Ahmedabad Plane Crash Saam tv
मुंबई/पुणे

Ahmedabad Plane Crash : आईच्या ऑपरेशनसाठी मुंबईत आला, लंडनला परतताना काळाचा घाला; विमान अपघातात राजा राणीचा संसार उद्ध्वस्त

Ahmedabad Plane Crash update : गोरेगावमधील एका कुटुंबाचा लंडनला निघालेल्या विमानाचा अपघाती मृत्यू झाला. या अपघातात संपूर्ण कुटुंब क्षणात संपलं.

Vishal Gangurde

संजय गडदे, साम टीव्ही

मुंबई : अहमदाबादहून लंडनला निघालेल्या विमानाचा भीषण अपघाताने अनेकांच्या संसाराची राखरांगोळी झाली आहे. भीषण अपघातात विमानात रमेश विश्वास कुमार यांच्या व्यतिरिक्त सर्व प्रवाशांचा जळून कोळसा झाला. अपघातानंतर परिसरात एकच धावाधाव झाली. विमान अपघाताने अनेकांचे कुटुंब उद्धवस्त झाले आहेत. गोरेगावच्याही एका दुर्दैवी अंत झाला आहे. या कुटुंबाच्या मृत्यूने गोरेगाव परिसरात शोककळा पसरली आहे.

लंडनला निघालेलं विमान मेडिकल कॉलेजच्या हॉस्टेलवर कोसळलं. विमानातील प्रवाशांसहित इंटर्न डॉक्टरांचाही मृत्यू झाला. विमान दुर्घटनेत मुंबईतल्या गोरेगावच्या एका कुटुंबाचा दुर्दैवी अंत झाला. मुंबईच्या गोरेगावातील जावेद अली, त्यांची पत्नी आणि दोन लहान मुलांताही मृत्यू झाला. जावेद अली १२ वर्षांपासून लंडनमध्ये वास्तव्यात होते. तिथेच ते नोकरी करत होते.

जावेद अली यांचं लग्न ब्रिटिश नागरिक असलेल्या तरुणीशी झालं होतं. पुढे जावेद अली तिथेच स्थायिक झाले. जावेद यांचा एक मुलगा आणि मुलगी असा परिवार होता. आईच्या हृदयाचे ऑपरेशन असल्याने ते ७ दिवसांच्या सुट्टीवर मुंबईत आले होते. आईच्या ऑपरेशननंतर पुन्हा लंडनला जात असताना त्यांच्यावर काळाने घाला घातला.

जावेद आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्य -

जावेद अली - 37 वर्षे

मरियम अली - 35 वर्षे

अमीन अली - 4 वर्षे

झियान अली - 8 वर्षे

क्रू मेंबर अपर्णा महाडिक यांचा दुर्दैवी मृत्यू

गोरेगावच्या क्रू मेंबर अपर्णा महाडिक यांचाही विमान अपघातात मृत्यू झाला. अपर्णा महाडिक या सुनील तटकरे यांच्या नातेवाईक होत्या. तटकरे यांच्या मोठया बहिणीची सून अपर्णा महाडिका या एअर इंडियामध्ये क्रू मेंबर होत्या. त्यांचे पती देखील एअर इंडियामध्ये होते. विमान दुपारी असल्याने अपर्णा सकाळी अहमदबादला गेल्या होत्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Namo Udyan Scheme 2025 : ३९४ नगरपरिषदा, नगरपंचायतींसाठी प्रत्येकी १ कोटींचा निधी, एकनाथ शिंदेंची घोषणा

Pune : वर मेट्रो, खाली बस धावणार! पुण्यात ११ किमीचा डबलडेकर उड्डाणपूल, पुणेकरांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार

Aircraft navigation lights: रात्रीच्या वेळी विमानावर निळे आणि लाल लाईट्स का लावले जातात?

Farmer suicide : अधिकाऱ्याची धमकी, पंचनामा सुरू असतानाच शेतकऱ्याची आत्महत्या, संभाजीनगरमधील धक्कादायक घटना

Soyabean Crop : अस्मानीसोबत सुलतानी संकटाने शेतकरी मेटाकुटीला; ८ एकरवरील सोयाबीनला ना फुल ना शेंगा, शेतकऱ्याचे मोठे नुकसान

SCROLL FOR NEXT