office colleague Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai High Court: ऑफिसमध्ये महिला सहकाऱ्याच्या स्तनांकडे एकटक बघणे गुन्हा नाही, मुंबई हायकोर्टाने काय दिला निकाल?

Office Colleague: ऑफिसमध्ये महिला सहकाऱ्याच्या स्तनांकडे एकटक बघणे गुन्हा नाही असा निर्णय मुंबई हायकोर्टाने एका प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान दिला. एका महिलेने यासंदर्भात हाय कोर्टात धाव घेत तक्रार दाखल केली होती.

Priya More

Summary -

  • मुंबई हायकोर्टाचा महत्वाचा निकाल

  • महिलेच्या शरीराकडे एकटक पाहणे नैतिकदृष्ट्या चुकीचे पण गुन्हा नाही

  • IPC 354C अंतर्गत व्हॉय्युरिझमची मर्यादा स्पष्ट

  • कायदा आणि नैतिकता यातील फरक अधोरेखित

मुंबई हायकोर्टाने कामाच्या ठिकाणी होणाऱ्या वर्तणुकीसंदर्भात एक महत्वपूर्ण निकाल दिला आहे. एका प्रकरणावर सुनावणी करताना हायकोर्टाने स्पष्ट केले की, ऑफिसमध्ये असताना एखाद्या महिला सहकाऱ्याच्या स्तनाकडे एकटक पाहणे किंवा निरखून बघणे हे नैतिकदृष्ट्या आक्षेपार्ह असले तरी भारतीय दंड संहितेच्या कलम ३५४सी अंतर्गत त्याला 'व्हॉय्युरिझम' म्हणजे दुसऱ्याचे खासगी आयुष्य चोरून पाहणेचा गुन्हा मानले जाऊ शकत नाही. हायकोर्टाने स्पष्टपणे सांगितले की, नैतिकता आणि कायदा यांच्यात एक सूक्ष्म सीमारेषा आहे आणि कोणत्याही कायद्याचा अर्थ त्याच्या निर्धारित मर्यादेपलीकडे लावला जाऊ शकत नाही.

न्यायमूर्ती अमित बोरकर यांच्या खंडपीठाने हा महत्वपूर्ण निकाल दिला आहे. न्यायमूर्ती अमित बोरकर यांच्या एकल-न्यायाधीश खंडपीठाने एका प्रसिद्ध कंपनीच्या कर्मचाऱ्याविरोधात दाखल केलेल्या एफआयआर रद्द करत हा निकाल दिला आहे. सुनावणीदरम्यान न्यायमूर्ती अमित बोरकर यांनी असे मत मांडले की, आरोपीचे वर्तन व्यावसायिक वातावरणाला न शोभणारे असले तरी तांत्रिक आणि कायदेशीरदृष्ट्या त्याचे वर्गीकरण व्हॉय्युरिझम म्हणून केले जाऊ शकत नाही.

नेमकं काय प्रकरण आहे?

हा संपूर्ण वाद एका विमा कंपनीमध्ये सुरू झाला. कंपनीतील एका महिला कर्मचाऱ्याने एका वरिष्ठ सहकाऱ्यावर गंभीर आरोप केले होते. तक्रारदार महिलेने आरोप केला की, ऑफिसमध्ये आरोपी तिच्याकडे नीट पाहायचा नाही. तो तिच्या स्तनांकडे एकटक पाहायचा. ऐवढेच नाही तर तो अश्लील टिप्पणी करून कामाच्या ठिकाणी अवस्थ वातावरण निर्माण करत होता. या प्रकरणी कायदेशीर कारवाई सुरू होण्यापूर्वी कंपनीच्या अंतर्गत तक्रार समितीने या प्रकरणाची चौकशी केली होती. आपली चौकशी पूर्ण केल्यानंतर आयसीसीने संबंधित व्यक्तीला निर्दोष ठरवले. असे असूनही हे प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचले आणि भारतीय दंड संहितेच्या कलम ३५४सी अंतर्गत त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान कोर्टाने स्पष्ट केले की, भारतीय दंड संहितेचे कलम ३५४ सी हे व्हॉय्युरिझमशी संबंधित आहे. ही तरतूद तेव्हा लागू होते जेव्हा एखादी व्यक्ती एखाद्या महिलेला तिच्या खासगी कृत्यादरम्यान पाहते किंवा ती असे कृत्य करत असताना तिचे फोटो किंवा व्हिडिओ काढते. या प्रकरणात खासगी कृत्य म्हणजे असा कोणताही क्षण, जेव्हा स्त्रीला संपूर्ण एकांताची अपेक्षा असते. जेव्हा एखादी स्त्री स्वच्छतागृहाचा वापर करत असते किंवा तिचे कपडे बदलत असते ही सर्व कृत्ये खासगी कृत्याच्या श्रेणीत येतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

भाजप नेत्याच्या पीएची भररस्त्यात गोळ्या झाडून हत्या, थरकाप उडवणारा VIDEO समोर

West bengal CM Race: भाजपचं धक्कातंत्र? मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत मोठा ट्विस्ट, महिला नेत्या अचानक दिल्लीत धडकल्या

लग्नाआधी वजन घटवण्याचं औषध? दिखाव्याच्या दुनियेत आरोग्याशी खेळ

ममता दीदींकडून केंद्र सरकारची कोंडी, राजीनामा न दिल्यानं संघर्ष वाढणार?

Cricketer Death : पंजाब किंग्जच्या माजी क्रिकेटपटूचं ३७ व्या वर्षी निधन, क्रिकेटविश्वात शोककळा

SCROLL FOR NEXT