Buldhana Police : हातात कोयता घेऊन बनविली रील; सोशल मीडियावर व्हायरल होताच तरुणांना पोलिसांनी घडवली अद्दल

Buldhana News : वेगवेगळ्या रिल्स बनवून त्या सोशल मीडियावर व्हायरल करून फेमस होण्याचे वेड सध्या अनेकांना लागले आहे. यासाठी कोणताही विचार न करता रिल्स बनविण्यात येत असून पोलिसांची देखील यावर नजर आहे
Buldhana Police
Buldhana PoliceSaam tv
Published On

बुलढाणा : अलीकडच्या काळात रील्स बनवून ते सोशल मीडियावर व्हायरल करण्याचे मोठं वेड तरुणाईला लागल्याचं पाहायला मिळत आहे. कोणत्याही प्रकारचे रिल्स करत ते व्हायरल केले जातात. अशाच प्रकारे हातात कोयता घेऊन रिल्स बनविले आणि ते व्हायरल करणाऱ्या तरुणांना चांगलीच अद्दल घडली आहे. पोलिसांनी या तरुणांना ताब्यात घेत माफीचा रिल्स व्हायरल केला आहे. 

सोशल मीडियाचा प्लॅटफॉर्म मिळत असल्याने प्रत्येकाला यावर येण्याचे वेड लागले आहे. यात तरुण वर्ग अधिक प्रमाणात ऍक्टिव्ह आहे. अशात कोणत्याही ठिकाणी जाऊन रिल्स बनविले जातात. त्यासाठी मग जीवघेणे स्टंट देखील केले जातात. तर कुठे कायदा हातात घेतला जातो. असाच प्रकार बुलढाण्यात घडला असून बुलढाणा शहरातील अमित बेंडवाल आणि आदित्य ऊर्फ शक्ती देशमुख या तरुणांनी हातात धारदार कोयता घेऊन रिल काढली आणि ती समाजमाध्यमावर व्हायरल केली. 

Buldhana Police
Surat Police : सासऱ्याने सुनेची केली पोलखोल; हॉटेलवर रंगली होती दारू पार्टी, सुरत पोलिसांच्या छापेमारीत सुनेसह ५ जण ताब्यात

माफीनाम्याचा रिल्स केला व्हायरल 

सदरची रिल पाहताच पोलिसांनी दोघांवर आर्म ॲक्ट नुसार गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली. सोबतच त्यांच्या माफीनाम्याचा व्हिडिओ देखील पोलिसांनी शेअर करायला लावला. त्यामुळे थोड्या प्रसिद्धीसाठी कायदा हातात घेणे या तरुणांना चांगलच भोवल आहे. कायदा हातात घेणारे किंवा सामाजिक तेढ निर्माण करणारे व्हिडिओ किंवा पोस्ट समाज माध्यमावर करू नये, अन्यथा कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही यावेळी पोलिसांनी दिला आहे.

Buldhana Police
Majalgaon News : खोटे दस्तावेज तयार करून ५३ गुंठे प्लॉट हडपला; माजलगावच्या माजी नगराध्यक्षांवर शेतकऱ्यांचा आरोप

एका चोरट्याकडून सात दुचाकी जप्त.
अकोला : अकोल्यातल्या सिटी कोतवाली पोलिसांनी दुचाकी चोरणाऱ्या पकडले आहे. या चोरट्याकडून ७ चोरीच्या दुचाकी जप्त केल्या आहे. ज्याची किंमत ३ लाख ७० हजार रुपये आहे. या दुचाकी चोरणारा हा मेकॅनिकच चोर असल्याचे समोर आले आहे. या कारवाईमुळे अकोला शहरातील दुचाकी चोरीचे सात गुन्हे उघडकीस आले आहेत. आरोपी रोहित उमेश जावळे असं या चोरट्याच नाव आहे. तो व्यवसायाने दुचाकी मेकॅनिकल असून चोरी केलेल्या मोटारसायकल पार्ट्स बदलून बनावट क्रमांक लावून त्यांचा वापर करायचा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com