Mumbai Local Central Railway Delay Today : आठवड्याच्या पहिल्याच दिवशी मध्य रेल्वेची वाहतूक (Central Railway) विस्कळीत झाली आहे. कल्याणहून सीएसएमटीकडे येणाऱ्या लोकल १० ते १५ मिनिटे उशीराने धावत आहेत. पहिल्याच दिवशी लोकल वाहतूक विस्कळीत झाल्यामुळे चाकरमान्यांना नाहक त्रासाचा सामना करावा लागत आहे. प्रत्येक स्थानकावर मोठी गर्दी झालेली दिसत आहे. रेल्वेकडून अद्याप कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. (Mumbai local central railway service disrupted deu to technical fault)
कामावर जाण्यासाठी निघालेल्या मुंबईकरांना आठवड्याच्या पहिल्या दिवशी मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. कल्याणहून सीएसएमटीकडे येणाऱ्या लोकल १० ते १५ मिनिटं उशिराने धावत असल्याची माहिती समोर आली आहे. तांत्राकि अडचण आणि धुक्यामुळे लोकलच्या सेवेवर परिणाम झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.
लोकल खोळंबल्यामुळे मुंबईकरांना कामावर पोहचण्यासाठी उशीर होत आहे. तसेच मेल-एक्स्प्रेसवही याचा परिणाम झाला असून काही रेल्वेगाड्या विलंबाने धावत आहेत. यामुळे लोकल प्रवाशांना आठवड्याच्या पहिल्याच दिवशी मनस्ताप सहन करावा लागत आहे.
पश्चिम रेल्वेवरील काही लोकल रद्द करण्यात आल्या आहेत.भाईंदर, कांदिवली येथून येणाऱ्या चाकरमान्यांना आठवड्याच्या पहिल्याच दिवशी त्रासाचा सामना करावा लागत आहे. हार्बर मार्गावरील सध्या वाहतूक सुरळीत सुरु आहे. पण सकाळी ५.४० ची सीएमएमटी लोकल रद्द केल्यामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.