
कोकण द्रुतगती महामार्गाचे काम वेगाने सुरू आहे. हा एक्सप्रेस वे लवकरच पूर्ण होईल. या एक्सप्रेस वेच्या पूर्णतेची वाट पाहणाऱ्यांसाठी अर्थात प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहे. या महामार्गाचे काम ९५ टक्के पूर्ण झाले आहे. या महामार्गामुळे मुंबईकरांना गोवा ६ तासात गाठता येणार आहे.
मुंबई ते गोवा हा प्रवास आता काही तासात पूर्ण होणार आहे. कोकण द्रुतगती महामार्ग लवकरच प्रवाशांच्या सेवेत रूजू होणार असून, अवघ्या ६ तासात मुंबईकरांना गोवा गाठता येणार आहे. यामुळे प्रवाशांचा वेळ वाचेल तसेच अनेक गावं देखील गाठतं येणार आहे.
कोकण एक्सप्रेस वे बद्दल माहिती
कोकण एक्सप्रेस वे ४९८ किमी लांबीचा आहे. पूर्वी मुंबईवरून गोवा गाठायला १२ तास लागायचे पण आता कोकण एक्सप्रेस वे मुळे मुंबई ते गोव्याचा प्रवास अवघ्या ६ तासात पूर्ण होणार आहे. हा एक्सप्रेस वे तीन प्रमुख जिल्ह्यांतील अनेक गावांमधून जात आहे. ज्यामध्ये रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग यांचा समावेश आहे.
हा एक्सप्रेस वे कोणत्या गावांमधून जाईल?
कोकण एक्सप्रेस वे अनेक गावांना कनेक्ट करणारं आहे. ज्यामध्ये प्रमुख शहरे आणि गावांचा समावेश आहे. माणगाव, पनवेल, पेण, नागोठाणे, कोलाड, इंदापूर, महाड, पोलादपूर, खेड, चिपळूण, सावरदा, संगेश्वर या गावांना एक्सप्रेस वे कनेक्ट करणारं असेल. तसेच गोव्यात मापुसा, पेरनेम, मडगाव, पणजी कंकोलिम आणि कॅनाकोना या गावांना कनेक्ट करेल.
वेगळ्या पद्धतीने केलंय डिझाइन
कोकण एक्सप्रेस ज्या ठिकाणी बांधला जात आहे, तिथे डोंगर, नद्या आणि घनदाट जंगले आहेत. या एक्सप्रेसमधून प्रवास करताना आपण उंच रस्ते, बोगदे आणि पुलांमधून प्रवास करू शकाल. या एक्सप्रेस वेमुळे पर्यटनाला चालना मिळेल. तसेच रोजगाराच्या संधी निर्माण होतील आणि अर्थव्यवस्थेला हातभार लागेल.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.