Mumbai Goregaon Saam tv
मुंबई/पुणे

Patra Chawl Crisis : पत्राचाळ पुनर्विकासात पुन्हा धोक्याची घंटा! ११व्या मजल्यावरून प्लास्टर कोसळले, रहिवाशांचा कंत्राटदारावर संताप

Mumbai Goregaon Patra Chawl : गोरेगाव पत्राचाळ पुनर्विकास प्रकल्पाच्या F विंगच्या ११व्या मजल्यावरून प्लास्टर कोसळल्याची घटना घडली आहे. सुदैवाने कोणतीही जीवित हानी झालेली नाही.

Alisha Khedekar

  • गोरेगाव पत्राचाळ पुनर्विकास प्रकल्पात पुन्हा धोक्याची घंटा वाजली आहे

  • F विंगच्या ११व्या मजल्यावरून प्लास्टर कोसळले आहे

  • कोणतीही जीवित हानी नाही

  • याआधी K विंगमध्ये लिफ्टचा अपघात झाल्याने संताप वाढला

  • म्हाडा आणि कंत्राटदारावर निकृष्ट काम व भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले आहेत

संजय गडदे, मुंबई प्रतिनिधी

गोरेगाव येथील सिद्धार्थ नगर सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या (पत्राचाळ) पुनर्विकास प्रकल्पातील निकृष्ट दर्जाच्या कामाचा पुन्हा एकदा पर्दाफाश झाला आहे. उच्च न्यायालयाच्या १० सप्टेंबर २०२५ च्या आदेशानुसार L विंगचे इंस्पेक्शन सुरू असतानाच,काल F विंगच्या ११व्या मजल्यावरून मोठ्या प्रमाणात प्लास्टर कोसळले. या वेळी काही सभासद त्या भागात तिथे फिरत होते. मात्र सुदैवाने मोठा अनर्थ टळला.

मिळालेल्या माहितीनुसार, याआधीच, १२ ऑक्टोबर रोजी K विंगमध्ये देखील लिफ्टचा मोठा अपघात झाला होता. रहिवासी लिफ्टने इमारतीच्या वरच्या मजल्यावर जात असताना लिफ्ट दुसऱ्या मजल्यावरून थेट खाली जोरात आदळली. त्यावेळी सहा सभासद लिफ्टमध्ये होते. सुदैवाने या अपघातात कोणत्याची प्रकारची जीवितहानी झाली नाही.

वारंवार घडणाऱ्या अशा घटनांमुळे बांधकामाच्या दर्जाच वर आता प्रश्नचिन्ह उपस्थित केली जाऊ लागली आहेत. रहिवाशांनी म्हाडा आणि कंत्राटदारावर निकृष्ट दर्जाचे बांधकाम व भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले आहेत. PMC चा रिपोर्ट आणि वारंवार तक्रारी दिल्यानंतरही कोणतीही कारवाई होत नसल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे.

फ्लोअर प्लॅनमध्ये तफावत, दर्जाहीन मटेरिअलचा वापर, वाळवी लागलेले दरवाजे आणि डिझाइननुसार नसलेले किचन प्लॅटफॉर्म या सर्व त्रुटींमुळे रहिवाशांमध्ये तीव्र नाराजी आहे. म्हाडा मात्र कंत्राटदाराला वाचवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप संस्थेच्या सभासदांनी केला असून, त्यांनी तातडीने उच्चस्तरीय चौकशीची मागणी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: महाविकास आघाडीची पत्रकार परिषद उद्या होणार - जयंत पाटील

Maharashtra Cabinet: ५० हजार कोटींची गुंतवणूक, ५ लाख रोजगार निर्मिती; फडणवीस सरकारचे ३ मोठे निर्णय

Bhopuri Actress Photos: कोण आहे ही सुंदरा? जिच्या सौंदर्याचा इंटरनेटवर जलवा

शिवसेना महिला नेत्याच्या नवऱ्यावर प्राणघातक हल्ला, एकनाथ शिंदेंनी घेतली रूग्णालयात भेट, नेमकं काय घडलं?

शेतकऱ्यांना ऊसाचा योग्य दर द्या, नाहीतर आंदोलन अटळ – रविकांत तुपकर|VIDEO

SCROLL FOR NEXT