मुंबई/पुणे

मुंबई-गोवा महामार्गावर भरधाव कारचा भीषण अपघात; वाहनाचा चक्काचूर, २ महिलांचा मृत्यू

Mumbai-Goa Highway Accident: मुंबई-गोवा महामार्गावर नेमले गावाजवळ भरधाव वेगाने जाणारी कार उलटल्याने एक भीषण अपघात झाला. यात दोन महिलांचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य तिघे गंभीर जखमी झाले.

Bharat Jadhav

  • मुंबई-गोवा महामार्गावरील नेमळे येथे भरधाव कार उलटून भीषण अपघात झाला.

  • या दुर्घटनेत दोन महिलांचा जागीच मृत्यू झाला आहे.

  • तीन जण गंभीर जखमी असून त्यांना पुढील उपचारासाठी गोवा-बांबोळी येथे पाठवण्यात आले

विनायक वंजारे, साम प्रतिनिधी

मुंबई-गोवा महामार्गावर नेमळे येथे दुपारी मोठा अपघात झाला. यात कारचा चक्काचूर होऊन दोन महिलांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर तीजण गंभीर जखमी झालेत. गोवा येथील पर्यटक कणकवली भिरवंडे येथे जात असताना हा अपघात घडला. यातील जखमींवर उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करून गोवा-बांबोळी येथे अधिक उपचारासाठी पाठविण्यात आले. चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने हा अपघात घडल्याचं सांगण्यात येत आहे. वाहनाचा वेग जास्त असल्याने कार रस्त्याच्या बाजुला उलटली. नेमळे येथील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत मतदतकार्य केले.

मुंबई-गोवा महामार्गावर नेमळे येथील एरंडवाकवाडी परिसरात आज दुपारी सुमारे सव्वादोन वाजण्याच्या सुमारास मोठा अपघात झाला. गोवा सालीगाव गिरी येथून कणकवली भिरवंडे येथे जात असताना हा अपघात घडला. यातील जखमींवर उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करून गोवा-बांबोळी येथे अधिक उपचारासाठी पाठविण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जीए-०३-एएम-८४७८ क्रमांकाची थार कार हायवेवरून नेमळे मार्गावरून कणकवली येथे जात असताना चालकाचा वाहनावरील ताबा सुटला आणि कार उलटली.

कारचा वेग जास्त असल्याने कार रस्त्याच्या बाजुला जाऊन धडकली. या अपघातात नानोडकर (वय ४३, रा‌. गिरी- गोवा ), विलासिनी सातार्डेकर (वय ५३, रा‌. भिरवंडे-कणकवली) गंभीर जखमी झाल्या. उपजिल्हा रुग्णालय सावंतवाडी येथे उपचारादरम्यान त्यांना मृत घोषित करण्यात आले. तर चालक सनी नानोडकर (वय ४०, रा‌‌. गिरी गोवा), उज्वला कांबळी (वय ५०, रा. गिरी गोवा), पांडुरंग नानोडकर ( वय ६५, रा. गिरी गोवा ) हे जखमी आहेत. त्यांना गोवा- बांबोळी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानची रूग्णवाहिका व १०८ रुग्णवाहिकेने रुग्णांना हलविण्यात आले‌‌. या अपघातग्रस्तांवर प्र. वैद्यकीय अधिक्षक डॉ. संदीप सावंत, डॉ. गिरीश चौगुले, डॉ. निखील अवधूत, परिचारिका गोसावी, नाईक आदींनी प्राथमिक उपचार केले. तर उपचाराअंती दोन महिलांना मृत घोषित करण्यात आले.

नेमळे येथे घडलेल्या या अपघातावेळी पोलिस हेड कॉन्स्टेबल हनुमंत धोत्रे, मनोज राऊत, प्रिया नाईक, निलेश नाईक यांनी घटनास्थळी धाव घेतली. सामाजिक कार्यकर्ते तथा शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख झेवियर फर्नांडिस व नेमळे येथील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत मतदतकार्य सुरू केले. स्थानिक ग्रामस्थांच्या सहकार्याने जखमींना वाहनातून सुरक्षित बाहेर काढण्यात आले. यानंतर अधिक उपचारासाठी त्यांना उपजिल्हा रुग्णालय सावंतवाडी येथे दाखल करण्यात आले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Overcharging phone: रात्रभर फोन चार्जिंगला लावल्यास काय होतं?

Maharashtra News Live Update: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर एसटी बसला अपघात

EPFO Update : UPI आणि ATM मधून तुम्ही PF चे किती पैसे काढू शकता? जाणून घ्या महत्त्वाची माहिती

थरारक मोहिमेत यश! अवचितगडाच्या दरीतून 400 किलोच्या तोफा बाहेर

नाकात नथ अन् कपाळी टिकली! गौतमी पाटीलचा मराठमोळा अवतार पाहून फॅन्स झाले घायाळ; पाहा सुंदर फोटो

SCROLL FOR NEXT