PM Modi Speech Avishwas Prastav: विरोधक तयारी का करत नाहीत?; अविश्वास प्रस्तावावर PM मोदींची १० मोठी वक्तव्ये

PM Modi On No Confidence Motion : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज, गुरुवारी लोकसभेत अविश्वास प्रस्तावावरील चर्चेला उत्तर देतानाच विरोधकांवर जोरदार हल्ला चढवला.
PM Modi On Avishwas Prastav
PM Modi On Avishwas PrastavSAAM TV
Published On

PM Narendra Modi's Speech On Avishwas Prastav:

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज, गुरुवारी लोकसभेत अविश्वास प्रस्तावावरील चर्चेला उत्तर देतानाच विरोधकांवर जोरदार हल्ला चढवला. अविश्वास प्रस्ताव विरोधकांनी आणला, मात्र चौकार-षटकार इकडून लगावले. तुम्हाला तयारी करायला पुरेसा वेळ दिला होता, पण तुम्ही पूर्ण तयारी का करून येत नाहीत? काय दारिद्र्य आहे? असा चिमटा मोदींनी विरोधकांना लगावला.

काँग्रेसचे नेते राहुल गांधी पंतप्रधान मोदींचे भाषण ऐकण्यासाठी सभागृहात उपस्थित नव्हते. नियोजित कार्यक्रमांनुसार, पंतप्रधान मोदी संध्याकाळी ४ वाजता लोकसभेत निवेदन करणार होते. मोदी सभागृहात आले. मात्र, संध्याकाळी ५ वाजले तरी मोदींनी अविश्वास प्रस्तावावर निवेदन केले नाही. त्यानंतर राहुल गांधी हे मोदींचे भाषण सुरू होण्याआधीच सभागृहातून निघून गेले. नियोजित बैठकांसाठी राहुल गांधी गेल्याचे सांगण्यात येत आहे. (Latest Marathi News)

PM Modi On Avishwas Prastav
PM Modi On Avishwas Prastav: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणादरम्यान विरोधक आक्रमक, सभागृहात 'मणिपूर.. मणिपूर...'च्या घोषणा

पंतप्रधान मोदींच्या भाषणातील ठळक मुद्दे

>> मी २०१८ साली म्हणालो होतो की, २०२३ मध्ये पुन्हा अविश्वास प्रस्ताव आणा. तरीही तुम्ही काही खास तयारी केली नाही. तुम्ही देशाला निराशेशिवाय दुसरं काही दिलं नाही. ज्यांचे वही-खाते बिघडले आहेत, तेही आमच्याकडे हिशेब मागत फिरत आहेत हेच मी बोलू शकतो.

>> अविश्वास आणि अहंकार विरोधकांच्या नसानसांत भिनला आहे. त्यांना जनतेचा विश्वास कळत नाही. जेव्हा घरात शुभ घडतं, त्यावेळी नजर लागू नये म्हणून काळा टिळा लावतात. आज देशाचे जे चांगले झाले आहे, वाहवा होत आहे, त्यावर मी तुमचे आभार मानत आहे की काळ्या टिळ्याच्या रुपानं काळे कपडे घालून सभागृहात येतात.

PM Modi On Avishwas Prastav
PM Modi Speech On Avishwas Prastav : गरिबांच्या भूकेची पडली नाही, यांना सत्तेची भूक; PM मोदींचा विरोधकांवर घणाघात

>> या अविश्वास प्रस्तावात काही विचित्र गोष्टी घडल्या. सभागृहात सर्वात मोठ्या विरोधी पक्षाच्या नेत्याचे नाव यादीत नाही. सन १९९९ मध्ये वायपेयी सरकारच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव आणला गेला. शरद पवार त्यावेळी नेतृत्व करत होते. त्यांनी चर्चेला सुरुवात केली. २००३ मध्ये वाजपेयींचे सरकार होते. तेव्हा सोनियाजी विरोधी पक्षनेता होत्या. त्यांनी अविश्वास प्रस्ताव मांडला. चर्चेला सुरुवात केली. २०१८ मध्ये मल्लिकार्जुन खरगे विरोधी पक्षनेता होते. त्यांनी अविश्वास प्रस्ताव आणला. पण यावेळी अधीरबाबूचे काय हाल झाले. त्यांना बोलण्याची संधी दिली नाही. अमितभाईंनी सांगितलं म्हणून त्यांना आज संधी मिळाली. पण गुळाचं गोबर कसं करायचं यात ते माहीर आहेत.

>> विरोधक अविश्वास प्रस्तावावर योग्य रितीने चर्चा करू शकले नाहीत. विरोधकांनी फिल्डिंग लावली. पण चौकार-षटकार इकडून लगावले. अविश्वास प्रस्तावावर विरोधक नो बॉल टाकत आहेत. तर सरकार शतक ठोकत आहेत. तुम्ही लोक तयारी का करून येत नाहीत. थोडे कष्ट करून या. २०१८ मध्येच तयारी करून या असे सांगितले होते, पण या पाच वर्षांत काहीच बदललं नाही.

>> शेतात व्हिडिओ शूट केलं जातं. एचएएलच्या बाबतीत विरोधक काय काय नाही बोलले? आज एचएएलने यशाचे शिखर गाठलं आहे. एचएएल संपलीये असं विरोधक म्हणत होते. पण आज तीच देशाची शान बनली आहे. एलआयसीबाबतही असंच बोललं गेलं. बँकिंग सेक्टरच्या बाबतीतही विरोधकांनी संभ्रम पसरवला. ज्या ज्या संस्थांवर यांनी हल्लाबोल केला, त्या आणखी मजबूत होतात. देशात लोकशाही आणखी मजबूत होईल अशी अपेक्षा आहे. विरोधक बोटे मोडतात, पण लोकशाही आणखी मजबूत होत आहे.

>> देशातील जनतेने आमच्या सरकारवर वारंवार विश्वास दाखवला आहे. मी आज देशातील कोट्यवधी नागरिकांचे आभार व्यक्त करण्यासाठी सभागृहात उभा आहे.

>> संसदेच्या अधिवेशनात अनेक विधेयकं होती. जे गाव, गरीब, दलित, मागास आणि आदिवासी समाजातील नागरिकांसाठी होती. त्यांच्या कल्याण आणि भविष्याशी जोडलेले होते. पण विरोधकांना त्याची चिंता नाही. त्यांना देशापेक्षा पक्ष महत्वाचा आहे, असे त्यांच्या वर्तनातून दिसते. यांना गरिबांच्या भूकेची चिंता नाही, तर यांना सत्तेची भूक आहे.

>> एकप्रकारे विरोधकांचा अविश्वास आमच्यासाठी शुभ ठरत आहे. जनतेच्या आशीर्वादाने २०२४ साली एनडीए आणि भाजप मागील सर्व विक्रम मोडून पुन्हा सत्तेवर येईल.

>> आमचे लक्ष देशाच्या विकासावर असलं पाहिजे. ही काळाची गरज आहे. आमच्या युवकांमध्ये स्वप्न साकार करण्याची शक्ती आहे. आम्ही देशाच्या तरूणांना भ्रष्टाचारमुक्त सरकार, आकांक्षा आणि खूप साऱ्या संधी दिल्या आहेत.

>> आमच्या सरकारने युवकांना घोटाळेमुक्त सरकार दिले आहे. भारताला पुन्हा नव्या उंचीवर पोहोचवलं आहे. जगात भारतावरील विश्वास वाढतच आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com