Mumbai Local  Saam tv
मुंबई/पुणे

Mumbai: मुंबईत धावत्या लोकलमधून पडून तरुणाचा मृत्यू, शीर धडावेगळं झालं; थरकाप उडवणारा VIDEO

Mumbai Local: मुंबईमध्ये लोकलमधून पडून तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. कुर्ला रेल्वे स्थानकावर ही घटना घडली. या घटनेचा व्हिडीओ समोर आला असून तो व्हायरल होत आहे.

Priya More

मुंबईमध्ये लोकलमधून पडून एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. कुर्ला रेल्वे स्थानकावर ही घटना घडली. लोकलखाली येऊन तरुणाचा जागीच मृत्यू झाला. त्याचे शीर धडावेगळं झालं. घटनेची माहिती मिळताच रेल्वे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली. या घटनेचा व्हिडीओ समोर आला असून तो व्हायरल होत आहे.

रेल्वे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना कुर्ला रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक ७ वर घडली. दुपारी ३ च्या सुमारास ही घटना घडली. पनवेलकडे जाणाऱ्या लोकलखाली हा तरुण आला. त्याचे शीर धडावेगळं झालं. हा तरुण ३५ वर्षांचा होता. तो मूळचा रायगड जिल्ह्यातला असून त्याच्या कुटुंबीयांना घटनेची माहिती देण्यात आली आहे. तरुणाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी भाभा रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.

दरम्यान, नांदेडमध्ये धावत्या रेल्वे समोर उडी घेत तरुणाने आत्महत्या केल्याची घटना घडली. आदिलाबाद येथून येणाऱ्या नंदीग्राम एक्स्प्रेससमोर या तरुणाने उडी मारत आयुष्य संपवलं. या तरुणाचा मृतदेह इंजिनमध्ये अडकला होता. हिमायतनगर रेल्वे स्थानकावर गेल्यानंतर ही घटना उघडकीस आली.

गणेश पांडुरंग लोलेपवार (२० वर्षे) असं आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव होते. हा तरुण किनवट तालुक्यातील भिसी गावामध्ये राहणारा होता. ४ वाजताच्या सुमारास या तरुणाने ट्रेनसमोर उडी मारत आत्महत्या केली. या तरुणाच्या आत्महत्येमागचं कारण समोर आले नाही. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: परभणीत दोन महिलांचा अपघाती मृत्यू

Pinga Ga Pori Pinga : 'पिंगा गर्ल्स'च्या नात्यात दुरावा? 3 वर्षानंतर होणार नवी सुरुवात, पाहा VIDEO

BOB Recruitment: बँक ऑफ बडोदामध्ये नोकरीची संधी; मॅनेजर पदांसाठी होणार भरती; मिळणार भरघोस पगार

'भारत कधीही तडजोड करणार नाही'; ट्रम्पच्या टॅरिफवर पंतप्रधान मोदींचं मोठं विधान

Moong Dal Soup: बाहेरचं खाणं कशाला? घरच्या घरी बनवा चटपटीत आणि गरमागरम मुग डाळीचे सूप, वाचा सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT