

डहाणूच्या चिंचपाडा येथील घटना . मुंबईहून गुजरात कडे जाणाऱ्या भरधाव ट्रकची आधी पिकप ला त्यानंतर डिव्हायडर तोडून विरुद्ध दिशेला जाऊन तीन वाहनांना धडक दिली.
सांगली जिल्ह्यातल्या अनेक ठिकाणी पेट्रोल टंचाई निर्माण झाल्याच्या अफवेमुळे पेट्रोल पंपांवर इंधन भरण्यासाठी वाहनाधारकांची झुंबड उडाली आहे.आखाती देशातील युद्ध परिस्थिती मुळे पेट्रोल टंचाई निर्माण होणार ,अश्या अफवांचे पीक पसरल्याने अनेक पेट्रोल पंपांवर आता पेट्रोल व डिझेल भरण्यासाठी वाहनांच्या लांबच्या लांब रांगा लागल्याचे पाहायला मिळत आहे.
ईश्वरपूर मधल्या एका पेट्रोल पंपावर इंधन भरण्यासाठी दुचाकी सह चार चाकी वाहनांची मोठी गर्दी झाली होती,दरम्यान जिल्हा अधिकारी यांच्याकडून मात्र कोणत्याही प्रकारची टंचाई नसल्याचं सांगण्यात येत आहे,पण केवळ अफवा पसरल्याने पेट्रोल पंपांवर पेट्रोल भरण्यासाठी वाहनधारकांची गर्दी होत असल्याचं सांगण्यात आले आहे.
म्हाडा मुंबई मंडळाचे सीईओ मिलिंद बोरीकर यांच्या दालनात घुसून गोंधळ
सुरक्षा रक्षकांनी हस्तक्षेप करून वैद्य यांना बाहेर काढले
जी.बी. पंत फाउंडेशन आणि विश्ववर्धिनी शिक्षण संस्थेविरोधात तक्रार
जागेच्या पाहणीत अटी-शर्तींचे उल्लंघन झाल्याचे प्राथमिक निष्कर्ष
महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम १९६६ अंतर्गत कारवाईचा इशारा
बुलढाणा जिल्ह्यातील दुसरबीड गावात दोन गटात तुफान राडा झाला असल्याची घटना दोन दिवसांपूर्वी घडलीय .. या राड्याचे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे .. मात्र पोलिसांमध्ये अद्याप दोन्ही गटाकडून तक्रार दाखल करण्यात आली नसल्याची माहिती पोलिसांनी दिलीय .. मिळालेल्या माहितीनुसार , दुसरबीड गावातील ईदगाह चे विकास कामांवरून हा वाद झाल्याचे कळते आहे .. एका गटाने इदगाह चे काम केले असून दुसऱ्या गटाने त्याला विरोध केल्याचे कळते आहे ..
बुलढाणा जिल्ह्यातील दुसरबीड गावात दोन गटात तुफान राडा झाला असल्याची घटना दोन दिवसांपूर्वी घडलीय .. या राड्याचे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे .. मात्र पोलिसांमध्ये अद्याप दोन्ही गटाकडून तक्रार दाखल करण्यात आली नसल्याची माहिती पोलिसांनी दिलीय .. मिळालेल्या माहितीनुसार , दुसरबीड गावातील ईदगाह चे विकास कामांवरून हा वाद झाल्याचे कळते आहे .. एका गटाने इदगाह चे काम केले असून दुसऱ्या गटाने त्याला विरोध केल्याचे कळते आहे .. यामुळे दोन्ही गट आमने सामने आले आणि वाद होऊन लाठ्या काठ्या चालल्या , तसेच बांधकामाचे विटा फेकून मारहाण करण्यात आली आहे .. या घटनेत पाच ते सहा जण जखमी झाले असून सध्या दोन्ही गटात शांतता आहे .. मात्र पोलिसांत कुणीही तक्रार दिली नाही .. या राड्यामुळे गावात भीतीचे वातावरण पसरले आहे ..
पिंपरी चिंचवड शहर पोलिसांच्या गुन्हे शाखा क्रमांक दोन पोलीस पथकाने काळेवाडी पोलीस स्टेशन हद्दीतील लकी बेकरी जवळील विकी फुटवेअर या दुकान आणि गोडाऊन वर धाड टाकून ही कारवाई केली आहे. या कारवाईत जवळपास आठ लाख तीस हजार 250 रुपये किमतीचे पुमा कंपनीचे बनावट फिलप्लॉप, शूज आणि चप्पल पोलिसांनी जप्त केले आहेत. या कारवाईत पोलिसांनी दुकानाचा मालक विकास उर्फ विनोदकुमार रमनानी यांच्या विरोधात काळेवाडी पोलीस स्टेशनमध्ये कॉपीराईट अॅक्ट आणि भारतीय न्याय संहिता कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे. विमा कंपनीचे अधिकृत अधिकारी नीरज कुमार नरेंद्रसिंग दहिया यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी ही कारवाई केली आहे. या कारवाईत विकी फुटवेअर या दुकानात इतरही कंपनीचे मोठ्या प्रमाणात बनावट शूज आणि चप्पल असण्याची देखील शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
पोलिसांचे पथक मिरगावच्या फार्म हाऊसवर दाखल
भोंदू अशोक खरातच्या फार्महाऊसवर पोलीस दाखल
अशोक खरातला आणखी पाच दिवसाची पोलीस कोठडी मिळाल्यानंतर पोलिसांचे पथक मिरगावच्या फार्महाऊसवर
भिवंडी महानगरपालिकेचा सन 2026-27 साठी ११७९ कोटी १० लाख ९७ हजार रुपयांचा अर्थसंकल्प आयुक्त अनमोल सागर यांनी महापौर नारायण चौधरी यांना सादर केला.अर्थसंकल्प सादर केल्यानंतर सभागृहात या वर सविस्तर चर्चा सोमवार ३० मार्च रोजी होणार असल्याची घोषणा महापौर नारायण चौधरी यांनी करीत सभा तहकूब केली आहे.
या अर्थसंकल्पात शिक्षण, सार्वजनिक वाहतूक आणि पायाभूत सुविधांवर विशेष भर देण्यात आला आहे. एपीजे अब्दुल कलाम शिक्षण अभियान साठी 1 कोटींची तरतूद करण्यात आली असून त्यामध्ये विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य दिले जाणार आहे.शहरात 100 ई-बस सुरू करण्यासाठी पीएम ई-बस सेवेसाठी 5 कोटींची तरतूद करण्यात आली आहे.
जीआयएस सर्व्हे साठी 10 कोटी, शाळा दुरुस्तीसाठी 4 कोटी आणि ‘अमृत 2.0’ अंतर्गत 100 एमएलडी पाणी योजनेसाठी 25 कोटींची तरतूद प्रस्तावित आहे. रस्ते रुंदीकरण व विद्युत खांब स्थलांतरासाठी 2 कोटी तर महिला, बालकल्याण व दिव्यांगांसाठी 3.26 कोटींची तरतूद करण्यात आली आहे.
अजित पवार अपघात प्रकरण
अपघाता प्रकरणी कर्नाटकात गुन्हा दाखल
झिरो कलमाने गुन्हा दाखल करून फिर्याद महाराष्ट्र पोलिसांकडे वर्ग होणार
बेंगलोर मधील हाय ग्राउंड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
गडचिरोलीत आज काँग्रेसच्या वतीने जिल्ह्यातील समस्यांसाठी हनुमान चालिसा पठन आणि होमहवन करण्यात आला. शहरवासियांचे आराध्य दैवत असलेल्या सेमाना हनुमान मंदिरात या उपक्रमातून हनुमानाला साकडे घालण्यात आले. जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या समस्यांसह विविध प्रश्नांकडे लक्ष देण्याची बुद्धी सरकारला आणि पालकमंत्री असलेल्या मुख्यमंत्र्यांना द्यावी, अशी प्रार्थना यावेळी हनुमानाला करण्यात आली. अखिल भारतीय युवक काँग्रेसचे सचिव विश्वजित कोवासे यांच्या नेतृत्वात हा उपक्रम राबविण्यात आला
अमेरिका, इजराइल आणि इराण यांच्यामध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे सध्या समुद्रामध्ये अनेक जहाजे अडकून पडले आहेत. समुद्रातून पुढे जाण्यास योग्य संदेश येत नाही तोपर्यंत ही जहाजे एकाच ठिकाणी अनेक दिवसांपासून पुढील संदेश येण्याची वाट पाहत उभे आहेत,अहिल्यानगर मधील नेव्ही कार्गो जहाजा वरील कॅप्टन सय्यद शकील कादर हे गेल्या वीस दिवसांपासून एकाच ठिकाणी समुद्रात जहाजावर आपल्या भारतीय साथीदारांसह अडकून पडले आहेत. शकील सय्यद यांचे जहाज हार्मोस्ट्रेट जवळ अडकून पडले असून त्यांच्या जहाजाच्या आजूबाजूला आहे अनेक जहाजे याच युद्धाच्या परिस्थितीमुळे उभी असून जहाजावरील प्रत्येक जण जीव मुठीत घेऊन सध्या वावरत असून कारण युद्धजन्य परिस्थितीमुळे दररोज क्षेपणास्त्रे ड्रोन त्यांना जहाजाच्या वरून जाताना पाहायला मिळत आहे रोजच काही ना काही आवाज त्यांच्या आजूबाजूला येत असून मोठ्या प्रमाणात धूर दिसत आहे हे जहाज स्पेन येथून दुबई कडे जाण्यास निघाले असून गेल्या वीस दिवसांपासून एकाच ठिकाणी अडकून पडले आहे.
फटाके फोडत कर्कश आवाज करणाऱ्या दुचाकीच्या सायलेन्सरवर पोलिसांनी फिरवला रोडरोलर
शहरातील मुख्य महावीर चौकात सायलेन्सरचा केला चेंदामेंदा
यापुढे कायद्याच उल्लंघन करून शांतता भंग करणाऱ्यावर होणार कडक कारवाई
पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांचा हुल्लड बाजांना रोड रोलरच्या कारवाईतून कडक ईशारा
शिरढोण गावात त्यांच्या नातेवाईकांच्या नावावर सातबारा नोंद झाल्याचे उघड झाले असून, या जमीन व्यवहारासाठी कोट्यवधी रुपये दिल्याची चर्चा आहे. नोंदणी प्रक्रिया तातडीने करण्यासाठी महसूल विभागातील काही अधिकाऱ्यांनी मदत केल्याचाही आरोप होत आहे.
दरम्यान, पनवेलमध्ये वाढत्या जमीनदरांच्या पार्श्वभूमीवर अधिक नफा मिळवण्यासाठी खरात यांनी गुंतवणूक केल्याचा संशय व्यक्त होत आहे. मात्र या व्यवहारासाठी वापरलेली कोट्यवधींची रक्कम कुठून आली, याची चौकशी करण्याची मागणी होत असून, संबंधित अधिकाऱ्यांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
अमेरिका, इजराइल आणि इराण यांच्यामध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे सध्या समुद्रामध्ये अनेक जहाजे अडकून पडले आहेत. समुद्रातून पुढे जाण्यास योग्य संदेश येत नाही तोपर्यंत ही जहाजे एकाच ठिकाणी अनेक दिवसांपासून पुढील संदेश येण्याची वाट पाहत उभे आहेत,अहिल्यानगर मधील नेव्ही कार्गो जहाजा वरील कॅप्टन सय्यद शकील कादर हे गेल्या वीस दिवसांपासून एकाच ठिकाणी समुद्रात जहाजावर आपल्या भारतीय साथीदारांसह अडकून पडले आहेत. शकील सय्यद यांचे जहाज हार्मोस्ट्रेट जवळ अडकून पडले असून त्यांच्या जहाजाच्या आजूबाजूला आहे अनेक जहाजे याच युद्धाच्या परिस्थितीमुळे उभी असून जहाजावरील प्रत्येक जण जीव मुठीत घेऊन सध्या वावरत असून कारण युद्धजन्य परिस्थितीमुळे दररोज क्षेपणास्त्रे ड्रोन त्यांना जहाजाच्या वरून जाताना पाहायला मिळत आहे रोजच काही ना काही आवाज त्यांच्या आजूबाजूला येत असून मोठ्या प्रमाणात धूर दिसत आहे हे जहाज स्पेन येथून दुबई कडे जाण्यास निघाले असून गेल्या वीस दिवसांपासून एकाच ठिकाणी अडकून पडले असल्याची माहिती कॅप्टन शकील सय्यद यांनी दिली आहे.
पालघर - बोईसर चिल्हार मार्गावर सूर्या नदीच्या पुलावर भीषण अपघात . बाईक स्वाराला ट्रेलर ने चिरडले . अपघातात सुदाम धाडगा या 35 वर्षीय बाईकस्वाराचा जागीच मृत्यू . मजुर कामासाठी बोईसर कडे जात असताना मागून आलेल्या भरधाव कंटेनरन चिरडलं . बोईसर चिल्हार मार्गावर अपघातांची मालिका सुरूच.
भोंदू बाबा अशोक खरात याला ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. आज कोर्टात त्याला हजर करण्यात आले होते.
परभणी शहरातील साईबाबा नगर येथे मागच्या अनेक वर्षांपासून असलेले मारुती मंदिर उभाटाचा मुस्लिम महापौर झाल्यानंतर काल रात्री तीन वाजता महापालिकेची यंत्रणा लावून पाडण्यात आले यानंतर मूर्तीही गायब करण्यात आली या निषेधार्थ परभणीत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने महापालिका कुलूप लावून आंदोलन केलं होतं या आंदोलनाला आता हिंसक वळण लागले असून शिवसेनिकांनी मनपा पदाधिकाऱ्यांच्या केबिनच्या काचा फोडल्या आहेत मोठ्या प्रमाणावर राडा या महापालिकेत शिवसेनेने केला असून पोलिसांमध्ये आणि शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आनंद भरोसे यांच्यामध्येही जोरदार बाजाबाची झाली आहे शेवटी आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे त्यामुळे परभणी तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे
कल्याण पूर्व चिंचपाडा रोड वरील मॉडेल कॉलेज परिसरातील रस्त्यालगतच्या टपऱ्यांनी पेट घेतला. अग्निशमन दल घटना स्थळी दाखल झाले आहे. सुदैवाने जीवितहानी नाही, भाजी ,मटक्याचे टपरी असल्याची माहिती मिळाली.
युद्धजन्य परिस्थितीमुळे निर्यात ठप्प झाल्याने केळीला देशांतर्गत मागणी नसल्याने जुन्नर तालुक्यातील खोडद,मांजरवाडी, नारायणगाव परिसरातील केळी कडे व्यापाऱ्यांनी पाठ फिरवल्याने मेहनतीनं पिकवलेली केळी आता बाजारात नव्हे तर शेळ्या-मेंढ्यांच्या पोटात जात आहेत. एका बाजूला उत्पादनाला कवडीमोलही भाव नाही, तर दुसऱ्या बाजूला शेत मोकळं करण्यासाठी एकरी 20 ते 25 हजार रुपयांचा खर्च शेतकऱ्यांच्या मानेवर आला आहे.
एकीकडे उत्पन्न शून्य, तर दुसरीकडे वाढता खर्च… या दुहेरी फटक्यामुळे जुन्नर तालुक्यातील शेतकरी आर्थिक संकटाच्या खोल गर्तेत ढकलले गेले असून, तात्काळ शासकीय मदतीची हाक आता अधिक तीव्र होताना दिसते आहे.
सातारा पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी 2007 मध्ये छावा संघटनेच्या आंदोलनावर लातूर येथे लाठी चार्ज केला, तर अंतरवाली सराटी येथे मराठा आंदोलनावरही लाठीचार्ज केला, दरम्यान काल सातारा येथे जिल्हा परिषद अध्यक्ष उपाध्यक्ष निवडीत मंत्र्यांना धरपकड करण्यात आली, त्यामुळे अशा अधिकाऱ्याचं तात्काळ निलंबन करून बडतर्फ करा अशी मागणी छावा संघटनेने केली आहे
- सरकारवाडा पोलीस ठाण्यात दाखल पहिल्या गुन्ह्यातील पोलीस कोठडी आज संपणार
- जिल्हा सत्र न्यायाधीश के एच पाटील यांच्या कोर्टात सुनावणी
- सरकारी वकील म्हणून अजय मिसर बाजू मांडणार
- सचिन भाटे करणार अशोक खरातच्या बाजूने युक्तिवाद
राज्यातील तृतीयपंथी नागरिकांचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी तसेच त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासनाने स्वयंरोजगार व व्यवसायासाठी बीज भांडवल योजना राबविण्यास मान्यता दिली आहे. या योजनेमुळे तृतीयपंथीयांना आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक उन्नतीची संधी उपलब्ध होणार आहे. यासाठी विहित नमुन्यातील अर्ज करण्याचे आवाहन सामाजिक न्याय विभागाचे सहायक आयुक्त विशाल लोंढे यांनी केले आहे.
महाराष्ट्रातील ग्रामपंचायतींवर नियुक्त करण्यात आलेल्या प्रशासकांना मोठे आर्थिक किंवा धोरणात्मक निर्णय घेण्यास मनाई करणारा महत्त्वपूर्ण आदेश मुंबई उच्च न्यायालयाचे मा.न्यायमूर्ती रवींद्र व्ही. घुगे व मा.न्यायमूर्ती अभय जे. मंत्री यांच्या खंडपीठाने दिला
राज्य सरकारने जानेवारी २०२६ मध्ये राज्यातील सुमारे १४ हजार ५०० ग्रामपंचायतींचा कार्यकाळ २८ फेब्रुवारी २०२६ रोजी किंवा त्यापूर्वी संपल्याने त्या ग्रामपंचायतींवर माजी सरपंचांनाच प्रशासक म्हणून नियुक्त करण्याचा निर्णय घेतला होता.
पोलिस कस्टडीमध्ये असलेल्या भोंदू अशोक खरातची आजची SIT चौकशी पूर्ण
पोलिस अशोक खरातची चौकशी करून कोर्टाकडे रवाना
-आज भोंदू अशोक खरातची पोलीस कोठडी संपणार असून कोर्टात केले जाणार हजर
गेल्या सहा दिवसांपासून खरात होता पोलिसांच्या होता कोठडीत
पुण्याच्या राजगड तालुक्यातील पाबे घाटात मध्यरात्रीच्या सुमारास कार सुमारे १७० ते २०० फूट खोल दरीत कोसळल्याने अपघात झाल्याची घटना
मध्यरात्री दोनच्या सुमारास घाट चढत असताना एका तीव्र वळणावर, चालकाला वळणाचा अंदाज न आल्याने चालकाचे कारवारील नियंत्रण सुटून कार थेट खोल दरीत कोसळून हा अपघात झाला
सुदैवाने यात जीवितहानी झाली नाही.. दुर्घटनेत दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत..
शुभम सचिन अजेटराव आणि अमित सचिन अजेटराव अशी जखमी असलेल्या दोघांची नाव आहेत..
युद्धजन्य परिस्थितीमुळे सर्वांचेच नुकसान
कच्च तेल सुरक्षित भारतात यावं, यासाठी प्रयत्न
कच्च्या तेलाची आयात काही प्रमाणात कमी
युद्धात काही भारतीयांचा मृत्यू झाला हे दुर्दैवी
या संकंटात भारत खूप संवेदनशीलपणे काम करत आहे, नरेंद्र मोदी यांचे राज्यसभेत निवेदन
आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धाचे पडसाद आता वाशिम जिल्ह्यातील बांधकाम क्षेत्रावर उमटताना दिसत आहेत. गॅस टंचाईमुळे गुजरातमधील टाईल्स उद्योग ठप्प झाल्याने टाईल्सचा पुरवठा मोठ्या प्रमाणात घटला आहे. परिणामी जिल्ह्यात टाईल्सच्या दरात प्रति ब्रास तब्बल ५०० ते ७०० रुपयांची वाढ झाली आहे, तर ग्रेनाइटच्या दरात प्रति स्क्वेअर फूट १० रुपयांनी वाढ झाली आहे. या दरवाढीमुळे बांधकामाचा खर्च मोठ्या प्रमाणात वाढला असून नागरिक आणि व्यापारी दोघेही अडचणीत सापडले आहेत.
सागर धर्माजी विटकर वय 20 वर्ष अस गुन्हा दाखल करण्यात आलेल्या तरुणाच नाव आहे. 21 मार्च ला संध्याकाळी 6 वाजता दरम्यान सागर विटकर हा मॅगझिन चौक येथील लष्कराच्या प्रतिबंधित क्षेत्रात ड्रोन कॅमेरा उडवित असल्याच आढळून आल. कोणतीही कायदेशीर परवानगी न घेता सागर विटकर हा प्रतिबंधित क्षेत्रात ड्रोन कॅमेरा उडवित असल्याने शिपाई पिल्लीकोटेश्वर राव याने दिलेल्या तक्रारीवरून सागर विटकर यांच्या विरोधात भारतीय न्याय संहिता कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नांदेडच्या अर्धापूर तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये वेळेवर गॅस मिळत नसल्याने शहरामधील गॅस एजन्सी कार्यालयासमोर सकाळपासूनच रांगा लागल्या.
सरकारने आम्हाला फुकट गॅस देऊन आदती लावले आहेत. तो गॅस मात्र आता वेळेवर मिळत नसल्याने त्रास सहन करावा लागत आहे.
तोही गॅस वेळेवर मिळत नसल्याने गॅस धारक यांची नाराज आहे.यासाठी लागणारा वेळ काम धंदे सोडून रांगेमध्ये जवळपास पाच ते सहा घंट्यापासून ताटकळत राहावे लागत आहे.
पुणे महापालिकेचा १५,६६९ कोटींचा अर्थसंकल्प
आरोग्य आणि महिला सुरक्षा बरोबर विकासकामांना प्राधान्य
एकूण अर्थसंकल्प : १५,६६९ कोटी रुपये
मालमत्ता करातून अपेक्षित उत्पन्न : ३८८२ कोटी
कर्मचारी वेतनासाठी तरतूद : २७४८ कोटी
- भोंदूबाबा अशोक खरात महिला लैंगिक अत्याचार प्रकरणात ज्येष्ठ विधीज्ञ अजय मिसर यांची नियुक्ती
- सरकारकडून ज्येष्ठ विधीज्ञ अजय मिसर यांची नियुक्ती, सूत्रांची माहिती
- अजय मिसर यांनी २००८ मधील मालेगाव बॉम्बस्फोट, २०११ मधील दादर ऑपेरा हाऊस बॉम्बस्फोट, रवी पुजारी खटला, नाशिक धान्य घोटाळा यासह अनेक महत्वाच्या खटल्यांमध्ये सरकारी वकील म्हणून बजावलीय महत्त्वाची भूमिका
सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई मिरगाव मध्ये दाखल..
ईशानेश्वर मंदिरात करणार पाहणी..
त्यापाठोपाठ मंदिरा शेजारी असणारे आलिशान फॉर्म हाऊस देखील पाहण्यास जाणार..
अशोक खरात याच्या अटकेनंतर तृप्ती देसाई थेट ईशानेश्वर मंदिरात दाखल
प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी भोंदू बाबा अशोक खरातची भेट घेतल्याचा व्हिडिओ व्हायरल
भाजपमध्ये मंत्री व्हाल तेव्हा इथे या असा सल्ला खरात ने बच्चू कडूंना दिला होता
या व्हिडिओमध्ये बच्चू कडू खरातच्या पाया पडताना दिसत आहे
दोन वर्ष आधीचा हा व्हिडिओ असल्याची माहिती आहे
कोल्हापूरच्या संभाजीनगर परिसरामध्ये घरगुती गॅस सिलेंडरसाठी रास्ता रोको
कोल्हापूर शहरात सुरळीत गॅस पुरवठा होत असताना संभाजीनगरमध्ये मात्र वितरण व्यवस्थेमुळे गोंधळ
बुकिंग करून सुद्धा घरगुती गॅस मिळत नसल्याने नागरिकांचा संताप, रस्त्यावर गाड्या आणि दगड ठेवले
पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी दाखल होऊन वाहतूक केली पूर्ववत
उपमुख्यमंत्री सनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला पोहोचले आहेत. भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणा उपमुख्यमंत्री पवार या CM फडणवीसांची भेट घेणार आहे.
धाराशिव जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादक शेतकरी दुहेरी संकटात
गारपीटच्या भीतीने धास्तावलेल्या शेतकऱ्यांनी बाग उतरवण्यास केली सुरुवात
भाव मिळत नसतानाही शेतकऱ्यांनी द्राक्ष बाग केली उतरवायला सुरुवात
गारपिटीचे पंचनामे रखडले त्यात युद्धाचा फटका बसत असताना गारपिटीच्या धास्तीने शेतकरी मोडकळीस
सातारा जिल्हा परिषद गोंधळावरून संजय राऊत यांनी टीका केली. साताऱ्यात जे घडलं ती गुंडगिरी, झुंडगिरी, अशा शब्दात संजय राऊत यांनी टीका केली.
रत्नागिरी- जिल्ह्यातील ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर
जिल्ह्यातील ११४ ग्रामपंचायतीमधील रिक्त १७४ पदांसाठी निवडणूक
रिक्त पदांसाठी २८ एप्रिलला होणार निवडणूक, ग्रामपंचायत हद्दीत आचारसंहिता लागू
प्रशासनाकडून निवडणूक प्रक्रियेला सुरुवात, निवडणूक पूर्ण होईपर्यंत आचारसंहिता
- भोंदूबाबा अशोक खरात आणि सनदी अधिकाऱ्यांच्या एकत्रित जागेची आयकर विभागामार्फत चौकशी सुरू
- नाशिकच्या पाथर्डी शिवारात 40 गुंठे जागेत सनदी अधिकारी अभिजीत भोंडे पाटील यांची पत्नी आणि भोंदूबाबा अशोक खरात याची मुलगी यांचा एकत्रित सातबारा आला आहे समोर
- भोंदू अशोक खरात प्रकरणात नवा वाद उफाळला
- SIT प्रमुख तेजस्विनी सातपुते यांना हटवण्याची मागणी
- माहिती अधिकार कार्यकर्ते दीनानाथ काटकर यांचे मुख्यमंत्री, गृहमंत्री आणि पोलीस महासंचालक यांना पत्र
भोंदूबाबा अशोक खरातची कोठडी आज संपणार आहे.
मगरपट्टा येथील कालवा फुटी प्रकरण
कालव्याच्या दुरुस्तीसाठी लागणार चार ते पाच दिवस
काल सकाळी मगरपट्टा येथे उजवा कालवा फुटक्याने लाखो लिटर पाणी वाया
आता चार ते दिवस कालवा बंद असल्याने उन्हाळी आवर्तनावर होणार परिणाम
खडकवासला येथून कालव्यातून थेट इंदापूर पर्यंत पाणी देण्यात येते
यामध्ये बारामती , दौंड,हवेली भागातील सिंचनासाठी पाणी देण्यात येते
मात्र आता याचा परिणाम शेतीवर होणार आहे
दुसरीकडे पुणे शहरातील पाणी पुरवठ्यावर याचा परिणाम होणार नसल्याचा दावा करण्यात आलाय
धाराशिव जिल्हा परिषदेच्या सभापती पदाची निवड 27 मार्च रोजी होणार आहे. त्याआधीच महायुतीतील तिन्ही पक्षाकडून मोर्चे बांधणी सुरू आहे.
माथेरानमधील श्रमिक रिक्षा संघटनेने प्रलंबित मागण्यांसाठी बेमुदत उपोषण पुकारले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही ई-रिक्षा वितरणात होत असलेल्या दिरंगाईच्या निषेधार्थ हा निर्णय घेण्यात आलाय.
धाराशिव जिल्हा परिषदेत सभापती पदावरून महायुतीमध्ये रस्सीखेच
धाराशिव जिल्हा परिषदेच्या सभापती पदाची निवड 27 मार्च रोजी होणार असून,त्याआधीच महायुतीतील तिन्ही पक्षाकडून मोर्चे बांधणी
सभापती पदासाठी शिवसेना,भाजप आणि अजित पवार गटाची राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात जोरदार रस्सीखेच सुरू
विशेष म्हणजे,अध्यक्षपद न मिळाल्यामुळे शिवसेनेला महत्त्वाची सभापती पदे मिळावीत,अशी सावंत गटाची भूमिका
दरम्यान,चर्चेत असलेल्या फॉर्म्युल्यानुसार भाजपकडे दोन सभापती पदे,तर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला प्रत्येकी एक पद मिळण्याची शक्यता
या घडामोडींमुळे धाराशिव जिल्हा परिषदेत पुन्हा एकदा सत्तासंघर्ष पेटला असून 27 मार्चची निवडणूक निर्णायक ठरणार आहे
आता सभापती पदाची अंतिम निवड कशी होते आणि कोण बाजी मारतो, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे
राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आज एक दिवसाच्या नागपूर दौऱ्यावर
माजी खासदार आणि ज्येष्ठ नेते दिवंगत दत्ता मेघे यांच्या कुटुंबियांचे सांत्वन करण्यासाठी शरद पवार नागपुरात पोहोचतील
शरद पवार दुपारी 3:30 च्या सुमारास विशेष विमानाने मुंबईहून नागपूर विमानतळावर पोहोचतील
तेथून ते थेट खामला परिसरातील मेघे यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेतील
सांत्वन भेटीनंतर ते पुन्हा मुंबईकडे रवाना होतील
भोंदू अशोक खरातकडून ट्रस्टवरील विश्वस्तांची फसवणूक झाल्याची माहिती
शिवनिका संस्थानच्या स्थापनेवेळी अभ्यासिका, CBSC शाळा, गो शाळा सुरू करण्याचं दिलं होतं आश्वासन
धार्मिक कार्यासोबतच सामाजिक आणि शैक्षणिक कार्यात ट्रस्ट काम करणार असल्याचं चित्र उभं केलं
मात्र १५ वर्षात बाबाची संपत्ती आणि कारनामे वाढले मात्र इतर उपक्रम सुरूच केले नाही
टाटा इंडिकापासून सुरू झालेला त्याचा 'कार'नामा थेट मर्सडीजपर्यत गेल्याचा स्थानिकांचा दावा
येत्या काही दिवसात शाळेत पोषण आहार शिजवण्यासाठी सिलेंडरची टंचाई भेडसावण्याची शक्यता निर्माण झाली आहे अद्याप पर्यंत सिलेंडरची मागणी प्राप्त झाली नाही. खबरदारीचा उपाय म्हणून यवतमाळ शिक्षण विभागाने थेट शिक्षण संचालकांना पत्र पाठवून शाळेच्या सिलेंडरवर तोडगा काढावा अशी मागणी करण्यात आली आहे.
भोंदूबाबा अशोक खरातची पोलीस कोठडी आज संपणार
खरातला आज न्यायालयात करणार हजर
आतापर्यंत 6 महिलांनी खरातच्या विरोधात दिली लैंगिक अत्याचाराची तक्रार
नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यात खरात विरोधात लैंगिक अत्याचाराचे 6 गुन्हे दाखल
या प्रकरणात अनेक धक्कादायक खुलासे झाल्यानं अधिक तपासासाठी पोलीस पुन्हा खरातची पोलीस कोठडी मागण्याची शक्यता
तर आणखी पीडित महिला तक्रारीसाठी पुढे येण्याची देखील शक्यता
वाशिमच्या मानोरा शहरातील एका कापड दुकानातून भर दिवसा आरोपी महिलेने आपल्या लहान मुलाचा वापर करून नागरिकांचे लक्ष विचलित करत पर्समधील 44 हजार रुपये रोख रक्कम आणि एक मोबाईल चोरी केल्याच्या घटनेत वाशिम च्या स्थानिक गुन्हे शाखेने एक या महिलेला ताब्यात घेत 44 हजार रुपये रोख आणि एक मोबाईल जप्त केलाय... ही चोरीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली होती.
लोणावळ्यातील कार्ला एकविरा देवीच्या चैत्र यात्रेच्या निमित्ताने मावळ प्रशासन सज्ज झाले आहे. यात्रा सुरळीत पार पाडण्यासाठी मावळ तहसीलदार विक्रम देशमुख यांच्या सह; पुणे ग्रामीण पोलीस दलातील लोणावळा ग्रामीण पोलीस सज्ज झाले असून, यात्रेदरम्यान सीसीटीव्ही कॅमेऱ्याची करडी नजर असणार असून कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. भाविकांची गर्दी नियंत्रित करण्यासाठी हार-फुलांच्या दुकानांना मागे हलवण्यात आले आहे. जेणेकरून पायऱ्या मोकळ्या राहतील. कार्ला फाटा ते गडपायथा दरम्यान जड वाहनांना पूर्णतः बंदी असेल. भाविकांना गडावर फटाके नेण्यास मज्जाव करण्यात आला असून, शोभेचे आणि रंगांचे फटाके नेण्यासही बंदी घालण्यात आली आहे. तर जुन्या पुणे मुंबई महामार्गावरील अवजड वाहनांची वाहतूक देखील यात्रा काळात बंद ठेवण्यात आली आहे. ही चैत्री यात्रा धार्मिक उत्साहाने साजरी करण्यासाठी प्रशासनाची संपूर्ण तयारी पूर्ण झाली आहे.
काल सोमवारी रायगड जिल्हा परिषदेच्या सभापती निवडीची प्रक्रिया पार पडली. रायगड जिल्हा परिषदेची निवडणुकीत महायुतीचे घटक पक्ष असलेले भाजप, राष्ट्रवादी आणि शिवसेना हे पक्ष आमनेसामने होते. प्रत्यक्ष निवडणुक प्रक्रियेत आमनेसामने असणारे हे पक्ष रायगड जिल्हा परिषदेच्या सत्तेत एकत्र आले आहे. अध्यक्ष पद भाजप, उपाध्यक्ष पद राष्ट्रवादीकडे गेले. सभापती पद वाटून घेताना दोन सभापती पद शिंदेसेनेला, एक सभापती पद भाजपला आणि एक सभापती पद राष्ट्रवादीला देण्यात आल आहे. काल झालेल्या सभापती पदाच्या निवडीचे वेळी मंत्री भरत गोगावले, आ. महेंद्र दळवी, माजी आमदार अनिकेत तटकरे उपस्थित होते. सर्वपक्षीय नेत्यांनी नवनिर्वाचित सभापतींच स्वगत करून शुभेच्छा दिल्या. रायगडमध्ये विरोधी पक्ष राहिला नाही अस सांगताना राज्य आणि केंद्रातील महायुती प्रमाणे रायगडमध्ये सरकार चालेल अशी प्रतिक्रिया नवनिर्वाचित सभापती चंद्रकांत कळंबे यांनी दिली.
- तपासादरम्यान सापडलेले पुरावे आणि अन्य गुन्ह्यांसंदर्भात खरातची चौकशी
- आज आणखी महिला तक्रारदारांनी खरात विरोधात लैंगिक अत्याचाराची तक्रार दिल्यानं खरातवर अधिकाऱ्यांकडून प्रश्नांची सरबत्ती
- महिलांवरील लैंगिक अत्याचारासोबतच खरातचे आर्थिक व्यवहार, मालमत्ता आणि व्यावसायिक भागीदारांसंदर्भात चौकशी केल्याची माहिती
- उद्या खरातची पोलीस कोठडी संपत असल्याने त्याला न्यायालयात हजर केलं जाणार
इंधन दरवाढीची शक्यता तसेच पुढील काळात इंधन उपलब्ध होणार नाही, अशा अफवांमुळे नागरिकांनी मोठ्या प्रमाणात पंपाकडे धाव घेतली. दुचाकी, चारचाकी वाहनांसह ड्रम घेऊन आलेल्या नागरिकांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे दृश्य...
अनपेक्षित गर्दीचा परिणाम वाहतूक व्यवस्थेवरही झाला असून परिसरात काही ठिकाणी किरकोळ वाहतूक कोंडी निर्माण झाली. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पंप प्रशासनाने अतिरिक्त कर्मचाऱ्यांची नेमणूक करत इंधन वितरण सुरळीत ठेवण्याचा प्रयत्न केला.
प्रशासनाकडून नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता संयम राखावा, तसेच अनावश्यक गर्दी टाळावी, असे आवाहन करण्यात येत आहे..
पेट्रोल मिळणार नाही ही फक्त अफवा पेट्रोल पंप चालक
शहरातील काही पंप पेट्रोल नसल्यामुळे बंद
काही पेट्रोल पंप वर पेट्रोल शिल्लक असल्याने पेट्रोल भरण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली
पेट्रोल कंपनीचे पॉलिसी बदलल्याने गाडी पेट्रोल घेऊन उशिराने येणार पेट्रोल पंप चालक
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.