Video : तेरे जैसा यार कहाँ... गाणं म्हणणारे तहसीलदार निलंबित, निरोप समारंभाची पोस्ट पडली महागात

Tehsildar Suspended For Singing : तहसीलदारांना कार्यालयात बसून गाणे म्हणणे चांगलेच महागात पडलंय. लातूर जिल्ह्यात नेमका काय प्रकार घडलाय आणि महसूलमंत्र्यांनी काय कडक इशारा दिलाय. पाहूया एक रिपोर्ट..
Tehsildar Suspended For Singing
Tehsildar Suspended For Singingsaam tv
Published On

Viral Video : याराना सिनेमातील अमिताभ बच्चनचे हे गाणं आहे. तुम्हाला वाटत असेल कुठल्या तरी खासगी कार्यक्रमातील हे चित्र आहे. पण नाही हे ठिकाण आहे नांदेड जिल्ह्यातील उमरीचे तहसिलदार तथा तालुका दंडाधिका-यांचे कार्यालय...हे गाणं गातायेत खुद्द तहसीलदार प्रशांत थोरात...निरोप समारंभाच्या कार्यक्रमात गाणे गाण्याचा मोह त्यांच्या अंगलट आला आहे.

थोरात हे उमरी येथे तहसीलदार म्हणून कार्यरत होते. नुकतीच त्यांची बदली लातूर जिल्ह्यातील रेणापूर येथे झाली होती. उमरी येथे ८ ऑगस्टला त्यांच्यासाठी निरोप समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. सोशल मीडियावर हा व्हिडिओची पोस्ट व्हायरल झाली. यावर तीव्र प्रतिक्रीया उमटल्या. महसूल मंत्र्यांच्या आदेशावरुन विभागीय आयुक्तांनी तहसिलदारांवर निलंबनाची कारवाई केलीय. महसूलमंत्र्यांनी अधिका-यांना कडक इशारा दिलाय.

Tehsildar Suspended For Singing
Maharashtra Politics : शिंदेसेनेला हादरा, नाराज नेता भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत

अशा प्रकारे अधिका-याचं निलंबन होण्याची राज्यातील ही पहिलीच वेळ आहे. शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी सोशल मीडियाचा वापर करण्याबाबत नवे मार्गदर्शक नियम नुकतेच जाहीर केले आहेत. डिजिटल युगात सोशल मीडियाचा जबाबदारीने वापर व्हावा आणि शासकीय यंत्रणेची विश्वासार्हता अबाधित राहावी, यासाठी नियमावली करण्यात आली आहेत. अधिका-यांनी आपल्या पदाची प्रतिष्ठा जपणे अपेक्षित आहे. महसूल प्रशासनातील ही कारवाई इतर अधिका-यांसाठी एक इशारा मानला जात आहे. इतर अधिकारी अधिक जबाबदारीने वागतील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे

Tehsildar Suspended For Singing
१७ व्या वर्षी वेश्याव्यवसाय, दुबईच्या बारमध्ये नाचली; दिग्दर्शकामुळे झाली बॉलिवूडमध्ये एन्ट्री

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com