Poladpur to Khed Distance Kashedi Ghat Tunnel : मुंबई-गोवा महामार्गावरून प्रवास आता आणखी वेगवान आणि सुलभ होणार आहे. कारण कशेडी घाटातील दुसरा बोगदा पूर्णपणे सुरू झाला आहे. या बोगद्यामुळे प्रवासाचा वेळ आणखी वाचणार आहे. दोन किमीच्या या बोगद्याचं काम गेल्या काही दिवसांपासून सुरू होते. १५ रोजी या बोगद्याच्या कामात (Kashedi Ghat Tunnel Opens) वीजपुरवठा आणि इतर आवश्यक सुविधा जोडण्याचे काम पूर्ण झाले आहे. हा बोगदा सुरू झाल्यामुळे पोलादपूर ते रत्नागिरीतील खेडमधील कशेडी या भागातील प्रवास ४० ते ५० मिनिटांवरून १० मिनिटांवर येणार आहे.
उन्हाळ्याच्या सुट्ट्या, पावसाळा या काळात कोकणात जाणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात असते. सुट्ट्यांच्या तोंडावर मुंबई-गोवा महामार्गावरील प्रवास सुलभ होणार आहे. हा बोगदा २ किलोमीटर लांबीचा आहे. महत्त्वाचे म्हणजे, ९ किलोमीटरच्या सुधारित रस्त्याचा ह एक भाग आहे. या बोगद्यामुळे पोलादपूर (रायगड) ते खेड (रत्नागिरी) हा प्रवास आता फक्त १० मिनिटांत पूर्ण होणार आहे. याआधी जुन्या रस्ता हा वळणावळणाचा घाटमार्ग होता, त्यावेळी या अंतरासाठी ४० ते ४५ मिनिटे लागत होती. हेच अंतर आता अर्ध्या तासाने कमी झालेय.
काम सुरू असताना बोगद्यामध्ये पाण्याची गळती होत होती. त्यात विजपुरवठा पोहचण्यासही अडथळा येत होता. त्यामुळे बोगदा सुरू करण्यास उशीर लागला. वीज पुरवठा सुरू झाल्यामुळे आता मुंबईकडे जाणारा आणि रत्नागिरीकडे जाणारा असे दोन्ही बोगदे वाहतुकीसाठी खुले झाले आहेत. महत्त्वाचं म्हणजे, सुरक्षिततेसाठी बोगद्याच्या दोन्ही बाजूच्या सुरूवातील २०० लाईट्स बसवण्यात आल्या आहेत. त्यामुळे बोगद्यात प्रवेश करताना आणि बाहेर येताना कोणताही त्रास होणार नाही.
कशेडी घाटातील बोगद्यामुळे कोकणातील रहिवाशांना, पर्यटकांना आणि सुट्ट्यांसाठी घरी परतणाऱ्या स्थलांतरित कामगारांना (चाकरमान्यांना) मोठा फायदा होणार आहे. प्रवास वेळ कमी होण्यासोबतच, हा बोगदा जुना मार्गापेक्षा सुरक्षित आणि आरामदायी आहे. विशेषत: पावसाळ्यात आणि सणासुदीच्या काळात कशेडी घाटातील प्रवास धोकादायक ठरत होता. पण आता बोगद्याचं काम पूर्ण झाल्यामुळे मुंबई-गोवा महामार्गावरील प्रवास अधिक जलद, सुरक्षित आणि सुविधाजनक झाला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.