Aadhaar Card: UIDAI चा मोठा निर्णय! २ कोटी आधार कार्ड कायमचे बंद; तुमचं नाव तर नाही ना? वाचा सविस्तर

UIDAI 2 Crore Aadhaar Card Deactivated: यूआडीएआयने आधार कार्डबाबत एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आता २ कोटी मृत व्यक्तींचे आधार कार्ड निष्क्रिय करण्यात आले आहे.
 Aadhaar Card
Aadhaar Card Saam Tv
Published On
Summary

आधार कार्डबाबत सरकारने घेतला मोठा निर्णय

२ कोटी आधार कार्ड केले निष्क्रिय

मृत व्यक्तींचे आधार नंबर बंद

भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. यूआयडीएआयने जवळपास २ कोटींपेक्षा जास्त नागरिकांचे आधार कार्ड निष्क्रिय केलेल आहे. केंद्र सरकार आणि विविध राज्य सरकारकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे मृत व्यक्तींचे आधार क्रमांक निष्क्रिय केले आहे. याबाबत निवेदन जारी केले आहे.

 Aadhaar Card
Aadhaar Download: तुमचं आधार कार्ड हरवलंय आणि नंबरही आठवेना? टेन्शन सोडा! तरीही घरबसल्या मिळेल तुमचं कार्ड, जाणून संपूर्ण प्रक्रिया

UIDAI ने दिलेल्या माहितीनुसार, भारतातील रजिस्टार जनरल, राज्ये व केंद्रशासित प्रदेश, सार्वजनिक वितरण व्यवस्था, राष्ट्रीय सामाजिक सहाय्यक कार्यक्रम इत्यादींमधून मृत व्यक्तींचा डेटा मिळवला आहे.

भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणारने आधार डेटाबेसची अचूकता कायम ठेवण्यासाठी देशभरात मोहिम सुरु केली होती. यामध्ये आता २ कोटींपेक्षा जास्त मृत व्यक्तींचे आधार कार्ड निष्क्रिय केले आहे. याचसोबत मृत व्यक्तींचा डेटा मिळवण्यासाठी वित्तीय आणि इतर संस्थाची मदत घेण्याचा विचार करत असल्याचे आधार कस्टोडियनने सांगितले आहे.

मृत व्यक्तींचा नोंदण पोर्टलवर करावी

ज्या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे त्याबाबतची नोंद आधार पोर्टलवर करावी. मृत्यू प्रमाणपत्र मिळाल्यानंतर ही नोंद करावी, असं आवाहन UIDAI ने केलं आहे. जेणेकरुन मृत व्यक्तींचे आधार कार्ड निष्क्रिय करणे सोपे जाईल. हा आधार कार्ड नंबर कोणत्याही दुसऱ्या व्यक्तीला दिला जात नाही.

फसवणूकीला आळा घालण्यासाठी निर्णय

मृत व्यक्तींचे आधार कार्ड वापरुन फसवणूक होऊ नये, यासाठी हा निर्णय घेतला आहे. मृत व्यक्तींचे आधार नंबर निष्क्रिय केले जातील. जेणेकरुन डेटा मिळवण्यास मदत होईल.

UIDAI ने यावर्षीच आधार पोर्टलवर मृत व्यक्तींची नोंद करण्याची सुविधा केली आहे. २५ राज्ये आणि केंद्रशासिक प्रदेशांमध्ये नोंदणीकृत मृत्यूंसाठी ही सुविधा सुरु केली आहे.

 Aadhaar Card
Aadhaar Update Rule: आधार कार्डवरील नाव, पत्ता बदलायचाय? ही कागदपत्रे लागणार; UIDAI ने जारी केले नवे नियम

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com