MUMBAI HARBOUR LINE MEGA BLOCK ON APRIL 26 LOCAL TRAINS CANCELLED FULL DETAILS Saam Tv
मुंबई/पुणे

Railway Megablock : रेल्वे प्रवाशांचे मेगा हाल होणार, रविवारी 'या' मार्गांवर मेगाब्लॉक; घराबाहेर पडण्याआधी वाचा वेळापत्रक

Sunday Railway Megablock News : मुंबईकरांची लाईफलाईन असलेल्या रेल्वेचा रविवारी २६ एप्रिल रोजी हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक जाहीर. अनेक लोकल गाड्या रद्द असून प्रवाशांसाठी विशेष सेवा आणि पर्यायी मार्गांची माहिती जाणून घ्या.

Alisha Khedekar

  • हार्बर मार्गावर २६ एप्रिल रोजी ५ तासांचा मेगा ब्लॉक

  • अनेक लोकल सेवा रद्द, प्रवाशांना मोठा फटका

  • पनवेल–कुर्ला विशेष गाड्या उपलब्ध

  • प्रवाशांनी आधीच नियोजन करण्याचे आवाहन

मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात रविवार, २६ एप्रिल २०२६ रोजी विविध अभियांत्रिकी व देखभाल कामांसाठी हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. मात्र, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कल्याण या मध्य रेल्वेच्या मार्गिकेवर कोणताही मेगा ब्लॉक नसल्याने त्या मार्गावरील लोकल सेवा नियमितपणे सुरू राहणार आहेत.

हार्बर मार्गावरील हा मेगा ब्लॉक छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) ते चुनाभट्टी/वांद्रे या डाउन मार्गावर सकाळी ११.४० ते सायंकाळी ४.४० वाजेपर्यंत असेल. तसेच चुनाभट्टी/वांद्रे ते सीएसएमटी या अप मार्गावर सकाळी ११.१० ते सायंकाळी ४.१० वाजेपर्यंत ब्लॉक राहणार आहे. या कालावधीत अनेक लोकल सेवा रद्द करण्यात आल्या आहेत.

सीएसएमटीहून सकाळी ११.१६ ते सायंकाळी ४.४७ दरम्यान सुटणाऱ्या वाशी, बेलापूर आणि पनवेलकडे जाणाऱ्या डाउन हार्बर मार्गावरील गाड्या रद्द राहतील. त्याचप्रमाणे, सीएसएमटीहून सकाळी १०.४८ ते सायंकाळी ४.४३ दरम्यान सुटणाऱ्या वांद्रे व गोरेगावकडे जाणाऱ्या सेवा देखील रद्द असतील.

पनवेल, बेलापूर आणि वाशी येथून सकाळी ९.५३ ते दुपारी ३.२० दरम्यान सीएसएमटीकडे येणाऱ्या अप मार्गावरील गाड्या तसेच गोरेगाव आणि वांद्रे येथून सकाळी १०.४५ ते सायंकाळी ५.१३ दरम्यान सुटणाऱ्या सेवा रद्द करण्यात आल्या आहेत.

प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी ब्लॉक कालावधीत पनवेल आणि कुर्ला (प्लॅटफॉर्म क्रमांक ८) दरम्यान दर २० मिनिटांनी विशेष लोकल सेवा चालवण्यात येणार आहेत. तसेच हार्बर मार्गावरील प्रवाशांना सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत मेन लाईन व पश्चिम रेल्वेमार्गावरून प्रवास करण्याची विशेष परवानगी देण्यात आली आहे. मध्य रेल्वे प्रशासनाने प्रवाशांनी प्रवासाचे नियोजन करूनच घराबाहेर पडावे, असे आवाहन केले आहे. मेगा ब्लॉकमुळे होणारी गैरसोय लक्षात घेता पर्यायी मार्गांचा वापर करण्याचा सल्लाही देण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: विदर्भात उष्णतेची लाट,अकोल्यात सर्वाधिक 45 डिग्री तापमानाची नोंद

धाड धाड धाड...! पुण्यात गोळीबाराचा थरार; ४ जणांनी सलुनवर गोळ्या झाडल्या

Famous Actor Death : सिनेसृष्टीतील मोठा तारा हरपला! प्रसिद्ध अभिनेत्याचे निधन, मनोरंजन सृष्टीवर दु:खाचा डोंगर

Sunetra Pawar: 'भावी मुख्यमंत्री' सुनेत्रा अजितदादा पवार'; पुण्यातील रस्त्यावर झळकले बॅनर्स

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहि‍णींचे टेन्शन वाढवणारी बातमी! ३० एप्रिलनंतर या महिलांचे ₹१५०० कायमचे बंद; तुमचंही नाव आहे का?

SCROLL FOR NEXT