Mumbai Local Train Update Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai Local: मध्य रेल्वेवर १५ तासांचा विशेष ब्लॉक, अनेक लोकल आणि लांबपल्ल्याच्या ट्रेन रद्द; वाचा वेळापत्रक

Special Block On Central Railway: मध्य रेल्वे मार्गावर १५ तासांचा विशेष ब्लॉक घेण्यात येणार आहे. या ब्लॉकमुळे ३ मेल एक्स्प्रेस आणि ५९ लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्याची माहिती मध्य रेल्वे प्रशासनाने दिली आहे.

Priya More

मध्य रेल्वे मार्गावरून प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. मध्य रेल्वे मार्गावर १५ तासांचा विशेष ब्लॉक घेण्यात येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकाच्या फलाट क्रमांक १२ आणि १३ च्या विस्तारीकरणासाठी आणि प्री नॉन इंटरलॉकिंगच्या कामासाठी हा विशेष ब्लॉक घेण्यात येणार आहे. या ब्लॉकमुळे लोकल सेवा आणि रेल्वे वाहतुकीवर परिणाम होणार आहे. या ब्लॉकमुळे ३ मेल एक्स्प्रेस आणि ५९ लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्याची माहिती मध्य रेल्वे प्रशासनाने दिली आहे.

CSMT स्थानकावर फलाटाचे विस्तारीकरण -

सीएसएमटी रेल्वे स्थानकावर फलाट क्रमांक १२ आणि १३ची लांबी २४ डब्यांच्या गाड्या चालवण्यासाठी वाढवण्यात येत आहे. फलाट विस्तारीकरणाचे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे. अशामध्ये मध्य रेल्वेने दोन दिवसांचा विशेष ब्लॉक घेण्याचा निर्णय घेतला आहे. महत्वाचे म्हणजे मध्यरात्रीच्या वेळी हा विशेष ट्रॅफिक ब्लॉक घेतला जाणार आहे.

असा असेल विशेष ब्लॉक -

मध्य रेल्वे मार्गावर शुक्रवार आणि शनिवारी मध्यरात्री ५ तासांचा. तर शनिवारी आणि रविवारी मध्यरात्री १० तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे. पहिला ब्लॉक सीएसएमटी ते भायखळा स्थानकादरम्यान अप आणि डाऊन मार्गावर शुक्रवारी रात्री ११.३० ते शनिवारी पहाटे ४.३० वाजताच्या दरम्यान घेण्यात येणार आहे. तर दुसरा ब्लॉक सीएसएमटी ते भायखळा/ वडाळा रेल्वे स्थानकादरम्यान अप आणि डाऊन जलद आणि धिम्या मार्ग/ अप आणि डाऊन हार्बर मार्गावर शनिवारी रात्री ११.१५ ते रविवारी सकाळी ९.१५ या कालावधीत घेण्यात येणार आहे.

५९ लोकल फेऱ्या रद्द -

या ब्लॉकचा परिणाम मध्य रेल्वे आणि हार्बर रेल्वे मार्गावरील लोकलसेवेवर होणार आहे. ब्लॉक कालावधीमध्ये सीएसएमटी ते भायखळा आणि सीएसएमटी ते वडाळा रोड दरम्यान लोकलसेवा रद्द राहणार आहेत. या दोन दिवसीय ब्लॉक कालावधीमध्ये ५९ लोकल आणि तीन मेल-एक्स्प्रेस रद्द राहणार आहेत. तर ४७ मेल-एक्स्प्रेसवर या ब्लॉकचा परिणाम होणार आहे. काही मेल-एक्स्प्रेस दादर स्थानकावर थांबवण्यात येणार असून त्याच स्थानकावरून त्या परतीचा प्रवास सुरू करतील.

या ३ एक्स्प्रेस रद्द -

या ब्लॉक कालावधीमध्ये पुणे-सीएसएमटी डेक्कन, पुणे-सीएसएमटी इंटरसिटी आणि नांदेड-सीएसएमटी तपोवन एक्स्प्रेस रद्द राहणार आहे. प्रवाशांनी या कालावधीमध्ये मेल-एक्स्प्रेसच्या सविस्तर थांब्यांसाठी मध्य रेल्वेच्या वेबसाईटवरून माहिती घेण्याचे आवाहन मध्य रेल्वे प्रशासनाने केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi vs Hindi Clash: परप्रांतीय व्यापारी मराठीच्या विरोधात मोर्चा; परप्रांतीयांमध्ये हिंमत येते कुठून?

Shocking : तरुणीच्या प्रायव्हेट पार्टमध्ये प्लास्टिक बॉटल अडकली; क्षणिक सुखासाठी नको ते करुन बसली, डॉक्टरही चक्रावले

५ जुलैला महाविनाश? नवीन बाबा वेंगाच्या भविष्यवाणीचा धसका, महाप्रलयाला एक दिवस बाकी?

Operation Sindoor: पाक आणि चीनची डोकेदुखी वाढणार,अपाचे हेलिकॉप्टर, ठरणार शत्रूचा कर्दनकाळ, अमेरिका भारताला देणार 'AH-64E हेलिकॉप्टर'

सरकार देणार तुम्हाला मोफत फ्लॅट? अर्ज करण्यासाठी सरकारची नवी वेबसाईट? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य?

SCROLL FOR NEXT