Tanushree Dutta Nana Patekar : २०१८ मध्ये काय झालं होतं, तनुश्रीनं नाना पाटेकरांवर काय केले होते आरोप, वाचा सविस्तर

Bollywood Actress Tanushree Dutta: बॉलिवूड अभिनेत्री तनुश्री दत्ता हिने इंस्टाग्रामवर एक भावनिक व्हिडिओ शेअर करत घरात छळ होत असल्याचा आरोप केला आहे. त्या व्हिडिओच्या खाली तिने २०१८ साली झालेल्या 'मी टू' प्रकरणावर भाष्य केलं आहे.
Tanushree Dutta Nana Patekar Me Too Case
Tanushree Dutta Nana Patekar
Published On
Summary
  • अभिनेत्री तनुश्री दत्ता पुन्हा चर्चेत, इंस्टाग्रामवर भावनिक व्हिडिओ पोस्ट.

  • घरात छळ होत असल्याचा आरोप, गोपनीयतेचा अभाव असल्याचं म्हणाली.

  • मी टू प्रकरणाचा संदर्भ देत ५ वर्षांपासून त्रास सुरु असल्याचं विधान.

  • पोलिसांना फोन करून मदतीची विनंती, तक्रार दाखल करण्यास सांगितलं.

अभिनेत्री तनुश्री दत्ता पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. 'आशिक बनाया आपने' सारख्या चित्रपटांमधून प्रसिद्धी मिळवणारी ही अभिनेत्री गेल्या काही काळापासून चित्रपटांपासून दूर आहे, पण आता ती पुन्हा चर्चेत आली आहे. यावेळी कारण आहे - तिचा वेदनादायक व्हिडिओ. मंगळवारी तिने इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला ज्यामध्ये ती खूप रडताना दिसत आहे आणि तिच्या स्वतःच्या घरात तिला छळाचा सामना करावा लागत असल्याचा धक्कादायक आरोप तिने केला आहे. या व्हिडिओसोबत तिने तिच्या कॅप्शनमध्ये २०१८ च्या मी टू चळवळीचाही उल्लेख केला आहे. ही तीच घटना होती जेव्हा तनुश्रीने अभिनेते नाना पाटेकर यांच्यावर लैंगिक छळाचा आरोप केला होता.

नेमकं प्रकरण काय ?

तनुश्री दत्ताने ऑक्टोबर २०१८ मध्ये तक्रार दाखल केली होती. २००८ मध्ये 'हॉर्न ओके प्लीज' या गाण्याच्या शूटिंग दरम्यान नाना पाटेकर यांनी माझा छळ केल्याचे म्हटले होते. नाना पाटेकर यांनी स्पष्टपणे सांगितले होते की ते काहीही अश्लील किंवा त्रासदायक करणार नाहीत, तरीही त्यांनी तिला अयोग्यरित्या स्पर्श केला. असे ही तिने म्हटले. तनुश्री दत्ताने तक्रारीत नाना पाटेकरांसह गणेश आचार्य, अब्दुल सामी सिद्दीकी आणि राकेश सारंग यांचेही नाव घेतले होते. या प्रकरणाची चौकशी केल्यानंतर पोलिसांनी कोणताही गुन्हा सिद्ध झाला नसल्याचे सांगत अहवाल दाखल केला.

Tanushree Dutta Nana Patekar Me Too Case
Tanushree Dutta : "उशीर होण्याआधी मदत करा, घरातच छळ होतोय"; तनुश्री दत्ताने रडत रडत केली विनंती | VIDEO

यानंतर, तनुश्री दत्ताने डिसेंबर २०१९ मध्ये निषेध याचिका दाखल केली, ज्यामध्ये आरोपींविरुद्ध पुढील चौकशी आणि कारवाईची विनंती केली. त्यावर सुनावणी झाली. नाना पाटेकर यांच्या वतीने वकील अनिकेत निकम यांनी युक्तिवाद केला. मुंबई पोलिसांनी सादर केलेल्या क्लोजर रिपोर्ट आणि पुरेशा पुराव्याअभावी न्यायालयाने अखेर तनुश्रीने दाखल केलेली तक्रार फेटाळून लावली.

Tanushree Dutta Nana Patekar Me Too Case
Tanushree Dutta: मराठी माणूस गुन्हेगार असला तरी पोलिसांकडून संरक्षण, तनुश्री दत्ताचे नाना पाटेकरांवर गंभीर आरोप

व्हायरल व्हिडिओमध्ये काय म्हणाली तनुश्री ?

या व्हायरल व्हिडिओमध्ये तनुश्री दत्ता भावनिक होते आणि म्हणते, "मी खूप अस्वस्थ आहे, गेल्या ५ वर्षांपासून मी हे सर्व सहन करत आहे. माझी तब्येत ठीक नाही, मी काम करू शकत नाही किंवा घर सांभाळू शकत नाही. मी पोलिसांना फोन केला आणि त्यांनी मला पोलिस स्टेशनमध्ये येऊन तक्रार दाखल करण्यास सांगितले."

Tanushree Dutta Nana Patekar Me Too Case
Tanushree Dutta: कोणत्या चुकीमुळे तनुश्री दत्ताचं करिअर बरबाद झालं ?

तिने असेही म्हटले आहे की, "मी मोलकरीण ठेवू शकत नाही, कोणीतरी माझ्या घरी हेरगिरी करत आहे. माझ्याकडे गोपनीयता शिल्लक नाही. कृपया, कोणीतरी मला मदत करा." असे अभिनेत्रीने म्हटले आहे.

Q

प्रश्न 1: तनुश्री दत्ताने नेमका काय आरोप केला आहे?

A

तनुश्रीने म्हटलं आहे की, तिच्या स्वतःच्या घरात तिला छळ सहन करावा लागत आहे. तिच्याकडे गोपनीयता नाही आणि तिच्यावर गुप्तपणे नजर ठेवली जात आहे.

Q

या प्रकरणाचं 'मी टू'शी काय संबंध आहे?

A

तनुश्रीने २०१८ मध्ये मी टू मोहिमेंतर्गत नाना पाटेकर यांच्यावर लैंगिक छळाचे आरोप केले होते. आता पुन्हा ती भावनिक अवस्थेत आहे.

Q

तिने पोलिसांकडे तक्रार केली का?

A

तिच्या म्हणण्यानुसार, तिने पोलिसांना फोन केला असून पोलिसांनी तिला स्टेशनमध्ये येऊन तक्रार नोंदवण्यास सांगितलं आहे.

Q

बॉलिवूडमधून काय प्रतिक्रिया मिळत आहेत?

A

अद्याप बॉलिवूडमधून अधिकृत प्रतिक्रिया आलेल्या नाहीत, पण तिच्या या व्हिडिओने खळबळ उडवली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com