Manoj Jarange : मनोज जरांगेंचा नव्या सरकारला इशारा, उपोषणाची पुढची दिशा सांगितली, म्हणाले...

Manoj Jarange strike : मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी आपली पुढची दिशा ठरवली आहे. सोलापूरमधून त्यांनी नव्या सरकारला इशाराच दिलाय. आरक्षण घेतलं तर ओबीसीमधूनच घेणार, असा पवित्रा त्यांनी घेतला आहे. त्यांच्या वक्तव्याची जोरदार चर्चा होणार आहे.
Manoj Jarange Patil On Devendra Fadnavis
Manoj Jarange Patil On Devendra FadnavisSaam Tv
Published On

Manoj Jarange strike : अंतरवली सराटीमध्ये यंदा घराघरातील मराठे सामूहिकरित्या आमरण उपोषणाला बसणार आहेत.राज्यभरातले मराठे आता गावागावात नाही तर एकाच ठिकाणी आमरण उपोषणाला बसणार आहेत. त्यांच सरकार तयार झालं की मी आमरण उपोषणाची तारीख जाहीर करणार आणि हे उपोषण मुंबईत सुद्धा होऊ शकतं, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी नव्या सरकारला दिलाय.

आरक्षण ओबीसीमधूनच घेणार-

कोणीही मुख्यमंत्री म्हणून आलं तरी मराठ्यांपेक्षा मोठं या राज्यात कोणी नाही. आम्ही सज्ज आहोत महाराष्ट्रातील आरक्षणात 100% गेल्याशिवाय मी हटत नाही आणि आरक्षण तर हे ओबीसीमधूनच घेणार आणि हे आमचं फायनल आहे. नवीन आमदारांना मराठा आरक्षणाचा प्रश्न मांडावा लागेल. नाहीतर यांना मराठे रस्त्यावर फिरू देणार नाहीत, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला.

विधानसभा निवडणूक निकालावर काय म्हणाले मनोज जरांगे?

ज्या गोष्टी केल्या नाहीत त्याबद्दल छाती बडवण्याची मला सवय नाहीये. मी आणि माझा समाज मैदानातच नाहीये,यावेळी दोरी मराठ्यांच्या हातात होती. मालक तो होता आणि त्याला कोणच्या दावणीला न बांधता त्यालाच मालक ठेवलं. विधानसभेत मी समाजाला सांगितलं होत त्यांना जे करायचं आहे, ते करा,तसं त्यांनी केलं,मी समाजाची फरपट होऊ दिली नाही, असे जरांगे पाटील म्हणाले.

विधानसभेला मैदनात असतो तर....

विधानसभेत मी मैदानात असतो आणि समीकरण जुळली असती तर सुफडा साफच केला असता. हा तर नुसता ट्रेलर पण नाहीये आणखी पुढ लय मजा येणार आहे.फक्त तुम्ही आरक्षण देऊ नका म्हणा मी तुम्हाला कचका दाखवतो, असा इशारा जरांगे पाटील यांनी दिलाय.

ज्यांना पाडायचं त्यांना‌ पाडले; मनोज जरांगे पाटील यांचा दावा

मी निवडणुकीच्या मैदान नव्हतो तरी ज्यांना पाडायचं त्यांना पाडलं आणि ज्यांना निवडून आणायचं त्यांना आणलं, असा मोठा दावा मनोज जरांगे पाटील यांनी केला. छगन भुजबळ यांच्या विरोधात प्रचार केला नसल्याचे सांगितले. मराठा समाजाने विधानसभा निवडणुकीत नाकारलं या प्रश्नावर जरांगे पाटील चांगलेच भडकले. मी कधी ही कोणाच्या विरोधात मतदान करा असं सांगितलं नाही. तरी ही ज्यांना पाडायचं त्यांना पाडलं असा दावा ही त्यांनी केला . छगन भुजबळ यांच्या विरोधात आपण प्रचार केला नसल्याचे मनोज जरांगे पाटील म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com