Mumbai News Saam tv
मुंबई/पुणे

Mumbai News : कांदिवलीत रिक्षा चालक व स्कूल बस कर्मचाऱ्यात मारामारी; वाहतूक ठप्प, विद्यार्थी बसमध्ये अडकली

Mumbai Kandivli : कांदिवलीतील लोखंडवाला रिक्षा स्टँडजवळ रिक्षाचालक आणि स्कूल बस कर्मचाऱ्यांमध्ये जोरदार वाद झाला. या मारामारीमुळे अर्धा तास वाहतूक विस्कळीत झाली आणि शाळकरी मुले बसमध्ये अडकून पडली होती. पालकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.

Alisha Khedekar

  • कांदिवलीत रिक्षा चालक आणि स्कूल बस कर्मचाऱ्यात वादाचे रूपांतर मारामारीत.

  • वादामुळे वाहतूक विस्कळीत, शाळकरी मुले ३० मिनिटे बसमध्ये अडकली.

  • पालकांनी पोलिसांना माहिती दिल्यावर पोलीस घटनास्थळी दाखल.

  • दोघांना ताब्यात घेऊन कायदेशीर कारवाई सुरू. स्थानिकांत संताप.

मुंबईतील कांदिवली मधून संतापजनक बातमी समोर आली आहे. रिक्षा चालक व स्कूल बस कर्मचाऱ्यांमध्ये एका छोट्या वादानंतर तुफान मारामारी झाली. या घटनेमुळे अर्धा तास वाहतूक विस्कळीत झाली. दरम्यान याप्रकरणी रिक्षाचालक आणि स्कुल बस कर्मचाऱ्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

कांदिवलीतील लोखंडवाला रिक्षा स्टँडजवळ बुधवारी सकाळी मुलांना शाळेत घेऊन जाणाऱ्या बसच्या कर्मचाऱ्यासोबत एका रिक्षा चालकाचा शुल्लक कारणावरून जोरदार वाद झाला. या हमरीतुमरीच्या वादाने थेट मारहाणीचे टोक गाठलं.

बराच वेळ ही मारामारी सुरु राहिल्याने स्कुल बस मधील विद्यार्थ्यांना ताटकळत बसमध्ये बसून राहावे लागले. तसेच या घटनेने अर्धा तास रस्त्यावर वाहतूक कोंडी निर्माण झाली. घडलेल्या घटनेची माहिती मिळताच बस मधील विद्यार्थ्यांच्या पालकांनी पोलिसांना कळवले. मात्र पोलिस पोहोचेपर्यंत मुले तब्बल ३० मिनिटे बसमध्ये वाट पाहत होती.

उपस्थित स्थानिकांनी वेळेत हस्तक्षेप करत वाद मिटवण्याचा प्रयत्न केला. मात्र मारामारीत मग्न असलेल्या रिक्षा चालक आणि बस कर्मचाऱ्याचा वाद काही मिटत नव्हता. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून परिस्थिती नियंत्रणात आणली. तसेच संबंधितांवर कायदेशीर कारवाई सुरू असल्याची माहिती मिळाली आहे. घडलेल्या घटनेचा पालकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.

वाद कुठे झाला?

कांदिवलीतील लोखंडवाला रिक्षा स्टँडजवळ शाळेच्या बस आणि रिक्षाचालक यांच्यात वाद झाला.

कोणत्या कारणामुळे वाद झाला?

एका किरकोळ कारणावरून वाद वाढून मारामारीपर्यंत गेला

या घटनेमुळे काय परिणाम झाला?

अर्धा तास वाहतूक विस्कळीत झाली आणि शाळकरी मुले बसमध्ये अडकली.

पोलिसांची भूमिका काय होती?

पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून दोघांना ताब्यात घेतले असून, कारवाई सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PAN Card Security : पॅन कार्डचा गैरवापर कसा ओळखाल? आर्थिक फसवणुकीपासून वाचण्याचे सोपे उपाय

Maharashtra Live Update: जालन्यातील परतुर तालुक्यातील वाहेगाव श्रीष्टी परिसरात ढगफुटी

Maharashtra Rain Update : छत्रपती संभाजीनगर आणि अमरावतीत ढगफुटी; अनेकांचे संसार रस्त्यावर, बळीराजाच्या डोळ्यातही अश्रू,VIDEO

UPSC ची तयारी करणाऱ्या तरुणावर अ‍ॅसिड हल्ला, मारहाणीनंतर जंगलात फेकलं; VIDEO

'सातपुडा'वरून अंजली दमानियांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना कायदेशीर नोटीस | VIDEO

SCROLL FOR NEXT