Mumbai Car Boat Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai Car Boat: मुंबईच्या समुद्रात चक्क धावतेय Rolls Royce, व्हिडिओ झाला व्हायरल, वाचा

Juhu Beach Viral Video Car Boat in Sea: जूहू बीचवर रोल्स रॉइस कार फिरताना दिसत आहे. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. ही कार समुद्रात नक्की कशी फिरतेय असा प्रश्न सर्वांनाच पडलेला आहे.

Siddhi Hande

मुंबईच्या समुद्रात कार

जूहू बीचमध्ये रोल्स रॉइस कार फिरतानाचा व्हिडिओ

कार बोट करण्याचा नवा प्रयोग

मुंबईतील जुहू बीच हा खूप प्रसिद्ध आहे. जूहू बीचवर अनेक पर्यटक रोज फिरायला जातात. जूहू बीचवर अनेक फिरण्याचे स्पॉट आहेत. दरम्यान, जूहू बीचवरचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. समुद्रात रोल्स रॉइस कार फिरताना दिसत आहे. या कारला पाहण्यासाठी पर्यटकांनी खूप गर्दी केली.

अचानक समुद्रात रोल्स रॉइस कार फिरत असल्याचे पाहून पर्यटकांना धक्काच बसला. या कारला समुद्रातील कार म्हणून संबोधले जाऊ लागले आहे. दरम्यान ही कार समुद्रात कशी तरंगते असा प्रश्न अनेकांना पडला असले. मात्र, ही कार नसून लहान आकाराची बोट आहे.

या बोटीला कारचे रुप देण्यात आले आहे. ही संकल्पान प्रमोद पवारांची आहे. त्यांनी दुबईत एकदा ही अशी कारच्या आकाराची बोट पाहिली होती. त्यामुळे त्यांनी मुंबईतदेखील हा प्रयोग केला आणि बोटीला कारचे स्वरुप दिले.

भारतात केला प्रयोग

प्रमोद पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, दुबईत ते फिरायला गेले असताना समुद्रकिनारी त्यांना ही बोट दिसली. त्यामुळेच त्यांना ही संकल्पना सुचली. तिथे लक्झरी थीम असलेल्या बोटीचा वापर केला आहे. त्यांनी याच संकल्पनेतून ही बोट तयार करण्याचा निर्णय घेतला आणि महाराष्ट्रात येऊन त्यांनी त्यावर काम सुरु केले. याबाबत एनटीव्हीने वृत्त दिले आहे.

यानंतर त्यांच्या टीमने महाराष्ट्राच्या किनारपट्टीची परिस्थिती पाहून, सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून या बोटात बदल केले. या बोटीत ५ लोक बसतात. ही बोट समुद्रात १.८ नॉटिकल प्रवास करु शकते. या बोटीमुळे प्रवाशांना एकदम लक्झरी अनुभव मिळेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Railway News : प्रवाशांसाठी मोठी बातमी! तत्काळ तिकीट बुकिंगसाठी लागणार 'ओटीपी' ; काय आहे रेल्वेचा नियम? वाचा

Shepu Mungdaal Recipe : घराघरात बनणारी स्वादिष्ट शेपू मूगडाळीची भाजी, एकदा करुनच बघा

Maharashtra Live News Update : रोहित पवारांना नाशिकच्या न्यायालयात हजर राहण्याचे आदेश

लग्नात 'रसगुल्ले' संपले अन् महाभारत सुरू झालं, वधू-वर पक्षात तुफान राडा; ताटं, खुर्च्या फेकून मारल्या, VIDEO व्हायरल

DRDO Internship: कोणतीही परीक्षा नाही; डीआरडीओमध्ये इंटर्नशिपची संधी; अर्ज कसा कराल?

SCROLL FOR NEXT