Nashik Crime : सरपंचाच्या डोक्यात सैतान घुसला, २ बहिणींवर अत्याचार केला, आजीने केली मदत, चांदवड हादरलं

Nashik News : सरपंच पदाला काळिमा फासणारी घटना नाशिकच्या चांदवड तालुक्यात उघडकीस आली आहे. चांदवड तालुक्यातील गावातील अल्पवयीन मुलीला व तिच्या बहिणीसोबत सरपंचने अत्याचार केल्याची घटना उघडकीस
Chandwad Crime
Chandwad CrimeSaam tv
Published On

अजय सोनवणे 
चांदवड (नाशिक)
: गावचे प्रश्न सोडविणारा कारभारीकडूनच संतापजनक कृत्य झाल्याचे समोर आले आहे. नाशिकच्या चांदवड तालुक्यातील एक गावात मुलींच्या आजीच्या मदतीने सरपंचाने दोघा बहिणींवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेने खळबळ उडाली असून या प्रकरणी चांदवड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

सरपंच पदाला काळिमा फासणारी घटना नाशिकच्या चांदवड तालुक्यात उघडकीस आली आहे. चांदवड तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन मुलीला व तिच्या बहिणीसोबत गावचा सरपंच साईनाथ नागु कोल्हे याने लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. या सरपंचाने दोन्ही मुलींना ब्रम्हगिरी लॉज (त्र्यंबकेश्वर) नाशिक, शिर्डी (अहिल्यानगर) व विटावे येथे घेऊन जाऊन शरीरसंबंध प्रस्थापित केले. यासाठी त्याने मुलींच्या आजीचीच मदत घेतल्याचे समोर आले आहे. 

Chandwad Crime
Akola News : काँग्रेस आमदार साजिदखान पठाण यांना नागपूर खंडपीठाची नोटीस; अवैध मतदानाबाबत भाजप उमेदवाराकडून याचिका

आजीने मुलींना ठेवले घरात कोंडून 

दरम्यान सदर प्रकरणात दोन्ही मुलींची आजी संगीता अहिरे हिने सरपंच साईनाथ कोल्हे व संजय पवार यांच्या सोबत मुलींना जाण्यास सांगितले, मात्र मुलींनी सोबत जाण्यास नकार दिला. यामुळे आजीने चिडून हाताचापटीने मुलींना मारहाण करुन दोघींना चावा घेतला. इतकेच नाही तर शिवीगाळ दमदाटी करुन दोघीना घरात कोंडून ठेवले होते. अशी फिर्याद तक्रारदार मुलीने चांदवड पोलीस स्टेशनला पोलीस निरीक्षक कैलास वाघ यांच्याकडे दिली.

Chandwad Crime
Bee Attack : शिवालयात दर्शनासाठी आलेल्या भाविकांवर मधमाशांचा हल्ला; १५ भाविक गंभीर जखमी

तिघांविरुद्ध गुन्हा दाखल  

यानंतर पोलिसांनी तपास करत अत्याचार केल्याप्रकरणी चांदवड तालुक्यातील सरपंच साईनाथ नागु कोल्हे, साथीदार संजय त्र्यंबक पवार व मुलीची आजी संगीता मनोहर अहिरे या तीघाविरोधात बालकांचे लैगिक अपराध व अनुजाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल झाला आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. सदर घटनेचा मनमाड विभागाचे पोलीस उपअधिक्षक बाजीराव महाजन हे तपास करीत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com