Mumbai Rain Today SAAM TV
मुंबई/पुणे

Mumbai Rain Today : मुंबईत मुसळधार; रेल्वे वाहतूक उशिराने, रस्ते तुंबले

Mumbai Rain Alert News : मुंबई आणि उपनगरांत मागील दोन तासांपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. या पावसाचा फटका पश्चिम रेल्वे आणि रस्ते वाहतुकीला बसला आहे.

Nandkumar Joshi

सचिन गाड, संजय गडदे, मुंबई

Mumbai Rain Updates Today News : मुंबई आणि उपनगरांत मागील दोन तासांपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. या पावसाचा फटका पश्चिम रेल्वे आणि रस्ते वाहतुकीला बसला आहे. अनेक रस्त्यांवर पावसाचे पाणी साचले आहे. त्यामुळे वाहतूक मंदावली आहे. तर पश्चिम रेल्वेची वाहतूक पंधरा मिनिटे उशिराने आहे.

मुंबईला गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पावसाने झोडपले. त्यानंतर आज, शुक्रवारी सकाळपासूनच मुंबई आणि उपनगरांमध्ये पाऊस कोसळत आहे. गेल्या दोन तासांपासून मुसळधार पाऊस कोसळत असल्याने रस्त्यांवर पाणी साचले आहे. परिणामी रस्ते वाहतूक मंदावली आहे. (Mumbai Rain Updates)

रस्ते वाहतूक (Road Traffic) मंदावल्याने नागरिकांचे हाल झाले. मुसळधार पावसाचा (Heavy Rain) सर्वाधिक फटका पश्चिम रेल्वेच्या वाहतुकीला बसला आहे. पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. जोरदार कोसळणाऱ्या पावसामुळे हवेतील दृश्यमानता कमी झाल्यामुळे पश्चिम रेल्वे मार्गावरील लोकल वाहतूक साधारणपणे पंधरा ते वीस मिनिटे उशिराने सुरू आहे. विविध स्थानकांवर प्रवाशांची गर्दी देखील वाढली आहे.

मुंबईतील रस्ते पाण्याखाली

हवामान खात्याने मुंबईमध्ये ऑरेंज अलर्ट जाहीर केला होता. तो अंदाज खरा ठरला. मुंबईत आज सकाळपासूनच मुसळधार पाऊस सुरू आहे. शहर आणि उपनगरांतील सखल भागांत पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. नागरिकांना आणि वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. चुनाभट्टी, सायन सर्कल, हिंदमाता, अंधेरी आदींसह वेगवेगळ्या भागांमध्ये रस्त्यांवर पाणी साचले आहे.

अंधेरी पूर्व आणि पश्चिमेला जोडणारा सध्याचा एकमेव मार्ग म्हणजे अंधेरी सबवेमध्ये चार ते पाच फुटांपर्यंत पाणी भरले आहे. वाहतूक पोलिसांनी हा मार्ग वाहतुकीसाठी बंद केला आहे. अंधेरी पूर्वेकडे जाण्यासाठी वाहनचालकांना कॅप्टन गोरे पूल आणि ठाकरे उड्डाणपुलाचा वापर करण्याच्या सूचना वाहतूक पोलिसांनी केल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viral Video: मराठी बोलल्यानं तिकीट नाकारलं! नाहूरमध्ये नेमकं काय घडलं? - VIDEO

Ramdas Athawale : एकनाथ शिंदेंची केंद्रात रवानगी होणार? रामदास आठवलेंच्या दाव्यामुळे राज्यात खळबळ,VIDEO

Shocking News: पालकांनो, मुलांना पुऱ्या देताय सावधान! पुरीनं घेतला मुलाचा जीव- VIDEO

Maharashtra Politics : एकनाथ शिंदेंचा देवेंद्र फडणवीसांशी अबोला आणि दुरावा? पडद्यामागे काय सुरु? VIDEO

Kalyan Fire News: कल्याणमध्ये इमारतीच्या १३ व्या मजल्यावर भीषण आग, रहिवाशांमध्ये घबराट,VIDEO

SCROLL FOR NEXT