Accident: पिकअप-बुलेटचा भीषण अपघात, जिल्हा परिषदेच्या २ शिक्षकांचा जागीच मृत्यू, महाराष्ट्रावर शोककळा

Teacher death accident Maharashtra : हिंगोली-रिसोड राज्यमार्गावर पिकअप आणि बुलेटच्या भीषण अपघातात जिल्हा परिषदेचे दोन शिक्षक जागीच ठार झाले. सेनगावजवळ घडलेल्या या दुर्घटनेनंतर संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून पोलिसांकडून फरार चालकाचा शोध सुरू आहे.
Hingoli road accident today
Hingoli road accident today
Published On

हिंगोली-रिसोड राज्यमार्गावर एक अत्यंत भीषण आणि काळजाचा थरकाप उडवणारी अपघाताची घटना समोर आली आहे. पिकअप आणि बुलेट यांच्यात झालेल्या जोरदार धडकेत जिल्हा परिषदेच्या दोन शिक्षकांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला आहे. सेनगाव शहराजवळ हा अपघात घडला असून, गजानन पत्की आणि संतोष देसाई अशी मृत्यू झालेल्या शिक्षकांची नावे आहेत. हे दोन्ही शिक्षक दारूच्या नशेत तर्र असल्याचे प्राथमिक वृत्त असून, या भीषण घटनेमुळे संपूर्ण पंचक्रोशीत आणि शिक्षकांच्या मूळ गावावर शोककळा पसरली आहे.

नेमकी घटना काय?

मृत्यू झालेले दोन्ही शिक्षक हिंगोली जिल्ह्यातील वरुड चक्रपान या गावातील रहिवासी होते. शासकीय कर्तव्यावर असताना, जनगणनेचे काम आटोपून ते दोघे बुलेटने रिसोड येथे आपल्या पाहुण्यांकडे गेले होते. पाहुण्यांकडील पाहुणचार घेऊन ते रात्रीच्या सुमारास परतीच्या प्रवासाला निघाले. दरम्यान, सेनगाव शहराच्या जवळ येत असताना एका भरधाव पिकअप वाहनाने त्यांच्या बुलेटला जोरदार धडक दिली.

Hingoli road accident today
Ladki Bahin Yojana : सर्वात मोठी अपडेट! तब्बल ८० लाख लाडकीचा लाभ बंद, योजनेसाठी अर्जाची पुन्हा नोंदणी सुरू होणार का?

भयंकर अपघात -

हा अपघात इतका भयानक होता की, पिकअपची धडक बसताच बुलेट गाडीचा आणि दोन्ही शिक्षकांच्या शरीराचा अक्षरशः चक्काचूर झाला. धडक लागल्यानंतर दोन्ही शिक्षकांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने धाव घेतली. अपघातानंतर पिकअप चालकाने मानवतेला काळिमा फासत, जखमींना मदत करण्याऐवजी घटनास्थळावरून वाहन घेऊन पळ काढला आहे. सध्या पोलीस या फरार चालकाचा शोध घेत आहेत.

Hingoli road accident today
मोठी बातमी! पुण्यातील IT कंपनी रातोरात बंद, ७०० हून अधिक सॉफ्टवेअर इंजिनियर बेरोजगार, आयटी क्षेत्रात खळबळ

गावावर शोककळा

गजानन पत्की आणि संतोष देसाई हे दोघेही जिल्हा परिषद शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत असल्याने परिसरात त्यांचा मोठा जनसंपर्क होता. जनगणनेचे काम करून सुखरूप परत येतील अशी आशा असताना, अचानक त्यांच्या मृत्यूची बातमी धडकल्याने वरुड चक्रपान गावावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. दोन हसत्या-खेळत्या शिक्षकांचा असा दुर्दैवी अंत झाल्याने स्थानिक नागरिक आणि शिक्षण वर्तुळातून मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.

Hingoli road accident today
Ladki Bahin Yojana : 80 लाख लाडक्या बहि‍णींचे १५०० कायमचे बंद, ४ महत्त्वाची कारणं आली समोर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com