Ratnagiri Rain Updates : इर्शाळवाडी घटनेनंतर रत्नागिरीचे जिल्हाधिकारी ॲलर्ट, 15 गावांमधील 540 नागरिक स्थलांतरित

Ratnagiri Rain Alert: कोणतीही दुर्घटना घडणार नाही याबाबत सर्वांनी समन्वयाने अधिक सतर्क रहा, असे जिल्हाधिका-यांनी सूचित केले.
ratnagir, Chiplun, rain updates
ratnagir, Chiplun, rain updatessaam tv
Published On

Ratnagiri News : इर्शाळवाडी येथील घटनेनंतर रत्नागिरी जिल्हा प्रशासन अधिक सर्तक झाले आहे. जिल्हाधिकारी आणि कनिष्ठ अधिकारी यांनी दरड प्रवण गावांवर विशेष लक्ष ठेवून आहे. नदीकाठच्या आणि दरड प्रवण क्षेत्रातील गावांना भेटी देत जिल्ह्यातील 15 गावांमधील एकूण 540 नागरिकांना स्थलांतरित केल्याची माहिती जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी साम टीव्हीशी बाेलताना दिली. (Maharashtra News)

ratnagir, Chiplun, rain updates
Hingoli Crime News : आर्थिक घाेटाळ्याप्रकरणी बुलढाणा अर्बनच्या शाखा व्यवस्थापकांसह 5 कर्मचा-यांवर कळमनुरीत गुन्हा दाखल

रत्नागिरी जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह (devender singh ias ratnagiri) म्हणाले परशुराम घाट आणि इतर घाट सुरु आहेत. तेथील वाहतूक सुरळीत सुरु आहे. जिल्ह्यातील 15 गावांमधील 540 जणांना स्थलांतरीत केले आहे. भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेच्या सर्वेक्षणानुसार सूचित केलेल्या दरडप्रवण गावात जावून तालुकास्तरीय यंत्रणेने नागरिकांना स्थलांतरीत करा अशा सूचना केल्या आहेत.

ratnagir, Chiplun, rain updates
Irshalwadi Response Fund: इर्शाळवाडीला आधार द्यायचा आहे, त्यांचे आयुष्य पुन्हा उभे करायचे आहे ? जाणून घ्या मदतीसाठीची प्रक्रिया

जिल्हाधिकारी म्हणाले एनडीआरएफ पथक चिपळूणमध्ये (chiplun) आहे. पोलीस, नगरपरिषद, महसूल पथके तयार करुन नियुक्त केलेले आहेत. चिपळूण मधील पाणीही ओसरले आहे. तेथील स्वच्छता करण्यात आली आहे.

जिवीत हानी कोणतीही नाही. जनावरांचे आणि इतर नुकसानीच्या पंचनाम्याचे आदेशही देण्यात आले आहेत. त्यानुसार नुकसान भरपाई दिली जाईल असेही जिल्हाधिकारी यांनी स्पष्ट केले.

दरम्यान चिपळूण व खेड तालुक्यात कोणताही अनुचित प्रकार घडू नये आणि गर्दीमुळे आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास जिल्ह्यातील सर्व शाळांना (अंगणवाडी, पूर्व प्राथमिक व प्राथमिक) आज (शुक्रवार) जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांनी सुट्टी जाहीर केली असल्याने शैक्षणिक संस्था बंद आहेत.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com