Beed News : बीडची फार चांगली इमेज बाहेर राहिली नाही; न्यायमूर्ती संतोष चपळगावकर यांनी व्यक्त केली खंत

Beed : जिल्ह्यात इंडस्ट्री यायला तयार नाही चांगला अधिकारी यायला तयार नाही हे बदलायला हवं. तसेच नकारात्मक बाजू दाखवणाऱ्या बातम्याबाबत देखील न्यायमूर्ती चपळगावकर यांनी खंत व्यक्त केली
Beed News
Beed NewsSaam tv
Published On

योगेश काशीद 

बीड : बीड जिल्हा हा चांगला आहे. मात्र राजकारणामुळे मागील काही दिवसांपासून वेगवेगळ्या गोष्टी मागील काही दिवसांपासून घडत आहेत. या सर्व गोष्टींमुळे बाहेर बीडची ईमेच फार चांगली राहिलेली नाही; अशी खंत न्यायमूर्ती संतोष चपळगावकर यांनी व्यक्त केली असून बीड इमेज पुन्हा चांगली करण्यासाठी वकील मंडळींनी पुढाकार घ्यावा; असे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले.

बीडमध्ये वकील संघाच्यावतीने वार्षिक स्नेहसंमेलनचे आयोजन करण्यात आले आहे. या स्नेहसंमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी न्यायमूर्ती चपळगावकर बोलत होते. यावेळी त्यांनी बीड जिल्ह्यात इंडस्ट्री यायला तयार नाही चांगला अधिकारी यायला तयार नाही हे बदलायला हवं. तसेच नकारात्मक बाजू दाखवणाऱ्या बातम्याबाबत देखील न्यायमूर्ती चपळगावकर यांनी खंत व्यक्त केली. 

Beed News
Bee Attack : शिवालयात दर्शनासाठी आलेल्या भाविकांवर मधमाशांचा हल्ला; १५ भाविक गंभीर जखमी

सर्व समाजाला एकप्रकारे त्रास 

बीड मधला माणूस प्रेमळ आहे. सर्वांना सोबत घेऊन चालणारा आहे. परंतु राजकारणामुळे काही गोष्टी घडत आहेत. याचा सर्व समाजाला एक प्रकारे त्रास होत आहे. बीडमध्ये नवीन इंडस्ट्री यायला तयार नाही. चांगला अधिकारी यायला तयार नाही. न्यायाधीश मंडळींना तर बीडला बदली झाली की शिक्षा म्हणून झाली की काय असं वाटायला लागतं. या गोष्टी बदलण्यासाठी वकील मंडळींनी पुढाकार घ्यावा; असं मत मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती संतोष चपळगावकर यांनी व्यक्त केले. 

Beed News
Nashik Crime : सरपंचाच्या डोक्यात सैतान घुसला, २ बहिणींवर अत्याचार केला, आजीने केली मदत, चांदवड हादरलं

नकारात्मक प्रतिमा बदलण्यासाठी प्रयत्न हवेत 
बीडच्या नकारात्मक बाबीच मीडियातून समोर येत आहेत. या ऐवजी सकारात्मक बाबी समोर यायला पाहिजेत. एकंदरीत बीडबाबत असलेली सर्व नकारात्मक प्रतिमा बदलण्यासाठी वकील मंडळींनी पुढाकार घ्यावा; अशी अपेक्षा देखील न्यायमूर्ती चपळगावकर यांनी व्यक्त केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com