Marine Drive Tunnel Saam tv
मुंबई/पुणे

Marine Drive Tunnel: मुंबईचे पूर्व-पश्चिम समुद्रकिनारे जोडणार! मध्य-पश्चिम रेल्वे अन् मेट्रोखालून खोदले जाणार बोगदे, १५ मिनिटांत मरिन ड्राइव्ह गाठता येणार

Orange Gate to Marine Drive Tunnel: ऑरेंज गेट ते मरिन ड्राइव्ह बोगद्याच्या कामाचे उद्घाटन करण्यात आले आहे. यामुळे मुंबईचा पूर्व आणि पश्चिम समुद्रकिनारा जोडला जाणार आहे.

Siddhi Hande

ऑरेंज गेट ते मरिन ड्राइव्ह बोगद्याच्या कामाला सुरुवात

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते उद्घाटन

मुंबईचा पूर्व आणि पश्चिम समुद्र किनारा जोडला जाणार

नवी मुंबई विमानतळाला जाण्यासाठी आणखी एक मार्ग

दक्षिण मुंबईतील वाहतूक कोंडी कमी होणार

मुंबईकरांसाठी अनेक प्रकल्प सुरु केले जात आहे. यामध्येच आज मुंबई पूर्व आणि पश्चिम किनाऱ्यांना जोडणाऱ्या बोगद्याच्या कामाचे उद्घाटन करण्यात आले आहे. ऑरेंट गेट ते मरिन ड्राइव्ह या बोगद्याचे काम सुरु झाले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी या बोगद्याचे उद्घाटन केले आहे.

मुंबईच्या पायाभूत सुविधांमध्ये दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे, फ्रीवे वरून आल्यानंतर नरिमन पॉईंडकडे जाण्यासाठी मोठ्या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी आता ऑरेंज गेट ते मरीन ड्राईव्ह भुयारी मार्ग तयार करण्यात आला आहे. हा भुयारी मार्ग कोस्टल रोड ते फ्री वे असा जोडला जाणार आहे. आज एमएमआरडीएकडून या भुयारी मार्गाचं टीबीएम लॉन्चिंग झालं आहे.

कसा असणार मार्ग? (Orange Gate to Marine Drive Tunnel)

हा रस्ता दोन बोगद्यांचा असणार आहे. ऑरेंज गेट ते मरिन ड्राइव्ह सागरी किनाऱ्याला जोडला जाणार आहे. हा मार्ग ९.९६ किमी लांब आहे. हा भुयारी मार्ग मध्य व पश्चिम रेल्वेसह भुयारी मेट्रो ६ च्याही खालून जाणार आहे. हा बोगदा मेट्रोच्या ५० मीटर खालून जाणार आहे. तसेच यामध्ये ३.२ किमी रुंदीचे दुपदरी मार्ग असतील मार्ग असणार आहे. यातील एक मार्ग आप्तकालीन परिस्थितीत उपयोगासाठी असेल. या दोन्ही बोगद्यांमधील वाहनांची वेगमर्यादा ८० किमी असणार आहे. या खोदकामासाठी टीबीएम १२.१ मीटर व्यास आणि ८२ मीटर लांबीचे वजन २४०० टन आहे.

१५ मिनिटांचा प्रवास वाचणार (Mumbai east and West Joins)

एमएमआरडीएने दिलेल्या माहितीनुसार, या बोगद्याचे १४ टक्के काम सुरु झाले आहे. हा प्रकल्प ५४ महिन्यांच्या कालावधीसाठी असणार आहे. २०२८ पर्यंत बोगद्याचे काम सुरु करण्याची तयारी आहे. यामुळे मुंबई पूर्व-पश्चिम सहजपणे जोडली जाणार आहे. यामुळे १५-२० मिनिटांचा प्रवास कमी होणार आहे. सुरक्षेसाठी दोन्ही बोगदे ३०० मीटर अंतरावर क्रॉस पॅसेजद्वारे जोडले जाणार आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते उद्घाटन

नवी मुंबई विमानतळाला जाण्यासाठी दोन मार्ग तयार होणार आहे.३.२ किलोमीटरचा एक बोगदा असणार आहे.डिसेंबर २०२८ पर्यंत काम पूर्ण करण्याचा प्लान असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगितले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: हिंजवडीतील शाळेला बॉम्बने उडवण्याची धमकी

Fire : १५ रुग्णालयांच्या इमारतीत भीषण आग, ५० अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी, खिडक्या तोडून...

Maharashtra Politics: मोठी बातमी! CM फडणवीसांनी घेतली संजय राऊतांची भेट, दोन्ही नेत्यांमध्ये २० मिनिटं चर्चा

Black coffee: दररोजची ब्लॅक कॉफी तुमच्या लिव्हरसाठी ठरते फायदेशीर…पण एका अटीवर! तज्ज्ञांनी केले मोठे खुलासे

Jaya Bachchan: 'राज्यसभेत इतके ओरडतात की मला ऐकू येण बंद झालं...'; जया बच्चन असं का म्हणाल्या?

SCROLL FOR NEXT