मुंबईमध्ये फेरीवाल्यांचा सरकारी अधिकाऱ्यांवर हल्ला, भररस्त्यात बेदम मारहाण; धडकी भरवणारं दृश्य  Saam TV Marathi
मुंबई/पुणे

मुंबईमध्ये फेरीवाल्यांचा सरकारी अधिकाऱ्यांवर हल्ला, भररस्त्यात बेदम मारहाण; धडकी भरवणारं दृश्य

Mumbai illegal hawkers crackdown : मुंबईतील कांदिवली पूर्व येथील लोखंडवाला परिसरात बेकायदेशीर फेरीवाल्यांवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या बीएमसी पथकावरच हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

Namdeo Kumbhar

संजय गडदे, मुंबई प्रतिनिधी

मुंबईतील उपनगरांमध्ये बेकायदेशीर फेरीवाल्यांची मुजोरी आता जास्तच झाल्याचे दिसतेय. कांदिवली पूर्व येथील उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या लोखंडवाला परिसरात बीएमसी अधिकाऱ्यांच्या एका कारवाई दरम्यान खळबळजनक घटना घडली. बेकायदेशीर फेरीवाल्यांवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या BMC पथकावरच फेरीवाल्यांनी संघटितपणे हल्ला चढवला. या हल्ल्यामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

स्थानिक रहिवाशांच्या तक्रारीनंतर महापालिकेचे पथक जप्तीची कारवाई करत असताना, संतापलेल्या फेरीवाल्यांनी सरकारी कामात अडथळा आणत कर्मचाऱ्यांशी झटापट केली. याप्रकरणी समता नगर पोलिसांनी तातडीने चक्र फिरवत तिघांना बेड्या ठोकल्या आहेत.या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कांदिवली पूर्वेतील लोखंडवाला परिसरात मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर फेरीवाले रस्त्यावर व्यवसाय करत असल्याबाबत तक्रारी येत होत्या. त्यानुसार महापालिकेचे पथक कारवाईसाठी त्या ठिकाणी पोहोचले होते. मात्र कारवाईदरम्यान काही फेरीवाल्यांनी आक्रमक होत महापालिकेच्या कर्मचाऱ्यांवर हल्ला केल्याचे सांगितले जात आहे.

या घटनेची माहिती मिळताच समता नगर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी बेकायदेशीर फेरीवाल्यांविरुद्ध गुन्हा दाखल करत कारवाई सुरू केली असून आतापर्यंत 3 फेरीवाल्यांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास समता नगर पोलिसांकडून केला जात आहे.

दरम्यान, लोखंडवाला परिसरात बेकायदेशीर फेरीवाल्यांची वाढती दादागिरी आणि गुंडगिरीमुळे स्थानिक नागरिक त्रस्त झाले आहेत. रस्ते अडवून व्यवसाय केल्यामुळे वाहतुकीलाही अडथळा निर्माण होत असल्याची तक्रार स्थानिकांकडून केली जात आहे. या पार्श्वभूमीवर बेकायदेशीर फेरीवाल्यांवर कठोर कारवाई करावी आणि परिसरात कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kidney disease: किडनी खराब होण्याआधी शरीर देतं हे ५ धोकादायक इशारे; क्रिएटिनिन वाढण्याचं खरं कारण जाणून घ्या

Early cancer symptoms: तिसऱ्या आणि चौथ्या स्टेजमध्येच का होतं कॅन्सरचं निदान? डॉक्टरांनी सांगितलं यामागचं कारण

सकाळी नाश्त्याला प्या गरमा गरम गाजर-मशरूम सूप; झटपट बनवा ही सोपी रेसिपी

Goa Fort : गोवा ट्रिपमध्ये करा इतिहासाची सफर, 'हा' भव्य किल्ला पाहायला विसरू नका?

Maharashtra News Live Update: राज्यात मुसळधार, पण बुलडाण्यात पावसाची दडी

SCROLL FOR NEXT