीच्या वेळेत या फेऱ्या चालवल्या जाणार आहेत

विना-एसी लोकलच्या जागी आता एसी ट्रेन!

मध्य रेल्वेने स्पष्ट केले आहे की, या १२ नव्या फेऱ्या स्वतंत्र नसून सध्या सुरू असलेल्या १२ नेहमीच्या (विना-वातानुकूलित) लोकलच्या जागी चालवल्या जातील. या नव्या बदलामुळे मध्य रेल्वेवरील एकूण एसी लोकल फेऱ्यांची संख्या आता १२० वर पोहोचणार आहे, ज्यामध्ये मेन लाईनवर ९२ आणि हार्बर लाईनवरील २८ फेऱ्यांचा समावेश आहे.

अप मार्ग : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) कडे जाणाऱ्या लोकल:

१. टिटवाळा ते CSMT (गाडी क्र. 96612): सकाळी ०६:४६ वाजता सुटणार, ०८:३१ वाजता पोहोचणार (सकाळची गर्दीची वेळ).

२. घाटकोपर ते CSMT (गाडी क्र. 97502): सकाळी ०९:१६ वाजता सुटणार, ०९:५३ वाजता पोहोचणार (सकाळची गर्दीची वेळ).

३. कुर्ला ते CSMT (गाडी क्र. 97618): दुपारी १६:३४ वाजता सुटणार, १७:०८ वाजता पोहोचणार.

४. ठाणे ते CSMT (गाडी क्र. 97408): संध्याकाळी १८:१६ वाजता सुटणार, १९:१४ वाजता पोहोचणार.

५. कल्याण ते कुर्ला (गाडी क्र. 97164): रात्री २१:०४ वाजता सुटणार, २२:०३ वाजता पोहोचणार.

६. कुर्ला ते CSMT (गाडी क्र. 97630): रात्री २२:२२ वाजता सुटणार, २२:५३ वाजता पोहोचणार.

डाउन मार्ग: CSMT वरून सुटणाऱ्या लोकल:

७. ठाणे ते टिटवाळा (गाडी क्र. 96603): पहाटे ०५:३५ वाजता सुटणार, ०६:२३ वाजता पोहोचणार.

८. CSMT ते घाटकोपर (गाडी क्र. 97501): सकाळी ०८:३७ वाजता सुटणार, ०९:१२ वाजता पोहोचणार.

९. CSMT ते कुर्ला (गाडी क्र. 97615): सकाळी १०:०० वाजता सुटणार, १०:२८ वाजता पोहोचणार.

१०. CSMT ते ठाणे (गाडी क्र. 97389): संध्याकाळी १७:१२ वाजता सुटणार, १८:०८ वाजता पोहोचणार.

११. CSMT ते कल्याण (गाडी क्र. 97157): रात्री १९:१८ वाजता सुटणार, २०:४९ वाजता पोहोचणार (संध्याकाळची गर्दीची वेळ).

१२. CSMT ते ठाणे (गाडी क्र. 97433): रात्री २३:०० वाजता सुटणार, २३:५७ वाजता पोहोचणार.

प्रवाशांसाठी महत्त्वाच्या गोष्टी

या वेळेत या १२ सेवा केवळ वातानुकूलित (AC) रेकसह धावतील.

रविवारी आणि रेल्वेच्या निश्चित सुट्ट्यांच्या दिवशी या सेवा नेहमीच्या विना-वातानुकूलित (Non-AC) लोकल गाड्यांसह चालवल्या जातील, जेणेकरून सुट्टीच्या दिवशी प्रवाशांची गैरसोय होणार नाही.

नव्या एसी लोकल येत असल्या तरी मुंबई विभागातील एकूण उपनगरीय सेवांची संख्या १८२० इतकीच कायम राहणार आहे, फक्त काही फेऱ्यांचे रूपांतर एसीमध्ये करण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Google Maps : इंटरनेट किंवा नेटवर्क नसताना गुगल मॅप्स कसे वापरावे? जाणून घ्या सोपी स्टेप-बाय-स्टेप पद्धत

Radish benefits: 90 दिवस रोज खा 1 मुळा; शरीराला मिळणारे फरक पाहून तुम्हालाही बसेल धक्का

Lalbaug Raja Visarjan : "पुढच्या वर्षी लवकर या" २४ तासानंतर लालबागच्या राजाचे भक्तिमय वातावरणात विसर्जन

Breaking News: मोठी बातमी! राज्यात अखेर दुष्काळ जाहीर, फडणवीस सरकारचा मोठा निर्णय

Gold Rate Today: सोन्याचे दरात मोठी घसरण, १६०० रुपयांनी सोनं स्वस्त ; 18k- 22k आणि 18k चे दर किती?

SCROLL FOR NEXT