Maharashtra Government: महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय! जन्म-मृत्यू प्रमाणपत्रासाठी आधार कार्ड पुरावा म्हणून ग्राह्य नाही

Aadhaar Card Invalid For Birth-Death Certificate: महाराष्ट्र सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. जन्म-मृत्यू दाखल्यासाठी आधार कार्ड पुरावा ग्राह्य धरला जाणार नाही.
Aadhaar Card Invalid
Aadhaar Card InvalidSaam Tv
Published On
Summary

जन्म दाखल्यासाठी आधार कार्ड ग्राह्य नाही

आधार कार्डच्या आधारावर दिलेली जन्म प्रमाणपत्रे रद्द करण्याचे आदेश

फसवणूक रोखण्यासाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय

राज्य सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आता आधार कार्ड तुमच्या जन्मदाखला किंवा मृत्यू प्रमाणपत्रासाठी ग्राह्य धरला जाणार आहे. आता जन्मतारखेचा पुरावा म्हणून आधार कार्ड देऊ शकत नाही. जन्म दाखल्याबाबत होणारी फसवणूक रोखण्यासाठी हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.

Aadhaar Card Invalid
UIDAI: आता काही सेकंदात करा आधार कार्ड डाउनलोड अन् अपडेट; नवीन Aadhaar App लाँच; फीचर्स वाचा

सरकारची मोठी कारवाई

बोगस जन्म-मृत्यू दाखले रद्द करण्याचे आदेश देण्यात आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी यासाठी पाऊल उचलले आहे. जन्म-मृत्यू दाखल्यांच्या नोंदीबाबत मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.

राज्यात बेकायदेशीर आणि खोट्या कागदपत्रांच्या आधारे मिळविलेल्या जन्म-मृत्यू दाखल्यांचे रॅकेट मोडणार आहे. आता आधार कार्डच्या पुराव्यावर दिलेले आणि संशयास्पद जन्म-मृत्यू दाखले तात्काळ रद्द करण्याचे आदेश दिले आहेत. जर कोणी असे केले तर पोलिसात तक्रार दाखल करण्याचेही आदेश देण्यात आले आहे.

महाराष्ट्र सरकारने याबाबत आदेश जारी केले आहेत. आधार कार्ड हे विलंबित जन्म प्रमाणपत्र बनवण्यासाठी पुरावा म्हणून ग्राह्य धरले जाणार नाही.

सरकारच्या सूचना काय?

११ ऑगस्ट २०२३च्या कायदा दुरुस्तीनंतर नायब तहसीलदारांनी दिलेले सर्व आदेश तात्काळ परत घेणे. जिल्हाधिकारी स्तरावर त्यांची पडताळणी करणे

प्रलंबित अर्जांवर कार्यवाही करा. आरोग्य विभागाच्या एसओपीचे पालन न झाल्यास सर्व प्रमाणपत्रे रद्द करावीत.

आधार आणि जन्मदाखल्यावरील तारखेत तफावत आढळल्यास पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करावा

तहसीलदारांच्या आदेशानंतरही महानगरपालिकेने जारी केलेल्या प्रमाणपत्रात कोणतीही तफावत नाही ना त्याची माहिती घ्या.

तहसीलदारांना आदेश नसतानाही प्रमाणपत्रे जारी केली असल्यास त्यांच्यावर कारवाई करावीय

आधार कार्डच्या आधारे (शाळेचा दाखला किंवा इतर कोणताही जन्म पुरावा नसताना) दिलेली सर्व जन्म प्रमाणपत्रे रद्द करावी

आधार कार्डला यापुढे पुरावा म्हणून मान्यता दिली जाणार नाही

Aadhaar Card Invalid
Government Scheme: १० लाख महिलांच्या खात्यात आज खटाखट जमा होणार ₹१०,०००; मुख्यमंत्री करणार ट्रान्सफर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com