Mumbai Local Train News Saam Tv News
मुंबई/पुणे

Mumbai Local Mega Block: मुंबईकरांनो लक्ष असूद्या, मध्य रेल्वेवर 63 तासांचा जम्बो ब्लॉक

Central Railway Mega Block Update: मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी समोर आली आहे. मध्य रेल्वे मार्गावर जम्बो ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे गरज असेल तरच मुंबईकरांनी घराबाहेर पडावे, असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Priya More

तन्मय टिल्लू,साम टीव्ही

लोकलने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी. आज मध्यरात्रीपासून मध्य रेल्वेवर 63 तासांचा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे 3 जूनपर्यंत अनेक लांब पल्ल्याच्या गाड्या आणि शेकडो लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. यामुळे गरज असेल तरच घराबाहेर पडा, असं आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आलंय. विशेष म्हणजे ज्या कंपन्यांना त्यांच्या कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम देणं शक्य आहे त्यांना तशी मुभा द्यावी, असं आवाहनही रेल्वे प्रशासनाने मुंबईतल्या कंपन्यांना केलं आहे.

मध्य रेल्वेच्या प्रवाशांनी कृपया एका विशेष सुचनेकडे लक्ष द्या. मध्य रेल्वेनं नित्यनेमानं प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी ही बातमी अतिशय महत्त्वाचीये...कारण मध्य रेल्वेवर 63 तासांचा मेगाब्लॉक गुरुवार 30 मेच्या मध्यरात्रीपासून सुरू होतोय.नत्यामुळे 3 जूनपर्यंत अनेक लांब पल्ल्याच्या गाड्या आणि शेकडो लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत.

सीएसएमटी फलाट क्रमांक १०-११ वर सध्या १६ डब्यांच्या रेल्वेगाड्या थांबत असून या फलाटावर २४ डब्यांच्या रेल्वेगाड्या थांबविण्यासाठी फलाटाचा विस्तार केला जात आहे. मध्य रेल्वेकडून हे काम पूर्ण करण्यासाठी शुक्रवार, शनिवार आणि रविवारी मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. तर ठाणे येथील फलाटाच्या रुंदीकरणासाठी गुरुवारी रात्रीपासून ते रविवारी मध्य रेल्वेकडून मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. या ब्लॉकमुळे लोकल गाड्यांच्या वेळापत्रकावर मोठा परिणाम होणार आहे.

असा असेल मेगाब्लॉक -

ब्लॉक 1 – ठाणे - 63 तासांचा विशेष ब्लॉक

ब्लॉक कालावधी – गुरुवारी मध्यरात्री १२.३० ते रविवार दुपारपर्यंत.

ब्लॉक २ – सीएसएमटी- 36 तासांचा विशेष ब्लॉक

ब्लॉक कालावधी – शुक्रवार मध्यरात्र 12.30 ते रविवार दुपार 12.30 पर्यंत

ब्लॉक कालावधीत सीएसएमटी ते वडाळा रोड दरम्यान अप आणि डाऊन हार्बर मार्ग, सीएसएमटी आणि भायखळा दरम्यान अप आणि डाऊन जलद, धीम्या मार्गावर लोकल सेवा उपलब्ध नसेल.

किती लोकल सेवा रद्द?

- शुक्रवारी मध्य रेल्वेवरील 161 लोकल फेऱ्या रद्द

- शनिवारी 534 लोकल फेऱ्या रद्द, 613 लोकल अंशत: रद्द

- रविवारी 235 लोकल फेऱ्या रद्द, 270 लोकल अंशत: रद्द

- शुक्रवारी 4 रेल्वेगाड्या रद्द आणि 11 रेल्वेगाड्या अंशत: रद्द

- शनिवारी 37 रेल्वेगाड्या रद्द, 31 रेल्वेगाड्या अंशत: रद्द

- रविवारी 31 रेल्वेगाड्या रद्द आणि 80 रेल्वेगाड्या अंशत: रद्द

मुंबईची लाईफलाईन असलेल्या मध्ये रेल्वेवर जम्बो ब्लॉक घेण्यात येतोय. त्यामुळे प्रवशांचे हाल होणार आहेत. त्यात बेस्टची पर्यायी व्यवस्था करण्यात आली असली तरी त्यावर ताण येण्याची शक्यता आहे. त्यामुळे गरज असेल तरच बाहेर पडा. वर्क फ्रॉम होमचा पर्याय निवडा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

India Pakistan Cricket Match: खेळ मांडला.. ! भारत-पाकिस्तान सामन्याआधीच भाजप सरकार-ठाकरेंमध्ये 'सामना'

Maharashtra Live News Update: अकोला शहरासह ग्रामीण भागात मुसळधार पाऊस

Firing: अभिनेत्री दिशा पटानीच्या घराबाहेर गोळीबार का झाला? धक्कादायक माहिती आली समोर

Maratha Reservation: मराठा आरक्षण कायद्याच्या कचाट्यात, सरकारची कोंडी

Mumbai : मुंबईतील 'या' भागातील पाणी टंचाईची समस्या मिटणार; विंधन विहीर खोदण्याचा कामाला मंजुरी

SCROLL FOR NEXT