सूरज मसुरकर
Indu Mill Smarak News: मुंबईच्या दादर येथील इंदू मिल येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा ३५० फूट उंच पुतळा उभारण्यासाठी राज्य सरकारने हिरवा कंदील दिला आहे. राज्य सरकारच्या निर्णयाने इंदू मिल येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची भव्य दिव्य प्रतिमा पाहायला मिळणार आहे. (latest marathi news)
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा ३५० फूट उंच पुतळा उभारण्याचा निर्णय शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने घेतला आहे. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने शिल्पकार राम सुतार यांच्या कार्यशाळेला भेट दिल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.
शिल्पकार राम सुतार यांच्या कार्यशाळेला आंबेडकर कुटुंब, आंबेडकर चळवळीतील मान्यवरांनी भेट दिली होती. गाझियाबादमधील कार्यशाळेतील २५ फूट उंच प्रतिकृती पाहिल्यनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. कार्यशाळेतील २५ फुटी प्रतिकृतीप्रमाणे दादर येथे ३५० फूट उंच पुतळा उभारण्यात येणार आहे .
दरम्यान, दादरच्या इंदू मिलमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय स्मारकाचं काम युद्धपातळीवर सुरू आहे. २०२५ सालच्या मार्च-एप्रिल महिन्यात हे स्मारक पूर्ण होईल असा अंदाज आहे, असं सांगण्यात येत आहे. इंदूमधील स्मारकाचं काम लवकरात लवकर पूर्ण होईल,असं आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही महिन्यांपूर्वी दिलं होतं.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.