Mumbai Air Pollution  Saam TV
मुंबई/पुणे

Mumbai Pollution : मुंबईतील हवा प्रदूषणात वाढ; समोर आली धक्कादायक माहिती

गेल्या महिन्यात संपूर्ण ३१ दिवस दूषित हवेची नोंद करण्यात आली आहे.

Ruchika Jadhav

Mumbai Pollution : फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीलाच जानेवारी महिन्याचा हवामानाचा धक्कादायक अहवाल समोर आला आहे. गेल्या महिन्यात संपूर्ण ३१ दिवस दूषित हवेची नोंद करण्यात आली आहे. मुंबईच्या ठाणे, कल्याण, नवी मुंबई अशा काही शहरांमध्ये संपूर्ण महिनाभर हवा दूषित असल्याची नोंद करण्यात आली आहे. ( Mumbai Pollution)

मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि कल्याण ही चारही औद्योगिक क्षेत्र आहेत. रज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि क्रेंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने हवेच्या गुणवत्तेचा अहवाल जाहिर केला आहे. यासाठी वाहनांचा धूर, कचरा ज्वलन, बांधकाम अशा गोष्टींमुळे प्रदूषणात मोठी वाढ होताना दिसत आहे.

हवा गुणवत्ता निर्देशांक

मुंबई

चांगला निर्देशांक - ० दिवस

समाधानकारक - ०२ दिवस

साधारण प्रदूषण - १३ दिवस

जास्त प्रदूषण - १६ दिवस

धोकादायक प्रदूषण - ० दिवस

नवी मुंबई

चांगला निर्देशांक - ० दिवस

समाधानकारक - ०१ दिवस

साधारण प्रदूषण - १८ दिवस

जास्त प्रदूषण - १२ दिवस

धोकादायक प्रदूषण - ० दिवस

ठाणे

चांगला निर्देशांक - ० दिवस

समाधानकारक - ० दिवस

साधारण प्रदूषण - १४ दिवस

जास्त प्रदूषण - १३ दिवस

धोकादायक प्रदूषण - ०३ दिवस

कल्याण

चांगला निर्देशांक - ० दिवस

समाधानकारक - ० दिवस

साधारण प्रदूषण - २२ दिवस

जास्त प्रदूषण - ०९ दिवस

धोकादायक प्रदूषण - ० दिवस

मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि कल्याण या पैकी ठाणे शहारामध्ये हवेत जास्त प्रमाणात प्रदूषण आढळले आहे. ठाण्यात साधारण प्रदूषण १४ दिवस, जास्त प्रदूषण १३ दिवस आणि धोकादायक प्रदूषणाची तीन दिवस नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे ठाणेकरांच्या आरोग्यासाठी ही गंभीर बाब असल्याचं म्हटलं जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शिंदे गटाच्या आमदाराने १३ तालुकाप्रमुखांना दिल्या नव्या कोऱ्या कार; शिवसेनेचा नवा फॉर्म्युला आला चर्चेत

मोतीलाल नगरचा कायापालट! मोतीलाल नगर पुनर्विकासासाठी म्हाडाचा 'मास्टर प्लॅन'

LPG Rule: घरगुती एलपीजी सिलेंडर बुकिंगसाठी नवा नियम; आधार बायोमेट्रिक ऑथेंटिकेशन अनिवार्य

लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी गेला, पण परतलाच नाही; 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू

IIT पवईत विद्यार्थ्याची आत्महत्या, साहिलला छळ करून मारल्याचा आईचा आरोप

SCROLL FOR NEXT