A tragic scene from Kurla, Mumbai, where an 11-year-old boy lost his life after falling into a lift shaft while playing hide-and-seek; the incident was captured on CCTV. saam tv
मुंबई/पुणे

मुंबईत दुर्दैवी घटना; लपाछपी खेळताना 11 वर्षांच्या मुलाचा मृत्यू, थरार CCTV मध्ये कैद

11 Year Old Boy Falls Into Lift Shaft In Mumbai Kurla: मुंबईतील कुर्ला परिसरात लपाछपी खेळताना 11 वर्षांच्या मुलाचा लिफ्टच्या डक्टमध्ये पडून दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेचा थरारक सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आला असून पोलिस तपास सुरू आहे.

Omkar Sonawane

मुंबईतील कुर्ला परिसरातून एक हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. येथील नेहरू नगरमधील एका उंच इमारतीत लपाछपी खेळताना 11 वर्षाच्या एका निष्पाप मुलाचा लिफ्टच्या डक्टमध्ये पडून मृत्यू झाला. हा अपघात मंगळवारी कुर्ल्यातील नेहरू नगर परिसरातील शमीम टॉवर या इमारतीच्या दहाव्या मजल्यावर घडला. मृत मुलाची ओळख 11 वर्षीय जमीर शेख अशी झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जमीर हा सोसायटीतील इतर मुलांसोबत इमारतीच्या कॉरिडॉरमध्ये लपाछपी खेळत होता. त्याचदरम्यान तो लपण्यासाठी दहाव्या मजल्यावरील लिफ्टच्या दरवाज्याला टेकून उभा राहिला. अचानक लिफ्टचे दार उघडले आणि तो थेट लिफ्टच्या डक्टमध्ये पडला. या घटनेनंतर इमारतीत एकच आरडाओरड सुरू झाली. गंभीर जखमी अवस्थेत जमीरला तात्काळ जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले, मात्र, उपचार सुरू होण्यापूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेनंतर मुलाच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

सीसीटीव्ही फुटेज समोर आले

या हृदयद्रावक अपघाताचे सीसीटीव्ही फुटेजही समोर आले आहे. या व्हिडिओच्या शेवटच्या काही सेकंदांमध्ये खेळता खेळता ही भीषण दुर्घटना कशी घडली, हे स्पष्टपणे दिसून येते. या प्रकरणी नेहरू नगर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

School Closed: चंद्रपूर-गडचिरोलीला पावसाचा रेड अलर्ट; सर्व शाळा, महाविद्यालयांना उद्या सुट्टी

MH-CETमध्ये पर्सेंटाईल घोटाळा? 40% मिळवणाऱ्याला 100 पर्सेंटाईल, 13 लाखांत हवं ते कॉलेज देण्याची हमी

Maharashtra News Live Update: केसनंद ग्रामपंचायतीसमोर कचरा आंदोलन कथित भ्रष्टाचाराविरोधात अनोखा निषेध

बॉयफ्रेंडसोबत बोलताना रडायचा मुलगा; निर्दयी मायनं ३ वर्षाच्या लेकाचा दाबला गळा

Abhijeet Dipke : ...तर लवकरच मोठं आंदोलन; अभिजीत दिपकेंचा सरकारला गंभीर इशारा

SCROLL FOR NEXT